आज्जी आजोबांची डायरी: भाग १५

डियर ऑल,
मी माझे अनुभव लिहायला सुरुवात केली, माझी व्यक्तीगत डायरी म्हणून! रोज घरी आईबाबांना फोन केला, तरीही तितकं बोलायला वेळ मिळत नाही. अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात.
नीलचा जन्म झाल्यावर मी पूर्णवेळ घरीच होते. तो आता थोडा मोठा झाला आणि मला काही तास मोकळे मिळायला लागल्यावर, एखादा कोर्स करूया असं ठरवलं. आणि मनातही नसतांना मला जॉबच्या ऑफर्स यायला लागल्या... मी interview ला गेले आणि निवड झाली...

इतकं एकामागुन एक घडलं सगळं की मला विचार करायलाही संधी नाही मिळाली...

आज्जी आजोबांची डायरी: भाग १४

(मला काही दिवसांपूर्वी दोन जणांनी ह्या आज्जी आजोबांचे खरे नाव सांगता येत नसेल तर काहीतरी काल्पनिक नाव दे, त्याने वाचायला मजा येईल, असे सांगितले होते, पण तसे केल्याने आणि मला त्यांची खरी नावं माहिती असल्याने माझा गोंधळ उडतो आणि मग माझा लिहिण्याचा फ्लो तुटतो, म्हणून मी हे करायला नकार दिला होता. आज पुन्हा एका वाचकाकडून तेच फार इन्सिस्ट करून सुचवले गेले, तेंव्हा मी एक आयडिया केली. आधी सगळा भाग लिहून घेऊन मग शेवटी प्रत्येकी एकेक काल्पनिक नाव ऍड केले आहे. आशा करते, सर्वांना हे लेखनशैलीतील बदल आवडतील.)

आज्जी आजोबांची डायरी: भाग १३

कालच्या भागात सांगितलेल्या सुंदर कॉर्नरसाईडलाच पण दुसऱ्या मजल्यावरच्या एक आज्जी आणि त्यांच्या मैत्रिणीची गंमतीशीर गोष्ट आज सांगते.

त्या कॉर्नरला राहणाऱ्या आज्जींशी माझं एकदाच बोलणं झालेलं होतं. त्या कायम फिरताना दिसतात, पण पॅसेजमधल्या कॉर्नरचेअरवर विशेष बसत नाहीत.
एकदा मला त्या चेअरवर बसलेल्या दिसल्या. छान लाईट पर्पल कलरचा पुलोव्हर घातलेल्या, गळ्यात मोत्याची माळ आणि कानातही मोत्याचे कानातले. सुंदर, फ्रेश दिसत होत्या. अतिशय हसऱ्या आणि गोड आज्जी..

ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट!

एक होती ठकू. स्वैपाकाच्या बाबतीत महानाठाळ. आईने स्वैपाक शिकवायचा प्रयत्न केला, पण ठकूने कधी दाद दिली नाही. कॉलेजबरोबर हजारो उद्योग असत, त्यामुळे ठकू घरी कमीच असे. मुळात स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच ठकूला फारशी पसंत नव्हती. वरण-भात आणि भरपूर दूधसाखरवाली उकळी कॉफी हे दोनच पदार्थ होते, जे ठकूला कुणाच्याही मदतीशिवाय सुरुवातीपासून शेवटापर्यंत जमत असत. पोहे आणि साबुदाण्याची खिचडी कशी करतात हे ठकूला फक्त बघूनच माहिती होते. पण ठकूला खाण्याबद्दल मात्र प्रेम होते.

Keywords: 

मुलामा

करोनाचं हे वादळ आपल्याला खूप साक्षात्कारी धडे देते आहे, देणार आहे. आपण एका जागतिक पातळीवरच्या ऐतिहासिक वळणाचे साक्षीदार असणार आहोत हे नक्की. ही जी शांततेची, निवांतपणाची मुलायम साय अंथरलीये ना सगळीकडे... तिच्या पोटात खोलवर भविष्याची भिती दडलीये. ती धडका मारते आहे अधून मधून, पण नेमकं तेव्हाच.. आजवरच्या जगण्यातून, अनुभवांतून जे फायटींग स्पिरीट मिळालंय ना, तेही ठणकाऊन सांगतंय, सुचवतंय...आता धीर नाही सोडायचा. सज्ज व्हायचंय, समर्थ बनायचंय, आपण स्वतः खंबीर राहिलो तर आजूबाजुच्यांना आधार देऊ पण त्यासाठी आपले पाय बळकटपणानं रोवलेले असायला हवेत.

