दुष्ट

दुष्ट शब्द आला आज भेटायला...
खाडकन् थोबाडात मारली माझ्या
म्हणाला
अग दुष्ट या शब्दालाही मर्यादा असते काही
काही क़ायदे असतात दुष्टपणाचे!
तू ज्याला सारखी दुष्ट म्हणतेस
तो कधीचा ओलांडून गेलाय तुला
तुझ्याशी दुष्ट वागावं इतकिही तू
उरली नाहियेस आयुष्यात त्याच्या
दुष्ट म्हणायचच असेल तर म्हण स्वतःलाच
किती छळ स्वतःचा?
इतका त्रास तर त्यानेही दिला नसेल तुला

अर्थशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: ऑलिव्हर हार्ट आणि बेंट हॉमस्ट्रॉम

लेखिका - धारा


बेंट हॉमस्ट्रॉम आणि ऑलिव्हर हार्ट
चित्र सौजन्य : ndtv.com

नोबेल पारितोषिक विजेते : ऑलिव्हर हार्ट(Oliver Hart) आणि बेंट हॉमस्ट्रॉम (Bengt Holmström)
विभाग : अर्थशास्त्र
देश : अमेरिका

ऑलिव्हर हार्ट, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : ९ ऑक्टोबर १९४८ (सध्या वय : ६८ वर्षे)

बेंट हॉमस्ट्रॉम, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : १८ एप्रिल, १९४९ (सध्या वय : ६७ वर्षे)

Keywords: 

उपक्रम: 

शांततेचे २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन!

लेखिका - धारा

Juan_Manuel
चित्र सौजन्य : http://www.asianews.it

नोबेल पारितोषिक विजेते : ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन (Juan Manuel Santos Calderón)
विभाग : शांतता
जन्म : ऑगस्ट १०, १९५१ (सध्या वय : ६५ वर्षे)
देश : कोलंबिया

Keywords: 

उपक्रम: 

स्वप्नांची निळाई

स्वप्नांना वगळून रात्र सोसली आहेस कधी?
निळाई गिळून टाकतो काळोख
हट्टाने मग मनातला एकेक तुकडा जोड़ायचा
ठिगळाचा pattern स्वप्न म्हणून खपेल का?
काळोखाला भेदणारी निळाई सापडेल का?
पहात रहायच मिटल्या डोळ्यानी
जाग येतेच कधितरी
पण काळोख असतोच वर खाली
डोळे फाडून बघत रहायच
टक्क!
ठिगळाचा pattern बनवत रहायच
दिवस उजाडे पर्यन्त
स्वप्नांना वगळून दिवस मात्र सोसायचा
हसत हसत ढकलत रहायचा
मनात एकेक तुकडा साठवायचा
एका नवीन रात्री साठी
एका नव्या निळाईसाठी

कविता: 

भौतिकशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: डेव्हिड थाउलेस, डंकन हॉल्डन, मायकेल कोस्ट्लिर्ट्झ

लेखिका - धारा


मायकेल कोस्ट्लिर्ट्झ, डंकन हॉल्डन, डेव्हिड थाउलेस (डावीकडून क्रमाने)
चित्र सौजन्य : Diario Chaco

नोबेल पारितोषिक विजेते : डेव्हिड थाउलेस, डंकन हॉल्डन, मायकेल कोस्ट्लिर्ट्झ
विभाग : भौतिकशास्त्र
देश : अमेरिका

डेव्हिड थाउलेस, (पारितोषिक श्रेय : १/२) (David J. Thouless)
जन्म : २१ सप्टेंबर १९३४ (सध्या वय : ८२ वर्षे)

Keywords: 

उपक्रम: 

वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: योशिनोरी ओह्सुमी!

लेखिका - धारा

Osumi_wiki
चित्र सौजन्य : Tokyo Institute of Technology

नोबेल पारितोषिक विजेते : योशिनोरी ओह्सुमी (Yoshinori Ohsumi)
विभाग : वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र
जन्म : ९ फेब्रुवारी, १९४५ (सध्या वय : ७१ वर्षे)
देश : जपान

Keywords: 

उपक्रम: 

नोबेल विजेत्या कार्याची तोंडओळख.

तसं आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून ऐकून माहिती असतंच की, नोबेल पारितोषिक हा संपूर्ण जगातील अत्यंत सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अत्युत्तम कामगिरी, अथवा संशोधन केल्याबद्दल ही पारितोषिके दिली जातात. 'आल्फ्रेड नोबेल' या स्वीडीश शास्त्रज्ञाने आपल्या मृत्यूपत्रात या पारितोषिकांची तरतूद करून ठेवली आहे, वगैरे... वगैरे...

