चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत यावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो.
इतक्या पहाटे उठून बाहेर इतका वादळी वारा असताना बर्फात तो काय करायला गेला होता काय माहीत. तिने उठून नकळत गरम चहाचा दुसरा कप भरला. समोरच्या खिडकीतून लांबवर दिसणारे उंच हिरवेगार देवदारसुद्धा आता पांढराशुभ्र बर्फ पांघरून झोपले होते.
लॅच उघडून त्याने आत पाऊल टाकताच त्याच्या मागोमाग आलेला सीडर पळत तिच्या पायापाशी आला, तीपण लगेच गुडघ्यावर खाली बसून तिच्या नवीन मित्राशी खेळायला लागली.
ती चक्क इतक्या लवकर उठून किचनमध्ये काम करते आहे! हातातली काठी दारामागे ठेऊन तो स्टुलावर बसला. गुडघ्यापर्यंत येणारे जड बूट काढता काढता तो आश्चर्याने बघत होता.
निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.
दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटी असल्याने बाकी कोणत्याही फ्लोअरवर जाण्याची गेले काही दिवस मला संधी मिळालेली नव्हती. ती मागच्या आठवड्यात चालून आली. एका केअर एम्प्लॉयी(स्पेशालाईज्ड नर्स) ने मला कॉल केला आणि सांगितले की एक आज्जी हॉस्पिटलमधून परत आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्याच रूममध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. (जे आज्जी आजोबा स्वतःहुन रूमबाहेर पडत नाहीत, त्यांना त्यांच्याच रूममध्ये आयसोलेट केले जाते.) ह्या आज्जी सारख्या रडत आहेत आणि त्यांची जगण्याची उमेद नष्ट झालेली आहे. तू त्यांना भेटशील का?
डोक्यात साठलेले सगळे काही वर्डपॅडवर उतरल्यानंतर तिला एकदम रिते रिते वाटायला लागले. इथे तिथे पडलेल्या दोन तीन वस्तू जागच्या जागी ठेवल्यावर तिला कंटाळा आला. नेटवर्क असते तर अनाबरोबर गप्पा मारता आल्या असत्या. ट्रिप प्लॅन करायला वेळ मिळाला असता तर तिने निदान किंडल तरी न विसरता बॅगेत टाकले असते. बरेच जर-तर सिनारिओ कल्पून तिला अजूनच कंटाळा आला.