स्टँडअप कॉमेडी

परवा धाराशी बोलताना तिने कोणतातरी स्टँडअप कॉमेडी व्हिडीओ खूप छान आहे असे सांगितले. तो कोणता ते विसरले म्हणून तिला विचारणार होते तर लक्षात आले हा मस्त टॉपिक आहे चर्चेला. छान डेटाबेस गोळा होईल.
तुम्हाला कोणाची कॉमेडी आवडते? इकडे लिहूया.. धारा तू कोण म्हणत होतीस ते लिही गं इकडे.

मला आवडलेला: वीर दास. एक्झॅक्ट शोचे नाव आठवत नाही. नेटफ्लिक्सवर होता. भयंकर हसले होते मी. थोडे जोक्स व जेस्चर्स १८+ असतात ही वॉर्निंग. पण फार मस्तय!
दुसरा हसन मिनाज!

खजूर+अंजीर बर्फी किंवा लाडू

साहित्यः

- खजूर ५०० ग्रॅम (सुपर मार्केट मध्ये बिया काढलेल्या असलेलं पॅक घेतले होते)
- अंजीर २०० ग्रॅम (ताजे फळं नाही, ड्राय फिग चे पॅक)
- सुका मेवा - काजू, बदाम, पिस्ता प्रत्येकी मुठभर (तसे अंदाजे पंचे)
- ओट्स एक छोटी वाटी
- राजगिरा ( ऑप्शनल, पण मी टाकला होता)
- डेसिकेटेट कोकोनट

कृती
- काजू, बदाम, पिस्ता हे कढई मध्ये रोस्ट करून घ्यावे आणि थंड झाल्या वर मिक्सर मधून ओबड धोबड वाटून घ्यावे. ( १-२ दा च घुर्र)
- ओट्स ही थोडेसे रोस्ट करून (हाताला गरम लागतील तितकेच) आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून १-२ दा च घुर्र

पाककृती प्रकार: 

अनारसे (न) हासरे

डोक्यात काहीतरी नवीन खूळ येतं आणि ते शांत बसू देत नाही. मागच्या वर्षी लेकीकडे युएसएला गेलो होतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. वाचून वाचून किती वाचणार आणि पाहून पाहून किती टीव्ही बघणार? नवरात्र झाल्यावर इंडियन स्टोअरमध्ये गेलो तर मराठी/भारतीय फराळाच्या पदार्थाने व दिवाळीच्या सामानाने दुकाने भरलेली, सजलेली होती. डाॅलर किंमती म्हणजे त्याचे रुपयांतर बघून डोळे विस्फारले. त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात व चविष्ट पदार्थ घरी करता येऊ शकतो, असा ठराविक पिढीजात ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार आला नाही तर... असं कसं बरं व्हावं...???

Keywords: 

लेख: 

शिकणं...

लहानपणी घरातले शाळेत सोडून जातात
तेंव्हा दोन पर्याय असतात समोर. एकतर आजूबाजूला रडणाऱ्या सगळ्यांसारखं भोकाड पसरून रडणे किंवा पाणी डोळ्यातच थोपवत शाळा सुटायच्या घंटेची वाट बघणे.
आपण दुसरा निवडतो. खरंच किती शिकतो ना स्वत:कडूनच?

परीक्षा देत देत मोठे व्हायला लागतो
एखादा पेपर जातो अवघड. वाटत झालं आता, मार्क्स कमी पडणार आणि ते तसे पडतातही.
वडील सहामाहीच्या प्रगतीपुस्तकावर सही करताना काही म्हणत नाहीत पण ते मार्क्स आपल्याच डोळ्यात खुपतात
मग पुढच्या चाचणीत आपण त्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ते जेतेपदाच्या निशाणीसारखे मिरवत आणतो प्रगतीपुस्तकावर.