Keywords: 

उपक्रम: 

माझ्या आनंदाचं कारण

आज मला खुप मस्त वाटतंय... कारण???
हो हो कारण आहेच तर....
मागे मी काही दागिने बनवलेले... त्यातील बरेचसे मैत्रिण वरील मैत्रिणींनी विकत ही घेतले. बनवलेल्यांपैकी ४ सेट्स महाग होते अर्थात quality एकदम बेस्ट. पण घरातुन, " ह्या खोटे दागिने २-२००० ला कोण घेणार.. तुच घाल आता ते " असा आहेर जाऊबाईंकडुन मिळालेला. नाही म्हटलं तरी मनाला लागलेलंच
पण परवाच एक मैत्रिणीने माझे ३ सेट्स एक हाती घेतले. माझा आनंद गगनात, मनात आणि बाकी कुठ्ठे ही मावत नाहीये. म्हणुन ईकडे ही शेयर करतेय.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

दारू

"सगळ्यांनी बारा वाजता रिवोल्युशन बारमधे जमा!" पावणेबाराला इमेल. आमची पिकोचिप कंपनी नुकतीच एका अमेरिकन कंपनीने विकत घेतली. दोन महिने भवति न भवति होऊन शेवटी डील झाले. दोन कंपन्यांचे मर्जर म्हणजे मोठ्या माशाने छोट्याला गिळणे. नोकर्‍या जाणार हे नक्कीच. म्हणून आम्ही सगळे छोटे मासेवाले मनातून घाबरलेले. त्यात पुन्हा राजकारण. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोण बळीचा बकरा वगैरे. जिथे तिथे हीच चर्चा. इमेल आल्यावर धपाधप कोट, टोप्या चढवून, काय सांगणार असतील या विचारात, घोळक्याघोळक्याने रिवोल्युशनला पोचलो.

लेख: 

मुर्ख फाॅरवर्ड्स आणि मुर्ख लोक

आज सकाळीच एक मॅसेज आला. मागे १० महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात मारहाण झाली.. . मग ती आई टिव्ही वर रडुन रडुन सहानुभूती मिळवत होती.. मग लोक पैश्याच्या मागे ईतके लागलेत की मुलांना असं लोकांकडे टाकुन जातात... मग सासु सासर्यांचं लचांड सुनांना नको असतं...

अर्थात हा मॅसेज बनवणारा माणुस बिंडोक आहे... पण तरी असे मॅसेज येतात आणि लोक ते फाॅरवर्ड करतात.

१. १०० पैकी ९५% बायका नोकरी करतात.
२. सर्वांचीच आर्थिक परिस्थीती चांगली असते असं नाही.

माझ्या आयुष्यातील पहिला पुरुष

'माझ्या आयुष्यातील पहिला पुरुष'

माझ्या आयुष्यातील पहिल्या पुरुषांची पहिली आठवण , डोक्यात अजूनही पक्की आहे ...एक हातगाडीवाला गोदरेजचं कपाट लादलेली गाडी ओढतोय नी हा त्याच्या मागून भरभर चालतोय ...त्याच्या बोटाला लोंबकळत दोन लाल गमबुट चालले आहेत ,जे हट्ट करताहेत ,"उचलून घे मला" ...तो त्यांना म्हणतो," घेतो मी उचलून पण त्यापेक्षा एक मस्त आयडीया आहे.आपण ह्या कपाटासोबत रेस लावली तर? ते जातय आधी आपल्या घरी...की तू ?...की मी?"

लेख: 

२८ November!

आजची गोष्ट दोन मुलींची आणि दोन आयांची!
फार वर्षांपुर्विची गोष्ट आहे... तरी साधारण ३३ वर्षांपुर्विची! लग्नाच्या तब्बल ३ वर्षान्नी आईला दिवस राहिले होते! हो त्या काळी ३ वर्ष मूल-बाळ नसण खरच खूप काळजिची बाब होती.

Keywords: 

:Draft Incomplete :::: Rajsthan!!!

राजस्थान
आमच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करावा, हा विषय आम्ही जवळ जवळ १ महीना भर चघळला पण आम्हा दोघानांही ऑफिस् नावाच्या चक्रातुन वेळ काढ्ता येत नव्हता. रोजची धावपळ् ,वेळेवर ट्रेन पकडायची,घर- ऑफिस कामं,, माझी तर खुपच करसत व्ह्यायला लागली होती.त्यातुन बरेच दिवस आम्ही कुठेच एकत्र फिरणं ,खरेदी नाही अगदी नाहीच्!!

Keywords: 

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ :कहाणी विवेकानंद शिलास्मारकाची

नमस्कार मैत्रिणींनो !

https://www.maitrin.com/node/1306 इथे मंजूताईंनी एकनाथजींची ओळख करून दिली .

