युध्दाचीडायरी दिवस कुठलातरी
त्या संध्याकाळी आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो. Men in Blue आमच्यासाठी बंकर मध्ये आनंद घेऊन आले. खुशीतच झोपायला गेलो. शांत होते जरा म्हणुन रूमवर गेलो झोपायला. याला सकाळी पाचला मॉर्निंग शिफ्ट ला जायचे होते. रात्री दोन च्या आसपास जाग आली प्रचंड मोठ्या स्फोटांच्या आवाजाने. भोंगा वाजू लागला. इन्स्टावर अधिकृत चॅनेल वर कुठे काय झाले कोणीतरी टाकतेच. त्यात समजले आमच्या कंपनी जवळ ड्रोन लोकवस्तीच्या मध्ये पडले आहे. लोक दगावले आहेत. मोठी आग लागली होती. एक तर छोटेसे दोन महिन्याचे बाळ....
चक्रावला असशील ना हे पत्र पाहून ?
ठाऊक आहे मला. म्हटला असशील, आता हिचे आणखी काय नवीन ? आयत्या वेळी कशा बरे नेमक्या काहीतरी शंका? वगैरे वगैरे..
नाही, शंका वगैरे नाही. आपण उद्यापासून एकत्र रहायला सुरुवात करणार, त्याधी मला हे तुला लिहून द्यायचे होते. बोलूही शकले असते पण हे मला कागदावर उतरवायचे होते. आपण काही लग्न करत नाही आहोत. ना सप्तपदी, ना टोस्ट (आजकालच्या लग्नात करतात तसे). तसे आपल्या बाबतीत काहीच कन्वेन्शनल नाही ना? तसेच हे पत्रही समज. आपल्या एकत्र राहण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला हे अपडेट करत राहायचे आहे..म्हणूनच हा पत्राचा उद्योग.
राणीमाशीनंतर आपण आता कामकरी माशीबद्दल माहिती घेऊ. (Worker Bee).
पोळ्यात सगळे काम कामकरी माश्या करतात हे ऐकुन होते. पण नेमके काय काम करतात आणि त्यांचा जीवनक्रम कसा असतो हे कळल्यावर माझा जबडा द मास्कमधल्या जिम कॅरेसारखा जमिनीवर पडुन गडाबडा लोळायला लागला. :)
मुळात मधमाशी हे प्रकरणच थक्क करणारे आहे आणि त्यातल्या कामकरी माश्या तर एकदम जबडापाडू आहेत.
आपण या प्रचंड कामसु माशीचा जन्म कसा होतो ते आधी पाहुया.
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ! /\
माझे आजोबा मला म्हणायचे "वाणी प्रसन्न आहे तुझ्यावर, सुपारी खात जाऊ नकोस. शारदेला रुष्ट करू नकोस." वाणी म्हणजे नेमकं काय हे आताही कळालेलं आहे की नाही माहीत नाही. वाणी म्हणजे आपल्या मुखातून (किंवा लेखनातून) बाहेर येणाऱ्या शब्दांतील ऊर्जा असावी... कदाचित.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा....
कोणाला?
ज्यांना ल आणि ळ यातला फरक कळतो आणि ते स्वच्छ स्पष्ट म्हणता येतात त्यांना,
ज्यांना नळ आणि बाण म्हणणं बरोबर आहे हे पटतं त्यांना,
ज्यांना पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी चुकीची दिली कि डोळ्यात खुपते त्यांना,
ज्यांना श च्या जागी ष आणि ष च्या श लिहिलेला बरोबर करावा वाटतो त्यांना
आणि
ज्यांना "चा टाक" म्हणणं तितकंच बरोबर वाटतं जितकं "चहा ठेवतेस का" त्यांना,
ज्यांचं "बारं मग ठिऊ का" कानांना गोड वाटतं त्यांना,
ज्यांची "काय पावनं कुणीकडंनं आलायसा" अशी मनापासून आपुलकी असते त्यांना,
आज फ्रीजमध्ये अगदी पाव वाटी खवलेला नारळ उरला होता, त्याला मार्ग दाखवायचा म्हणून रिल्समध्ये दिसलेली वाटपाची डाळ आठवली. आमच्याकडे अशी डाळ कधीच करत नाहीत म्हणून वाईच insta खंगाळलां!
साहित्य:
कुकर साहित्य:
तूरडाळ: १ वाटी
मध्यम कांदा: अर्धा चिरून
मध्यम टोमॅटो: १ चिरून (कैरीच्या सीझनमध्ये टोमॅटो अर्धा आणि दोन तुकडे कैरी)
दोन हिरव्या मिरच्या: उभ्या चिरून (तिखट प्रेमींनी जास्त म्हणजे तीन चार घ्या)
अर्धा चमचा हळद
थोडे मीठ
मधमाशीची शरीररचना आपण समजुन घेतली. आता मधमाशीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊया.
राणी, कामकरी व नर अशा तिन जातीच्या माशा पोळ्यात असतात. प्रत्येक पोळ्याची राणी एकच असते, नर दोन तिनशे असतात आणि कामकर्या हजारो असतात. एका निरोगी पोळ्यात साधारण विस हजार ते ऐंशी हजार मधमाशा असतात. बाहेर फुलोरा असतो म्हणजे मुबलक अन्न असते तेव्हा पोळ्यात मधमाश्या भरपुर असतात, बाहेर हिंवाळा किंवा पावसाळा असतो म्हणजे अन्न उपलब्ध नसते तेव्हा मधमाशांची संख्या रोडावते. पोळ्यात साठलेल्या मधावर गुजराण करायची तर जास्त लोकसंख्या असुन चालत नाही.
मधमाशीच्या घराची ओळख झाल्यावर आपण आता मधमाशीची ओळख करुन घेऊ. ही माहिती सर्व माश्यांना सारखीच लागू पडत असली तरी माश्यांचे आकार त्यांच्या प्रजातीनुसार लहान मोठे असतात. मधमाशीवरचे बहुतांश संशोधन अॅपिस मेलिफेरावर झालेले आहे. ही युरोपियन माशी आहे पण भारतातही आढळते. आपली भारतीय माशी अॅपिस सेरेना जिला महाराष्ट्रात सातेरी म्हटले जाते. ही मेलीफेरापेक्षा लहान आहे आणि तिच्यावर फारसे संशोधन अद्याप झालेले नाही. मधमाश्यांच्या प्रजातीबद्दल जास्तीची माहिती आपण नंतरच्या भागात घेऊया.
मधमाशी हा किटक अखिल मानवजातीला लाभकारी आहे असे गेले कित्येक वर्षे ऐकत आहे. मधमाशी संपली तर चार वर्षात मानवही पृथ्वीवरुन संपेल असे एक वाक्य अल्बर्ट आईनस्टाईनच्या नावावर खपवले जाते. मला शेतीत रस असल्याने मधमाशीबद्दल आकर्षण होते पण ते सोडता बाकी काही माहिती नव्हती.
तर, सोमवारची संध्याकाळ. दिवसभराच्या ऑफिसच्या कामाचा, ताणाचा क्षीण अंगात पसरलेला. काहीशा विष्ण्ण मनस्थितीतच टीव्ही चालु केला. घरात अंधार, मनात अंधार, विविध कारणांमुळे. प्राइमवर मनोज वाजपेयी दिसला. टायटल न वाचता, चित्रपट आहे का सिरीज आहे काही न बघता चालु केला. मनोज वाजपेयी असेल ते सर्व काही बिनधोक बघावे हा नेहमीचाच विचार.
फिरत्या चाकांवर आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो त्याला आपण जनरली प्रवास म्हणतो. पण त्या व्यतिरिक्त हि आपल्या आयुष्यात काही प्रवास नकळतपणे घडत असतात.
आपल्या विचारांची बैठक अनुभवांनी बदलते. शरीरयष्टी बदलते. आपण कसे दिसावे या बद्दलचा प्रवास पण हळू हळू बदलत जातो.
काळ्याकडून पांढऱ्याकडे (केस) - हा एक खूप मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. भल्या भल्यांना तो शिफ्ट मारताना त्यांची स्थिती दोलायमान होते.
साध्या शब्दांत सांगायचं तर, मशीनच्या बाबतीत मेंटेनन्स मोड म्हणजे नवीन काही तयार करणं, वेगाने धावणं, सतत सिद्ध करत राहणं थांबवणं.
नवीन अपडेट्स थांबवणं. फक्त आवश्यक तितकंच काम करणं. काही बिघाड झाला असेल तर तो तपासणं. जुन्या फाईल्स मेमरीतून काढून टाकणं आणि स्वतःला स्थिर कसं ठेवायचं हे पावलोपावली ठरवणं.
माणसाच्या आयुष्यातसुद्धा असा एक मेंटेनन्स मोड येणं गरजेचं असतं ....... आणि तो येतोच.
उपवासाबद्दल सांगण्याआधी ते का करावेसे वाटले ह्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. होपफुली कुणाला तरी ह्या अनुभवातुन 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ' ह्या उक्तीप्रमाणे फायदा होईल.
नवं बिग बॉस सुरू झाले आहे.दोन चार अॅक्टर्स वगळता सगळा इन्फ्युएन्सर्स मामला आहे. रितेश देशमुखच आहे होस्ट, सो ते एक चुकलंच त्यांचं! बघुया पुढे काय होते..
तर... पहले मुझे मेथी की भाजी बिलकुल पसंद नहीं थी. मेथी सुनकर ही मैं भाग जाती थी!
फिर एक दिन मेरी बेस्टी ने उसके घर में बनने वाली मेथी खिलाई और.. मैं फॅन बन गई :) मैत्रीण श्रीरामपूरची असल्याने मी तिथली म्हणते, पण नगर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे अशी भाजी करतात.
तर ही साधी, गावरान मेथीची भाजी शेतावर भाकरी केलेल्या तव्यातच शक्यतो पटकन केली जाते. खुपजणी करतही असतील, मी हॉस्टेलला मैत्रिणीने केल्यापासून नेहमी करते.
उतड धाग्यावर वृंदाने लच्छीच्या मोराची आठवण काढली. मग मला 17-18 वर्षांपूर्वी माबो दिवाळी अंकासाठी लिहिलेलं काहीतरी आठवलं. ते इथे आणायला योग्य आहे असं वाटलं. मलाही माझं लिखाण परत वाचायची गरज होतीच.
------
एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.
खूप दिवसापासून एखादा हलकाफुलका / अगदी डोके बाजूला काढून ठेवता येइल असा कार्यक्रम बघावा अशी इच्छा होत होती. नेटफ्लिक्सवर "डायनिंग विथ कपूर्स" नावाचा कार्यक्रम दिसला. अगदी १ तासाचा असल्याने फार कंटाळा येणार नाही आणि टाइमपास होइल ह्या आशेने चालू केला.
राज कपूरच्या १०० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या नातवाने अरमान जैन कपूर कुटुंबियांसाठी एक जेवण आयोजित केले होते. अरमान जैनने कपूर कुटुंबियांचे आवडीचे पदार्थ, राज कपूर ह्यांच्या पत्नी कृष्णा कपूर ह्यांच्या रेसिपीज स्वतः बनविल्या होत्या. शशी कपूर आणि शम्मी कपूर ह्यांच्या काही कुटुंबिंयानीसुद्धा येथे हजेरी लावली होती.
गेली काही वर्षे कोकणपट्ट्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रवास झाला की शक्य झाल्यास तिथल्या नव्वारी(किंवा थोडी कमीजास्त पण काष्टा असलेली) नेसण्याच्या पद्धती गोळा करण्याचा माझा प्रयत्न असतो.
2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सारीज:ट्रॅडिशन अँड बियॉण्ड या रिता कपूर लिखित संदर्भग्रंथात मराठी साड्यांच्या संदर्भात याप्रकारचे किंचित योगदान दिले होते त्यानंतर हे काम मी सुरू केले.
माझ्या पत्रिकेत परत एकदा पक्षीनिरीक्षणासाठी परदेशगमनाचा योग असावा. ॲागस्टच्या सुरूवातीला अचानकच एका पक्षीनिरीक्षक मित्राचा मेसेज आला की ॲाक्टोबरमध्ये बोर्निओ, मलेशियाला एक पक्षीनिरीक्षण ट्रीप आखतोय, तुला येण्यात इंटरेस्ट आहे कां? बरोबर कोण कोण आहे विचारल्यावर कळलेली नावं डायरेक्ट ओळखीची नसली तरी अगदी अपरिचितही नव्हती. योगायोगाने तारखाही जमण्यासारख्या होत्या. त्यामुळे एकाच वर्षातल्या दुसऱ्या पक्षीनिरीक्षणाच्या ट्रीपचा मोह टाळू शकले नाही व होकार कळवला. बऱ्याच जणांचे बोर्निओचे फोटो बघितले होते पण माझा तिथे जाण्याचा योग असा इतक्या पटकन येईल असं वाटलं नव्हतं.
८० च्या दशकातील गोष्ट. मी ७/८ वर्षांची असेन. नव्या इमारतीत राहायला आलो होतो आम्ही. मला दोन प्रकारच्या मैत्रिणी होत्या. माझ्या पेक्षा ४ ५ वर्षांनी मोठ्या आणि माझ्या वयाच्या. मोठ्या मैत्रिणी खूप सुंदर रांगोळी काढायच्या. माझ्या वयाच्या मैत्रिणी मध्ये एकीला मोठ्या चुलत बहिणी होत्या. ती पण छान रांगोळी काढायची. मला छान रांगोळी काढावीशी वाटायची आणि मनात असंही वाटायचं कि येईल आपल्याला.
हॅनोवर, जर्मनीतील सिनियर केअर नर्सिंग होममध्ये काम करत असतांना काही वेळा अशी व्यक्तिमत्व मला भेटतात, जी बघून मला वाटतं की मी त्यांची सायकॉलॉजिस्ट आहे की ते माझे? काल ज्यांच्याशी ओळख झाली, त्या आज्जींबाबतीत मला असंच वाटलं. ११.११.४४ अशी युनिक जन्मतारीख असलेल्या या जर्मन आज्जीही अतिशयच युनिक आहेत.
या महिन्यात १० ऑक्टोबरला आमच्या संस्थेत दाखल झालेल्या या आज्जी त्याच दिवशी माझी सुट्टी सुरू झाल्याने माझ्या संपर्कात येऊ शकल्या नाहीत.