लेख: 

ImageUpload: 

मी वाचलेलं पुस्तक : थ्री डॉटर्स ऑफ चायना

पुस्तकाचं नाव Wild Swans : Three daughters of China
लेखिका Jung Chang
प्रकाशक Publisher: Simon & Schuster; ISBN-10: 0743246985 ISBN-13: 978-0743246989

cord cutting...

आमची गेल्या काही वर्षात सीझन्ड कॉर्डकटर्स होण्याकडे वाटचाल चालली आहे. कॉर्ड कटींग म्हणजे केबल वगैरे बंद. आमचीही वाटचाल करण्यामागे दोन कारणे आहेत अर्थात. १) पैसे वाचवणे. २) आयुष्यातील noise  कमी करणे. सेन्सरी ओव्हरलोड कमी करणे.

इकडे अमेरिकेत विशेषतः केबल भयंकरच महाग आहे! ४०-५० $ पासून सुरवात होत १००-१५०-१८० $ असं कितीही वाढू शकते बील. ह्यामध्ये साधारण १० पासून २५०-४५० इतके चॅनल्स बघायला मिळतात.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

ऑथेंटीक थँक्सगिव्हिंग रेसिपीज

यावर्षी पहिल्यांदाच ऑथेंटिक थँक्सगिवींगचा घाट घालतेय. इंटरनेटवर प्रचंड रेसिपीज आहेत. कुणाला खात्रीशीर स्टेप बाय स्टेप रेसिपीज माहिती आहेत का? किंवा एखादा ब्लॉग वगैरे. रोस्टेड टर्की, ग्रीन बीन्स कॅसरोल आणि कॉर्न कॅसरोल रेसिपी हवी आहे. बाकी मॅश्ड पोटेटॉज, ग्रेवी, क्रॅनबेरी सॉस येतो मला. पाय बाहेरुन विकत आणेन.

पाककृती प्रकार: 

तुर्की - खाना-पीना-जीना - ४ तातलंलार (desserts)

माणसांमुळे डोळे अतीगोड (चोक तातलं) :fadfad: होऊन निवलेच आहेत तर आता जीभ गोड करण्याकडे वळूया. तुर्की दोन खंडांच्या काठावरचा देश असल्यामुळे एशियन आणि युरोपियन पदार्थांचा अगदीच गोड संगम झाला आहे. त्यामुळे शाकाहारींसाठी तर गोडाचे भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. अगदी आपल्या गोडाच्या शिऱ्यापासून ते स्पॅनिश चुरोपर्यंत सगळंच त्यांनी आपलंसं केलं आहे.

Keywords: 

लेख: 

हॉंगकॉंग भेट - टिपा लिहा

शीर्षक वाचूनही इथे आलेल्या शूर मुलींचा मी जाहीर सत्कार करेन म्हणते Heehee ... शालेय जीवनात ज्याने अंत बघितला पण लिहून संपला नाही असा प्रश्न :वैताग: पण घाबरू नका इथे फक्त तुम्हाला टिप्स लिहायच्या आहेत . आपण एखादया ठिकाणी फिरायला जात असू तर तिथे करायचं शॉपिंग ,फिरायची ठिकाणं, फूड, डूज डोन्ट साठी इथे मदत मागूया.

सुरवात मी करते
Hongkong डिजनी लॅन्ड फिरायला जातोय ,5 दिवसाची ट्रिप असणार आहे त्यातले 2 दिवस डिजनी मध्ये असू , 1 दिवस ओशन पार्क .
मी व्हेज असल्याने सोबत ठेपले ठेवायचा सल्ला मिळाला आहे . माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे, प्लिज हेल्प

Keywords: 