त्यापुढे :
एकनाथजी रानडे यांचे कार्य:
शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:
अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता,

ImageUpload: 

अन्नपूर्णा रुचिरेचा गोतावळा

खादाडीच्या पुस्तकांबद्दल चर्चा करण्यासाठीचा हा धागा..
तुम्ही कुकबुक्स वापरता का? असल्यास कोणती?
आवडती पुस्तकं कोणती? का आवडतात?

पुस्तकातून बघून स्वयंपाक करताना झालेल्या गमतीजमतीसुद्धा इथे लिहूयात.

89B41302-E5BE-4640-8B7A-BB442469FB7A.jpeg

चित्रसौजन्य: कुकिंगलाईट

कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १

सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी'

विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे!

Keywords: 

लेख: 

फिरुनी नवी जन्मेन मी

काsssssय? आतापासून बरोब्बर चार तासांनी माझा मॄत्यू होणार? कसे शक्य आहे हे? काय झालेय काय मला? की मी काही गुन्हा केलाय म्हणून मला ही शिक्षा मिळणार आहे? काहीच कळेनासं झालंय. काय करु? कुणाला विचारु? कसले डॉक्टर हे मेले? असाध्य आजार असलेल्या रुग्णालादेखील तू लवकरच खडखडीत बरा होणार आहेस असं सांगितलं जातं आणि नखात रोग नसलेल्या, अजुन 'यौवनात' असलेल्या मला, तू चार तासांनी मरणार आहेस हे तोंडावर सांगून मोकळे? वेंटीलेटर नाही का हो तुमच्याकडे? निदान त्याच्यावर तरी जगवा मला आणि काही वेगळी ट्रीटमेंट देऊन वाट बघा, जर तुमच्यामते मी आजारी असेन तर. हे म्हणजे माझ्या नावाची सुपारीच दिल्यासारखं की !

Keywords: 

लेख: 

देवबाग - तारकर्ली माहिती

हेल्लो मैत्रीणिंनो... :waving: कश्या आहात सगळ्याजणी.

तुमची मदत हवी आहे. (नेहमीप्रमाणेच)

त्याच काय आहे. येत्या डिसेंबरात देवबाग, तारकर्ली फिरायला जायचं ठरतयं. (आम्ही दोघंच- लव्ह बर्ड्स Blushing मी आणि माझे होणारे अहो)
नेटवर सगळ्या साईट चेक करुन फार कन्फ्युझायला झालं राव. :confused: त्यामुळे मग म्हटलं आपल्या मैत्रिणी कधी कामी यायच्या.

Keywords: 

सय- माझा कलाप्रवास- सई परांजपे

सय- माझा कलाप्रवास
सई परांजपे
राजहंस प्रकाशन, ३५८ पानं, ३०० रूपये.

नावाजलेल्या लेखिका-दिग्दर्शिका म्हणून सई परांजपे या नावाचा चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर पुणे आकाशवाणी, बालरंगभूमी, दूरदर्शन, लघुपट, नाटक आणि चित्रपट अशा सर्वच मंचांवर त्यांनी बरेच ’धाडसाचे उद्योग’ केले आहेत. या सर्व माध्यमांतला प्रवास आणि त्या वेळेला आलेले अनुभव यांचा आढावा म्हणजेच ’सय- एक कलाप्रवास’.

तमसो मा ज्योतिर्गमय - अनोखे लक्ष्मी पुजन

आज दिवाळीनंतर तब्बल एक आठवड्यानंतर मी याबद्दल लिहितेय. :P

या लेखात दिव्यांचे, रोषणाईचे कसलेही फोटो, वर्णन नाही. त्यामुळे हा लेख या उपक्रमात फिट होईल की नाही माहीत नाही. मात्र, या वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अंधारातून प्रकाशा कडे नेणार्‍या एका अनोख्या जगाशी ओळख झाली माझी. स्वतःला काही अंशी तरी समॄद्ध करणारा हा माझा अनुभव, मैत्रिणींसह शेअर करावासा वाटला, म्हणून लिहितेय इथे.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

भोपळा

*भोपळाऽऽऽऽऽ*

https://youtu.be/wtx7AkH_h0Y

हि गोष्ट आमची तर आहेच,
पण तुमचीही आहे.
आणि जर ही पाहण्यासाठी तुम्ही सहा मिनीटं काढली नाहीत, 
तर ही गोष्ट तुमच्या मुलांची सुद्धा होणार आहे.