Keywords: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ११

आता मी पुढे काल घडलेला अतिशय गोड प्रसंग सांगणार आहे.

आज्जी नं. 1 च्या मित्रपरिवाराला भेटल्यानंतर मग मी ज्यांचा उल्लेख पहिल्या भागात केलेला आहे, त्या लायब्रेरियन आज्जींकडे सहज चक्कर मारली. त्यांचे मिस्टर दुसऱ्या मजल्यावर आणि त्या तिसऱ्या, असे का? हे मागे विचारले असता ऍडमिनिस्ट्रेशनच्या कलीगने सांगितले होते की आजोबा बेड रीडन आहेत आणि सतत त्यांना डॉक्टर, नर्स व्हिजिट सुरू असतात, त्यात आज्जींना डिस्टर्ब होऊ शकते, म्हणून ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आहेत.

तुम्ही स्वयंपाक का करता?

सूचना( ही पोस्ट स्वयंपाकासंबंधी आहे. विषय आवडत नसल्यास तुमचा कंटाळ्याचा अधिकार अवश्य वापरा)

समोर ठाकलेल्या विपरीत परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रत्येक व्यक्तीचे मार्ग वेगवेगळे असतात. सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूला बघितलं तर लोक काय काय करत आहेत! इथे बेल्जियम मध्ये लोक गात आहेत, व्हायोलिन वाजवत आहेत, रोज ठराविक वेळी टाळ्या वाजवत आहेत आणि सगळ्यात जास्त लोक स्वयंपाक करत आहेत.

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग १०

थँक्यू डियर ऑल.. आता मी खूपच सावरले आहे. आजचा दिवसच तसा होता. अतिशय वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला..
माझा आणि आपल्या सर्वांचाच मूड लाईट आणि हॅपी व्हावा असा माझा आजचा दिवस फार सुंदर गेला.
आज इतके अनुभव आलेले आहेत की किती लिहू आणि किती नको, असे मला झालेले आहे, पण रात्र थोडी आणि सोंगं फार, अशी माझी अवस्था झालेली आहे. आजचा लेख फार मोठा झाल्याने आणि ट्रॅमच्या प्रवासात संपू शकला नसल्याने घरी आल्यावर थोड्या थोड्या कामानंतर कन्टीन्यू केला आणि तरीही सगळ्या दिवसाचा वृत्तांत इच्छा असूनही पूर्ण करू शकलेले नाहीये.

वैदर्भीय खाद्यसंस्कृती

मंजूताईंची गोमू संगतीने मधली गोळा भाताची रेसिपी आणि रश्मीची चिंचेच्या साराची रेसिपी बघून भयंकर नोस्टॅलजिक झाले वैदर्भीय पदार्थ आठवून, अग हा एक जुना लेख आठवला, म्हणून इथे आणला.

पूर्वप्रकाशित - अनाहिता रुची विशेषांक २०१५

आहार व पाककृती: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ९

पहिल्याच दिवशी पहिल्याच ३ आज्जी-आजोबांचे कम्प्लिटली ३ वेगळे अनुभव आलेले असल्याने मी मिक्स्ड मूडमध्ये होते. कोणत्याही आज्जी-आजोबांची नावं रिव्हील करणं प्रोटोकॉलमध्ये बसणारं नसल्याने आणि त्यांना टोपणनाव देऊन ते लक्षात ठेवणं अवघड असल्याने मी त्यांना आता नंबर्स देते, म्हणजे पुढच्या संदर्भांसाठी ते आपल्याला बरं पडेल.

तर सगळ्यात पहिल्यांदा भेटलेल्या आज्जींना आज्जी नं 1, दुसऱ्या आज्जींना आज्जी नं.2 आणि आजोबांना आजोबा नं. 1 असे म्हणूया..

ह्या ३ आज्जी आजोबांची मी मनात प्रत्येकी एक कॅटेगरी बनवून टाकली आणि त्यानुसार माझी स्ट्रॅटेजी ठरवली.

कथाकथी - बालकथा - चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वारी 

ऑडीयो कथा इथे ऐकता येईल

कथा - स्वप्नाली मठकर

कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक

पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू

प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वारी

चिंगु आणि पिंगू नावाचे दोन चतुर भाऊ बहिण होते. दोघांचेही डोळे मोठ्ठे चकचकीत होते. पंख सुद्धा आईसारखेच सुंदर पारदर्शक होते. शेपुट मात्र अजून छोटुशीच होती. हो! अजून दोघे छोटेच होते ना. त्यामुळे त्यांची शेपटीही पिटुकलीच होती. कधी एकदा मोठे होऊ आणि छान आईसारखी लांब शेपटी होईल याची दोघे वाट बघत असत.

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ८

सिनियर केअर होममध्ये ज्यांना मी सगळ्यात आधी भेटायला गेले, त्या आज्जींनी माझं प्रेमाने त्यांच्या खोलीत स्वागत केलं..

आज्जी आजोबांची डायरी: भाग ७

सिनियर केअर होममधल्या माझ्या नोकरीला काल बरोब्बर एक महिना पूर्ण झाला! दिवस फारच पटापट संपले.. हा महिना मला अनेक अनुभवांनी श्रीमंत करणारा ठरलेला आहे. ही नोकरी मला कशी मिळाली, ह्याविषयी मी एक दिवस लिहीनच, पण एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी पहिल्या दिवसाची आठवण मात्र आज लिहिते.

आज्जी आजोबांची डायरी: भाग ६

सिनियर केअर होममध्ये इतक्या सगळ्या सुखसोयी आहेत, हे बघितल्यावर मनात प्रश्न येणं सहाजिकच आहे की अशा ठिकाणी राहणं सर्वांना परवडत असेल का? तर वस्तुस्थिती ही आहे की या ठिकाणी गरीब, श्रीमंत असे सर्व लोक आहेत. प्रत्येकाला त्याच्या आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती नुसार पैशाची व्यवस्था करता आलेली आहे. तो प्रत्येक माणसाचा डेटा सर्व्हरवर सेव्ह केलेला आहे. मला पहिल्या दिवसापासूनच हा प्रश्न मनात असल्याने तो भाग मी सगळ्यात आधी वाचला.

लॉकडाऊन

Disclaimer: कथा बरीच त्रासदायक आणि नकारात्मक आहे. नाजूक मनाच्या लोकांनी कृपया वाचू नये आणि वाचलीच तर मन डालगोना कॉफीइतके घट्ट करून :P वाचावी.

------------

दिवस १

Keywords: 

लेख: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५

आज आज्जी-आजोबांचा संस्थेतला दिनक्रम आणि त्यांची व्यवस्था कशी आहे, हे सविस्तर सांगते.

ह्या सिनियर केअर होमचा आऊटलूक एखाद्या पॉश हॉटेलसारखा आहे. त्यातील बेडची रचना उंची कमी जास्त करता येईल अशी सोयीची केलेली आहे, जेणेकरून अपंग आणि वृद्ध व्यक्तींना कोणाच्याही मदतीशिवाय केवळ एक बटन दाबून चढता, उतरता यावे.

शिवाय बेडचा पाठीचा आणि पायाचा भाग वर खाली करता येईल, अशी सोय असलेला आहे. म्हणजे सिटिंग पोझिशन, स्लीपिंग पोझिशन, पाय उंच करता येणे, सपाट करता येणे, अशी रिमोटकंट्रोलच्या बटनांचा वापर करून हवी ती सोयीची रचना करता येते. हे रिमोटकंट्रोल बेडला स्टँडवर लावून ठेवलेले आहेत.

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४

डायरीतले आज्जी आजोबा ज्या सिनियर केअर होममध्ये राहतात, त्या संस्थेविषयी अधिक माहिती दिल्याशिवाय त्यांच्या जीवनाविषयी पुरेसे चित्र उभे राहणार नाही, असे वाटतेय, म्हणून आज थोडे त्या संस्थेविषयी सांगते.

हे ओल्ड एज होम नसून सिनियर केअर होम आहे, ही पहिली आणि महत्वाची गोष्ट.

बालकथा - सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग

सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग

"हुर्रे!! उद्यापासुन शाळेला सुट्टी!!!" शाळेच्या बसमधुन उतरताच सायु अाणि मित्रमंडळी नाचायलाच लागली.

"ए, उद्या सकाळपासुनच बागेत खेळूयात," चिनू म्हणाली.

"तू उद्यापासुन खेळणार? अाम्हीतर बाबा अात्तापासुनच खेळणार, " तिला चिडवत अादी म्हणाला.

"अाधी घरी जाऊन बॅग तर ठेवूयात," निहाने सांगितले. तशी नाईलाजाने सगळे अापापल्या घरी निघाले.

इतक्यात सायूला अाठवलं, "ए अाज संध्याकाळपासुन स्केटींगचा क्लास चालू होणार अाहे ना? मला करायचंय स्केटींग. तुम्ही येणार अाहात ना?"

Keywords: 

लेख: 

नी या ब्रॅण्डचा पाचवा वाढदिवस

एप्रिलमधे नी या ब्रॅण्डला पाच वर्षे पूर्ण झाली.
पाच वर्षपूर्तीसाठी म्हणून बरेच काय काय योजले होते. ते करोनाच्या संकटामुळे गळपटले.
सगळ्या निरूत्साही वातावरणात पाचव्या वर्षपूर्तीचे कलेक्शनही रखडले.

पण आता आपले आपणच बळ एकवटून कामाला लागण्याशिवाय पर्याय नाहीये.
पाचव्या वर्षपूर्ती कलेक्शनची तयारी जोरात चालू आहे.
लवकरच पाचवे वर्षपूर्ती कलेक्शन तुमच्या समोर येईल.

पाचव्या वाढदिवसानिमित्त माझ्या तारकामाच्या प्रवासातले टप्पे माझ्या पेजवर, फेसबुक भिंतीवर, इन्स्टावर टाकले होते.
हे काम करत राहणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे. दाखवणे हा ही. ते सर्व टप्पे याच धाग्यात आहेत.

Keywords: 

कलाकृती: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग १

प्रिय मैत्रिणींनो,
एक आनंदाची बातमी..
जर्मनीतल्या हॅनोवर शहरात सिनियर केअर होममध्ये रेसिडेन्ट सायकॉलॉजीस्ट म्हणून मला नोकरी लागली. ती सुरू होऊन आता 3 आठवडे झाले. रोजचा दिवस वेगळा आणि अनेक आठवणींनी भरलेला असला, तरी
कालचा दिवस माझ्यासाठी स्पेशल होता.. त्यानिमित्ताने काल लिहिलेला लेख शेअर करते आहे.

कथाकथी - बालकथा - चिमण्या आणि डोंगर ( ऑडीयो कथा )

ऑडीयो कथा इथे ऐकता येईल

कथा - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू

निसर्गकथा : चिमण्या आणि डोंगर

हिवाळा सरत आला तसं चिमण्यांची दाणे शोधायची ठिकाणं दूरदूर व्हायला लागली. आसपासची सगळ्या शेतांची कापणी झाली. कुरणातले दाणेही संपत आले. म्हणजे अगदीच काही संपले नाहीत पण जास्त चिमण्या आल्या तर मात्र पावसाळा सुरु होई पर्यंत पुरले नसते. दूर दूर जाऊन खरंतर छोट्या चिमण्या दमून जायच्या.  आता जवळच्या जवळ एखादी खाण्याची सोय करायला हवी हे सगळ्यांनाच वाटत  होतं.    

Keywords: 

लेख: 

माझा शिकाशिकवा हा विणकाम शिकण्याचा ब्लॉग आता सर्वांसाठी खुला

नमस्कार
आज मी माझा शिकाशिकवा हा ब्लॉग सर्वांसाठी खुला करते आहे. गेली सात वर्षे हा ब्लॉग सशुल्क होता. जगभरातील अनेक जणींनी याचा लाभही घेतला. अजूनही घेत आहेत.