सोपी बेसनबर्फी

आमच्या इथे ..म्हणजे आमिर सुलतान इस्टेट मध्ये दिवाळी जोरात असते .. फराळ पण जोरात .. रितू भाबी चकली करणार म्हणाल्या .. (एकदम PHD लेवल नको ) कांचन करणार डेसिकेटेड कोकोनट चे लाडू (ह्या.. हे फारच सोपे ) ..कौसल्याभाबी फरसाण (शप्पथ .. ते पण घरी करता येत का ).. आज हजारवेळा आई आठवली .. कसं असतं ना .. आपण option ला टाकलेलं नेमकं पेपरला येतं तसंच झालं माझं.. दिवाळी फराळ कधी सिरिअसली घेतलाच नाही .. इकडे बोका आस लावून बसलेला काहीतरी दिवाळीचं मिळेल म्हणून .. आईला फोन केला तर ती आधी फिसकन हसली .. अस्सा राग आला ना .. आपुनकाभी स्वाभिमान हय .. हम्म. नको करू मदत .. गुगल आहे सोबत ..

पाककृती प्रकार: 

Planning your trip? Need some help?

Thanks to the internet and new technology, international travel has become easier and more accessible for all. No more trips to a travel agent for visas, tickets and travel itinerary. Everything is available at our fingertips. Numerous websites help in making plans and getting reviews from fellow travellers about the place you want to visit.

Keywords: 

तुर्की - खाना-पीना-जीना - ३ इचेजेक्लार (पेय)

पीss लूं!!

नाही नाही, इम्रान हाश्मी अंगात आला नाहीये अजून! एवढं ओरडतेय फक्त ड्रिंक्ससाठी. आज जरा घसा ओला करूया. तुर्क अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही प्रकारची पेये पितात. आधी नॉन-अल्कोहोलिक पासून सुरू करू:

चाय: तुर्की चायबद्दल सगळं काही आधीच ब्रेकफास्टच्या भागात सांगून झालं आहे. येता, जाता, बसता, उठता चाय पित राहणे हे तुर्की जीवनाचे सार आहे!

Keywords: 

लेख: 

संसारोपयोगी माहिती संकलन

माझ्याकडे संसारोपयोगी माहिती येत राहते ती इथे अपडेट करत जाइन. तुम्ही पण लिहा.
ह्यासाठी मला कोनाक डूनही कसले ही मानधन मिळ त नाही. किंवा ही झाइरात नाही.

किडे कीटक नाशक फवारणी साठी सर्विस उपलब्ध आहे.

१) अल्ट्रा पेस्ट कंट्रोल
बेयर पेस्ट कंट्रो अलाइअन्स २०१९ आय एस ओ ९००१ : २०१५ सर्टि फाइड कंपनी.

रविवारी उपलब्ध आहे.
२२ वर्शांचा अनुभव
बाइक स्वार तंत्रज्ञ
बर्ड प्रूफिन्ग नेट पण हे लोक लावुन देतात.

सध्या एक वर्शा साठी २००० रु. मध्ये काँट्रॅक्ट उपलब्ध आहे.
कॉल साठी नंबरः ९५ ९४९४ ००००/ ८४ २४८९ ७७७७

Keywords: 

लेख: 

तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश पद्धतीचे वांग्याचे भरीत)

तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. थोडा बाबा गनुष च्या मार्गाने जाणारा पण यात तीळाचा वापर होत नाही. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.
मूळ पदार्थाचे नाव Yoğurtlu Patlican Salatasi.

साहित्य:

पाककृती प्रकार: 

तुर्की - खाना-पीना-जीना - २ येमेकलार (जेवण/मेन कोर्स)

एवेssट, आतापर्यंत इतका जड काहवाल्ती पचला असेल समजून जेवणाकडे वळूया. ब्रेकफास्ट इतका दमदार केल्यामुळे तुर्की जेवण तसं सोपं असतं. दुपार आणि रात्रीच्या जेवणातले पदार्थ तसे आलटून पालटून सारखेच असतात.

Keywords: 

लेख: 

NaturZest ® - नेचरझेस्ट - नैसर्गिक उत्पादनांचा ब्रॅण्ड - नवीन रुपात

हाय मैत्रीणींनो,
ऑगस्ट पासून  एका नवीन व्यवसायात हात घातला आहे.

100% नॅचरल प्रोडक्ट, essential ऑइल रिलेटेड गोष्टी आवडतात शिवाय कोकणातील उत्पादनाबद्दल काहीतरी करायचे असा विचार होता. काजू आणि नारळाच्या बागाही आहेत त्यामुळे नारळाशी संबंधित व्यवसाय करायचे असेही काहीसे डोक्यात होते.
गेल्या काही महिन्यात सगळ्या गोष्टी जमून आल्यात आणि नवीन ब्रँड सुरु केलाय. 


नेचरझेस्ट  ( NaturZest ® ) 

लेख: 

तुर्की - खाना-पीना-जीना - १ काहवाल्तं (breakfast)

आता तुम्ही म्हणाल मला वेड लागलंय, पण मी खरंच प्रेमात पडलेय. तुर्की आवडती माणसं (उफ्फ!), तिथली घरोघरी, रस्तोरस्ती फिरणारी अती माणसाळलेली, गुबगुबीत कुत्रे-मांजरं, आजूबाजूचे फेसाळते निळे पाणी आणि खारा वारा, इस्तंबूलमधली बडबडी, चमकधमक गर्दी ते अंताल्यामधली दूरवर पसरलेली डोंगरापर्यंत मऊ शांतता.

इस्तंबूल
FB_IMG_1571584099002.jpg

अंताल्या
1394823554700.jpg

Keywords: 

लेख: 

पुण्याचं हे न ते: १. मराठी भाषा

हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.
शुक्रवार पेठेत राहात असताना आमच्या प्रमोदबनमधे एक मराठी होती. समोरच्या पारेकर टेलरच्या दुकानात एक वेगळी मराठी होती. त्याहून वेगळी समोरच्या वस्तीतली होती. रात्री येडा अप्पा (वेडा नव्हे. येडाच) दारू पिऊन यायचा आणि रस्त्यावर मधोमध बसून अभंग म्हणत दुनियेला शिव्या द्यायचा. त्याच्या शिव्या पण वारकरी ढंगाच्या होत्या.

Keywords: 

मतदान माझा हक्क

मतदान माझा हक्क
हक्का बक्का नका होऊ
आम्ही सारे भारतीय
विचारांनी एक होऊ.....

पक्षचिन्ह ? पदचिन्ह ?
स्वच्छ पडलीत ऊन्हं
तळपेल सूर्यतेज
नको नको प्रश्नचिन्ह ....

झालं जन जागरण
जगायचं साधारण
पथ प्रगती समोर
होवो विकासीकरण....

विचारांची देवघेव
घडवेल हा बदल
आशावाद ही कायम
नको हा दल बदल ....

आम्ही काय करायचं
बोटाला शाई लावायचं
त्यांनी राज करायचं
सर्वांना जगू द्यायच .....

विजया केळकर ______

कविता: 

कथा

मैत्रीणवरील कथा, लघुकथा इत्यादींचे संकलन!

स्वनिर्मित वायर ज्वेलरी - ट्री ऑफ लाईफ

प्राचीन काळापासून दागिने बनवताना हिरे आणि इतर प्रेषियस जेमस्टोन्स शरीरावर धारण करण्यासाठी प्रेषियस आणि नॉन प्रेषियस धातूंचे पत्रे आणि तारा वापरल्या गेल्या. भारतात आपल्याकडे फक्त धातूच्या तारा वापरल्या जाण्याचा प्रमाण कमी असलं तरी आपल्यालाही ते नवीन नाही (गळ्यात घालायच्या चेन्स बनतात की आपल्याकडे) आणि जगालाही ते नवीन नाही.

नाती तुटताना

नात्यांची एक्स्पायरी आता मला हळूहळू मान्य व्हायला लागलीये..

पूर्वी तुटतंय असं वाटलं की ते टिकवण्यासाठी अतोनात धडपड सुरू व्हायची.. हल्ली जे जसं होतय तसं होऊन द्यावं असं वाटतं.. गैरसमज नकोत यासाठी थोडा प्रयत्न असतोच..
पण तेवढंच..

लोणच्यासारखं मुरलेलं नसेल तर तुटणारच.. त्याला तर गैरसमजाची पण गरज नाही आणि मुरलेलं असेल तर कित्येक काळ एकमेकांशी बोललं नाही तरी सगळं परत पहिल्यासारखं पहिल्याइतकं सुरळीत.. मधला काळ जणू नव्हताच..

पण तरी तुटताना त्रास होतोच..
मला तरी..

Keywords: 

लेख: 

इन्क्टोबर (Inktober 2019)

इन्क्टोबर (Inktober 2018)

मैत्रिणींनो... कलाजगतामधील पवित्र महिना ऑक्टोबर उजाडला आहे आणि त्यासोबत आपलं इन्क्टोबर चॅलेंज ही :ड
मला गेल्या वर्षभरात ठरवूनही हातात पेन-पेन्सिल धरण्याचे सातत्य राखता आलं नाही तर किमान हा एक महिना तरी जमतंय का बघू. :)
गेल्या वर्षी मैत्रिणवर इन्क्टोबरला उदंड प्रतिसाद मिळाला. आता यावर्षीही त्याहून जास्त प्रतिसाद येऊ देत. :)

तर चला चला पेन, ब्रश उचला आणि चित्रं काढायला सुरुवात करा.
३१ तारखेपर्यंत, ईंक वापरुन रोज एक चित्र... Cool

नवीन मैत्रिणींनी इन्क्टोबरच्या अधिक माहितीसाठी वरील लिंक बघावी.

Keywords: 

कलाकृती: 

गुलमोहर

गुलमोहर

रणरणत ऊन, घामामुळे होणारी चिडचिड, भरं दुपारी फार नसला तरी तीन चार किलोमीटरचा करावा लागलेला प्रवास, अगदी नको वाटतं होतं. काम पण तसंच महत्त्वाचं होतं त्यामुळे बाहेर पडण्या शिवाय काही पर्याय नव्हता. कसलं ते ऊन, रस्त्याने जाणारा येणारा चांगलाच होरपळत होता.
माझ्यासारखी सगळ्यांचीच इच्छित स्थळी पोहचण्याची घाई, खरं तर गारव्याच्या ठिकाणी पोहचण्याची घाई. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवजा दुकानात पेपरने हवा घेणारापण् जगातला सर्वात सुखी माणूस भासतं होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची सावली म्हणजे टप्प्या टप्पाणे हातात आलेल सरकारी अनुदान.

लेख: 

कारभारीण

भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शकतो याचं नेहमीच कोडं पडायचं तिला. सगळेच त्याच्या प्रेमात. अर्थात गाऱ्हाणे सांगणारेही असंख्य. पण गाऱ्हाणेही त्यालाच सांगतात याचा अर्थ तो ते समजून घेऊन सोडवू शकतो म्हणूनच. त्याला भेटायला यायचं म्हणून एका तालात पावलं टाकणारे, त्याच्या नामाचा जयघोष करणारे वारीतले हजारो जीव बघितले कि उर दडपून जायचा एखाद्याचा. पण तो तो आहे. आपल्या अगणित लेकरांना पाठीशी घालणारा, त्यांच्या असंख्य चुका पदरात घेणारा आणि तरीही त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा. द्वारकाधीश श्रीकृष्ण.

लेख: 

ImageUpload: 

सोहळा

देही विरुन भोगावे देह मिलन सोहळे
तुझेमाझे एकोपावे काही नुरावे सोवळे

सारे गंध सारे श्वास कानी पडू नये गाज
अंगोपांगी लपेटावे स्पर्श थरार कोवळे

थोडी माया थोडे प्रेम काही स्मृतिचे विभ्रम
धावे देहसुखा मागे मन मोकाट आंधळे

देह चांदण गोंदण मन तांबडा निखार
डोरल्यात मिरवेन असे मोती नि पोवळे

पाने

Subscribe to मैत्रीण RSS