हा *‘भोपळा’* पाहण्यासाठी फक्त सहा मिनीटं काढा... 
नाहीतर मग आयुष्यभर आहेच *भोपळाऽऽऽऽऽ*

Keywords: 

रविवारचं आळशी डूडल

आज उठल्या उठल्या संघमित्राने fb वर शेअर केलेले सुंदर लँडस्केप फोटो पाहिले. त्यातलं एक composition खूपच आवडलं Lovestruck
दिवाळीत एक डूडल केल्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला म्हणून एक जेल पेन घेतलं आणि डूडलूनच थांबले :P

हा संमि ने काढलेला फोटो:

FB_IMG_1478405902213.jpg

आणि हे माझं डूडल:

Keywords: 

कलाकृती: 

तमसो मा ज्योतिर्गमय

लेकीने रंगवून बनवलेलं टी लाईट होल्डर. तिने माझी एक काचेची चांगली वापरात असलेली बरणी ढापली Vaitag त्यासाठी पण एन्ड प्रॉडक्ट चांगलं दिसत होतं तर जरा माझं दुःख कमी झालं Lol

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

काही किस्से अभिप्रायांचे

अनोळखी लोकांकडून लिखाणाला मिळालेल्या प्रतिसादाच्या या काही नोंदी आहेत. काही ह्रुद्य का कायशाश्या आहेत तर काही मजेशीर आहेत. काही थोड्या डोक्याला ताप झाला वाटावं अशाही आहेत. पण जोपर्यंत आपल्या हातात नंबर ब्लॉक करणे, इमेल स्पॅम मधे ढकलणे हे पर्याय आहेत तोपर्यंत तितकासा ताप डोक्याला मी करुन घेत नाही. एरव्ही सगळं हहपुवा मोड मधे करमणूक करुन जातय ना तोवर चालसे.

हे लिहून ठेवलं पाहिजे ही आयडीयेची कल्पना खरतर ललिता प्रीतिची. काही दिवसांपुर्वी व्हॉटस ऍप चॅट करताना तिने ती बोलून पक्षी टाईप करुन दाखवली होती. आज आलेल्या फ़ोनमुळे परत त्या कल्पनेने मनात उचल खाल्ली आणि मी टायपायला घेतलं.

लेख: 

दिवाळी - दीप

सृजन वैगरे काही नाही. पण खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली म्हणून इथे शेअर करतीये

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

आली माझ्या घरी ही दिवाळी - भाग 2

https://www.maitrin.com/node/1272 हा भाग1

ह्या आमच्या पुढील रांगोळ्या ....

ह्या रांगोळीने आम्हाला पेशन्सचे धडे गिरवायला लावले , आम्ही बी लई चेंगट Nerd सोडलं न्हाय त्या रांगोळीला :winking:

IMG_20161031_222813.jpg

IMG_20161031_222859.jpg

हा आमचा बागडायचा हक्काचा प्रांत ...अर्ध्या पावून तासात काम तमाम :ty:

Keywords: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - आली माझ्या घरी ही दिवाळी

ह्या वर्षीच्या दिवाळीचे काही फोटो.

घरी केलेला फराळ. अनारसे, गुळातले बेसन लाडु, चिवडा, चकली, रवा लाडु, शेव आणि शंकरपाळी
faral

मी आणि लेकीने मिळुन रंगवलेल्या पणत्या.
panatya

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तमसो मा जोतिर्गमय

ऑफिसात दिवाळी निमित्त रांगोळी, पोस्टर आणि पॉट पेंटिंग स्पर्धा झाल्या.थिम होती फेस्टेव्हल ऑफ लाईट्स....
रांगोळी आणि पोस्टरात पहिला नंबर आला. पॉट मधे का नाही मिळालं ही एक मिस्टरीच आहे. सगळे पॉट्स माझ्या पॉट पुढे बेक्कर दिसत होते खरं तर :sigh:
पोस्टरचा फोटो मिळत नाहीये... सापडला की एडिटते..
असो....! हे बघा... शेवटून तिसऋया फोटोतली रांगोळी प्रितीने घरी काढलिये... त्यानंतर माझी अमेरिकेतली लक्ष्मी पुजा आणि घरा बाहेर लावलेले दिवे (हे दोन फोटो टाकायला हवेत असं काही नाही पण माझंच मला बळंच कौतुक म्हणुन टाकतेय् )

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - दिवाळी भेटकार्डे

ही मी ४-५ वर्षांपूर्वी केलेली काही दिवाळी भेटकार्डे -
Minoti-greetings.jpg

चिकटकाम, रंगकाम असे करत साधारण १५ ग्रीटिंग केली होती.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - नवीन घरातली पहिली दिवाळी

नवीन घरातली पहिली दिवाळी -

मी केलेला आकाश कंदील, पणत्या - मैत्रिणीने रंगवलेल्या आणि मी काढलेली रांगोळी

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS