माझे बरेच जुने सलवार कमीझ मी बाजुला ठेवुन दिले होते की यांचे काहीतरी करू म्हणुन. तसेच बर्याच ओढण्या पण ठेवल्या आहेत काहीतरी करु म्हणुन. तर त्याची एक बेडशीट बनवली. ५ टॉप + १ ओढणी असे मिळून हे बनवले आहे. थोडे दिवस का होईना बरे दिसेल असे वाटतेय :) घरच्यांना तरी आवडलेय रंग वगैरे. आयडिया माझ्या वहिनीच्या आईची. त्या असे बरेच काही काही करुन घेतात शिंप्याकडून. इथे शिंंपी आणि कष्टंबर आम्हीच! पेक दिवस पदर खोचून लावल्या कात्र्या टॉपना आणि हे बनवले!
या मी केलेल्या लेटेस्ट बॅग्ज आहेत.
यातल्या काही ऑर्डर नुसार कस्टमाइझ्ड केलेल्या आहेत.
याआधीच माझं क्रोशे काम क्रोशेच्या कॉमन धाग्यावर आहेच.... :)
ऍडमीन ताईंना विशेष धन्यवाद हे सगळं इकडे आणण्याची आठवण केल्याबद्दल.
नाक वर करुन जगताना, पावसात बागडताना, हिरवाईने नटलेली सृष्टी पहाताना,
जो दिवस आपण उपभोगतो तो हा आपला स्वातंत्र दिवस. ह्या दिवसासाठी ज्यांनी बलिदान दिले अश्या स्त्री स्वातंत्र सेनानींच्या आठवणीसाठी हा असा एक तिरंगा. व त्यांना मानवंदना आत्ताच्या स्त्रीयांकडुन / मैत्रीणींकडुन.
आज छान काही करून पोस्ट करायचा विचार होता पण दिवस सुरू होऊन संपतही आला तरी मुहूर्त काही मिळेना
पण पोस्ट तर करायचं होत मग हे परवा घ
केलेले कानातलेच टाकायचं हातात राहीलं. घाईघाईत केले आणि प्रयोग म्हणून केले त्यामुळे 'य' सुधारणा हव्या आहेत खरतर पण ठिक आहे सुधारेन पुढच्या वेळी. आत्ता आहे तसेच पोस्ट करते गोड मानून घ्या.
जलरंग वर्कशॉपमधल्या होमवर्कचा गुलाब राहिलाच होता. टीचरने वॉर्निंग पण दिलेली :ड
तर आज तिरंगा उपक्रमाच्या निमित्ताने नारिंगी गुलाब करुन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय
मॅगी तू बोललीस तसा अजूनही हात मुक्तपणे फिरत नाहीय. हात ग्राफिककडेच वळतोय. पण प्रयत्न करतच रहाणार. :)
सगळ्यांच्या एंट्रीज पाहुन अगदी काही तरी करायचंच अस ठरवलं. दरवेळी मैत्रिण उपक्रमात सहभाग घेणं शक्य होत नाही वेळेअभावी, आज हाताशी वेळ होता आणि रंग हि होते आणलेले सो स्पेशल 'मैत्रीण' साठी केलेला हा प्रयत्न. नुसत्या शो च्या वस्तु पडुन राहतात काही तरी उपयोगी होणारं करावं इतकंच डोक्यात होतं. सुचत गेलं आणि करत गेले.
झुंजुमुंजु झालं. पहाट वारा स्वतःबरोबर केशरी देठाच्या पारिजातकाचा मंद सुवास वाहून आणत मन प्रसन्न करीत होता. काही वेळातच पूर्व दिशा उजळू लागली. चैतन्यमय अशा सोनेरी केशरी, गुलाबी रंगांनी. अहाहा ! निसर्गाने केलेली ही केशरी उधळण सार्या सॄष्टीच्या तनामनांत सळसळता उत्साह जागवते खरी. मी आहेच असा सार्या जगताला चैतन्य बहाल करणारा. केशरी रंग स्वतःवरच खूश होत विचार करत होता.
उन्हाळ्याच्या सुट्टीचा आळस झटकायला म्हणून शुक्रवारी घरात आहेत त्या फुलांमधे वेगवेगळ्या रचना करुन बघत होते.
नंतर लक्षात आलं की ह्यामधे केशरी, पांढरा आणि हिरवा रंग जास्तीत जास्त आहेत. आणि क्लिक झालं की ह्या रचना "तिरंगा" मधे टाकता येतील. :)
रचना करताना मला फक्त वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स करुन बघायची होती. त्यामुळे करताना सगळी "फ्री स्टाइल"च आहे. कोणतीही इकेबानाची तंत्र ह्यामधे वापरलेली नाहीत.