आजच्या परिस्थितीत मला असा वाटल की आपणही काही करावं,. या द्रूष्टीने आज हा ब्लॉग मी ओपन टू ऑल करते आहे. आज पासून कोणीही या ब्लोगवरती जाऊन विणकाम शिकू शकेल. आशा आहे हा उपक्रम काहींना विरंगुळा देईल, सद्यस्थितीतील ताणतणावांना सामोरे जाताना हा छंद तुम्हाला मदतीचा ठरेल. शुभेच्छा !
https://shikashikava.blogspot.com/

Keywords: 

लेख: 

कथाकथी - बालकथा - स्पृहतारका ( ऑडीयो कथा )

एक नविन प्रयोग!
खालील कथा गंमतगोष्टी ब्लॉगवर इथे ऑडीयो किंवा कथाकथन स्वरुपात ऐकता येईल.

सध्या कोरोना विषाणुच्या साथीमुळे सगळेच घरात आहेत, किंवा घरून काम करत आहेत. घरात राहीलं की मुलांनाही काहीतरी वेगळं हवं असतं, त्यांचा वेळ जात नाही पण त्याचवेळी पालकांना सतत मुलांबरोबर खेळणंही शक्य नाही त्यामुळे हा एक नविन प्रयोग !

Keywords: 

चैत्र~Lock-down

चैत्र लागलाय, पालव्या फुटल्या आहेत, कैऱ्या लगडल्या आहेत, कोकीळ रंगात येऊन गातोय, गुलाब फुलले आहेत, भवताल घमघमतोय,
पण हे सारं सहन होइना,
ती वाट पाहतीये...
फक्त एका पत्राची!
पतीया न भेजे हो रामा..... कानात earplugs आहेत कलापिनी ताई चैती गतायेत. चैती- चैत्राचं गाणं.
घरातच अडकून पडायचा चैत्र यंदाचा. मैत्रीण अवघडलीये आठवा सरेल. तिला फोनवरच कविता ऐकवली मर्ढेकरांची:
बाळगुनी हा पोटी इवला गोळा, हसशी प्रसन्नतेने;
साकारुनी दे निराकृतीला विरूपता तव तन्मयतेने

लेख: 

बालकथा - झॅप आणि झूप

प्राणीकथा : झॅप आणि झूप

एक होत छोटस तळं. हिरव्यागार रंगाच्या पाण्याचं , चहूबाजूला गर्द झाडी असणारं. त्या तळ्यात होती इवलाली लाल कमळे. आणि पाण्यात खालीसुध्दा खूपखूप पाण वनस्पती होत्या.
अशाच एका पाण्यातल्या पानाला एक अगदी चिमुकलं अंड चिकटलं होतं, पारदर्शक आणि आणि आत एक चिमुकला केशरी ठिपका. आणि त्याच्या जवळच्या दुसऱ्या पानाला अजून एक अंड होतं, तेही पारदर्शक पण आतला ठिपका होता काळा. आता बऱ्याच वेळ एकमेकांच्या बाजूला राहिल्याने त्या अंड्याच्या आतल्या केशरी ठिपक्याने शेजाऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

"अरे तू कोण होणार आहेस रे अंड्यातून बाहेर आल्यावर?"

Keywords: 

चिकू मिल्कशेक (कथा)

त्याने हातातला लोणी माखलेला, कुरकुरीत पावाचा शेवटचा तुकडा हळूच प्लेटमध्ये ठेवला आणि समोर खाली मान घालून, शांतपणे हळूहळू जेवणाऱ्या तिच्याकडे पाहिलं. गळून पातळ झालेले पण हनुवटीएवढ्या बॉबमध्येही छान दिसणारे तिचे काळेपांढरे केस, त्याला कायम प्रेमात पाडणारे तिचे निरागस करवंदी डोळे, हल्ली त्या डोळ्यांखाली कायमचा काळसर रंग चिकटलाय, घराबाहेर न पडल्याने क्रेप पेपरसारखी चुरमटलेली पातळ गोरी त्वचा, तिच्या बारीकश्या लाल टिकलीखालची याआधी फक्त चिडल्यावर चमकून जाणारी हिरवट शीर आता कायमची उठून दिसायला लागली होती. कमी हिमोग्लोबीनमुळे ओठ फिकुटले होते.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS