मैत्रिण माध्यमातून झालेली मैत्रिण - कस्तो आणि माझ्यात एक बारीक धागा समान आहे, तो म्हणजे गिर्यारोहण, निसर्ग पालथे घालणे, कँपिंग याची आवड, असं आपलं मी समजते! अर्थात ती मंडळी भलभलते हाईक्स करतात, ते माझ्या आवक्याबाहेरचे असल्याने...सामाईक आवड वगैरे कस्तो समजणार नाही!! पण तरी आपण एकदा एकत्र बॅककंट्री कँपिंग करुया असं आमच़ कधीतरी बोलणं झालेलं. आणि नेमके तिच्या फॅमिलीचे आणि आमचे वेगवेगळे ट्रीप्सचे प्लॅन्स (जे वेगवेगळी जंगलं भटकणे हेच होते, ते त्या दोन्ही ठिकाणी सध्या जंगल-आगी चालू असल्याने कॅन्सल झाले आणि अचानक आमचे एकत्र जायचे ठरले.
भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्या जणींना खूप शुभेच्छा
तिरंग्याचा मान, त्याची शान अबाधित राहील अशीच काम आपल्या सगळ्या जणींच्या हातून होऊ देत
स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला काय वाटतं, स्वातंत्र्य दिनाच्या काही आठवणी, स्वातंत्र्य म्हणजे आपल्यासाठी काय, स्वातंत्र्याकडून आपल्या असलेल्या अपेक्षा असं काहीही लिहिण्यासाठी हा धागा
आपल्यापैकी अनेक जणी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राण वेचले अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या संपर्कात आलेल्या असतील अशा नशीबवान बायकांनी त्या आठवणी आवर्जून लिहा
नमस्कार मैत्रिणींनो, मी साधना. सध्या आंबोली ह्या पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशिल म्हणजे हॉटस्पॉट असलेल्या खेड्यात राहते व शेती करते. मला निसर्गाची ओढ पहिल्यापासुन होती व कुंडीत रोपे लावता लावता कधीतरी शेती करायची ईच्छा मनात आली आणि लॉकडाऊनमध्ये तिला मुर्तस्वरुप आले. थण्ड हवा व अतीवृष्टी यामुळे आंबोलीला शेती करणे खुप कठिण आहे. इथे लोक जितकी होते तितकी शेती करुन त्यात समाधान मानतात. मलाही हेच करावे लागतेय/लागणार. तरी त्यातल्या त्यात इथे काय काय होऊ शकते याचा अभ्यास करुन प्रयोग करत राहायचे असे ठरवले आहे.
बिग बॉस मराठी एकदाचं सुरू झालं बाबा! त्यावर गप्पा मारूया.
वर्षा उसगावकर, पॅडी, अभिजीत सावंत असे नावाजलेले कलाकार आहेत, काही कलर्सच्या सिरियल्सचे कलाकार आहेत तर इतर काही इन्फ्लुएन्सर्स (टिकटॉक किर्तनकार, कोकणकन्या, मराठी रॅपर, रशियन (मराठी बोलणारी) डान्सर, स्टँडप कॉमेडियन्स वगैरे आहेत..)
रितेश देशमुख सध्या तरी फार प्रभावी नाही वाटला, कदाचित मांजरेकरांचा प्रभाव जास्त आहे..
परभणीजवळ आहे साडेतीन हजार वस्तीचे केरवाडी गाव. इथे आहे सूर्यकांतकाका कुलकर्णी व माणिकताई कुलकर्णी यांच्या स्वप्नातून उभी राहीलेली ‘स्वप्नभूमी’! शेकडो अनाथ मुलांना आत्तापर्यंत सांभाळून, पालनपोषण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत करणारा.. अनाथाश्रम? नव्हे नव्हे हे तर घर आहे, त्या मुलांसाठी ही आहे स्वप्नभूमी!
(तुम्हा सगळया मैत्रीण सदस्यांपर्यंत त्यांचे कार्य पोचवावं असं वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. माझे आईबाबा नुकतेच तिकडे जाऊन सर्व पाहून अनुभवून आले, तेव्हा त्यांनी माणिकताई व सूर्यकांतकाकांशी संवाद साधला – तो असा.)
या वर्षातले पहिले बॅककंट्री कॅम्पिंग वेज माउंट लेक या आमच्या घरापासून काही तासंवर असलेल्या लेक काठी केले.
हा लेक अल्पाईन लेक आहे, आजूबाजूच्या माउंटन्स वरची ग्लेशिअर्स या लेकच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहेत. या लेकच्या काठावरुन ग्लेशिअर अगदी जवळून बघता येते. अर्थात, इथे जायला बराच खडतर ट्रेक करून जावं लागतं. साधारण सहा किलो मिटरमधे जवळपास चारहजार फूट उंची गाठायची असल्यामुळे हा ट्रेक करणं फार दमवणारं आहे. त्यामुळं आम्ही तिथं दोन दिवस कॅम्पिंग करायचं ठरवलं होतं. माझ्या नवऱ्याने -शशीने इथल्या लोकल माउंटेनिअरिंग क्लबच्या मेंबर्ससाठी ही फॅमिली फ्रेंडली ट्रिप ठरवली होती.
शेवटी नऊ वाजता मोठ्ठ्याने घोषणा झाली, टिम टिटिएच, गेट रेडी फॉर समीट !!
त्याक्षणी खरं तर नक्की काय वाटत होतं सांगणं कठीण आहे. आज ( किंवा एकूणच ) जायला मिळावं म्हणूनची इच्छा, आता जायचंय म्हणून जरा अस्वस्थता, जमेल ना म्हणून थोडी चिंता + केदारची काळजी असं सगळं एकत्र जाणवत होतं.
केदारला डुलकी लागली होती, त्याला उठवलं. तो लगेच येस्स म्हणून उठून बसला. आधी स्लिपींग बॅग्ज गुंढाळून कडेला करुन ठेवल्या. दोघांचं सामान नीट वेगळं करुन आधीच ठेवलं होतं म्हणून गडबड होत नव्हती.
मी जे वाचन केलं त्यात होतं की ही कँपसाईट झोपलेल्या स्त्रीच्या पायासारखी दिसते म्हणून नाव लेडी लेग. मग झोपलेल्या पुरुषाचा पाय असा काय वेगळा दिसतो ते कळेना ! तर मुल होतांना स्त्रीचे पाय जसे असतात तश्या त्या टेकड्या दिसतात म्हणून लेडी लेग !!! हे अर्थात लक्षात येत नाही. वरुन, आकाशातून दिसत असेल.
माऊंट फ्रेंडशीप हा पीर पंजाल रेंजेसमध्ये कुलू भागात येतो.. फ्रेंडशीप पीक हे एक्सपिडीशन आहे, म्हणजे सोप्या शब्दात टेक्निकल ट्रेक. ट्रेकींग गिअर्स वापरुन करायचा ट्रेक. पीक ची ऊंची ५,२९० मीटर्स म्हणजे १७,३५३ फूट. ऊंची एक्सपिडीशन्सच्या मानाने फार नसली तरी हा 'कठीण' कॅटेगरीत येणारा आहे कारण जवळजवळ वर्षभर शिखरावर असणारं बर्फ.
आम्ही पहीलं केलं ते स्टोक कांगरी पण एक्सपिडीशनच होतं., पण तेव्हा तसं काही असतं असं काहीच माहिती नव्हतं. मागच्या वर्षी बाली पास केल्यावर आता दरवर्षी एक तरी ट्रेक करायचा प्रयत्न करायचाच असं पक्कं ठरवून ठेवलं आहे.
मी परत आले तोवर नियमीत पाऊस सुरू झाला होता. नाचणी रुजुन आली होती पण शेतात कोणी गेले नसल्याने तण नियंत्रण राहिले नाही, परिणामी गवत कुठले व नाचणी कुठली हे कळणे मुश्किल झाले. नाचणीला जास्त ओल राहणारी जमिन चालत नाही, चिखलणी करुन नाचणी लावली जात नाही. चिखलात नाचणी रोपे कुजणार. मी जो तुकडा शिल्लक ठेवला होता त्यावरचे पिक म्हणजे चवळी वगैरे मी काढुन घेतली होती. पाऊस पडल्यावर तिथले तण भराभरा वाढले होते. ते आता हाताने काढणे खर्चीक झाले असते. त्यामुळे नाचणी लावायचा बेत रहित केला. उगवुन आलेली नाचणी गरजुंना देऊन टाकली.
जेहत्ते कालाचे ठायी
हर दुसरा मनुष्य जाई
हिमालयावरी पायी
ट्रेक लागी ।।
आले तियेच्याही मना..
तीव्र झाली कामना
सिद्ध झाली ललना
ट्रेकला जाण्या ।।
वाचा तियेची तयारी
कैसी झाली सवारी
फजिती ही न्यारी
झालीच ना ।।
ट्रेक पूर्ण जाहला
जीव थंडावला
तुम्हालागी आणला
वानोळा हा ।।
१५ एप्रिल, त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.
आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,
"इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु?
हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु?
मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना,
कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।"
- वृंदा टिळक
ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती.
सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली.
रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते.
ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना!
आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.
हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.
कोकणात आंब्याच्या मोसमात आमच्याकडे कोयाडे खूपदा केले जाते, पण त्याचा हा गोवन चुलतभाऊ एकदा करून बघायचा होता. 'घोट ' म्हणजे रायवळचे लहान गोलसर आंबे. पिकल्यावर आंबटगोड चव लागणारे आणि बाठीला भरपूर रेषा असणारे कुठलेही लहान गावठी आंबे चालतील. हापूस चुकूनही नको. (तोतापुरी तर नकोच नको, त्याला मी आंबाच म्हणत नाही. आंब्याच्या बाबतीत आहे बाबा मी रेसिस्ट!!)
सध्या घरी मला आवडतात म्हणून आलेली एकच पायरीची पेटी सगळ्या हापूसमधून टुकटुक करत होती. मग त्यातलेच तीन आंबे घेतले. खाणारी दोनच माणसं म्हणून!
नुकत्याच केलेल्या भारतवारीत पुण्यात आठवडाभर होते. तेव्हा एक दिवस झपूर्झा म्युझिअमला जाण्याचा योग जुळून आला. फार सुंदर म्युझिअम आणि संपूर्ण परिसर, आणि अनुभव! त्या अप्रतिम अनुभवाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते.
बावधान भागातून साधारण ४०-४५ मिनीटे अंतरावर खडकवासला तलावाच्या काठावर, निसर्गरम्य परिसरात हा म्युझिअम उभारला आहे. दागिन्यांकरीता प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ यांचा हा उपक्रम आहे. त्यांच्या वेबसाईटवरून ही माहिती इथे पोस्ट करते.
चाळीशी ते साठीच्या दरम्यान आयुष्य निरर्थक वाटणं, ध्येय किंवा उद्दिष्टांबाबत गोंधळ होणं किंवा ती नाहीत असं वाटणं, आपल्या अपेक्षेनुसार एखादं नातं उंचीवर गेलं नाही ह्याची तळमळ वाटणं, आपण आता जे करत आहोत त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात शोधत बसणं. आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना न स्वीकारता आल्याने दिशाहीन वाटणं, धड तरुणही नाही आणि धड म्हातारंही नाही अशी शरीराची सुद्धा चढावरून उताराला लागायची सुरुवात नकोशी वाटणं. वरवरच्या कलकलाटात आतून रिक्त वाटत रहाणं - याला ढोबळपणे Mid life मधली तगमग म्हणता येईल. पण हे याच वयात अशाच पद्धतीने व्हायला हवं याला काही आधार नाही.
गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.
चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.
Rheinland Pfalz - ह्राईनलांड फाल्झ हे जर्मनीच्या दक्षिण भागातलं एक राज्य. आम्ही वेगळ्या राज्यात असलो, तरी गाडीने दहाव्या मिनिटाला आम्ही या पलीकडच्या राज्यात पोचतो इतकं ते जवळ आहे. याच राज्यातल्या एका मार्गाचे नाव आहे Deutsche Weinstraße - जर्मन वाईन रोड. द्राक्षांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या राज्यात, Schweigen-Rechtenbach या फ्रान्स बॉर्डर जवळच्या गावापासून सुरू होऊन Bockenheim पर्यंत साधारण ८५ किलोमीटर रस्ता हा जर्मन वाईन रोड म्हणून ओळखला जातो.
पूर्वतयारीचा वेळ:
१ दिवस प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे लागणारे जिन्नस:
नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) - दोन वाट्या
उकडा तांदूळ - दोन वाट्या
उडीद डाळ - एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.
शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. गावठाण वाडीतल्या म्हणजे आमच्याच वाडीतल्या बायका सगळ्या मावशीच्या मैत्रिणी. केवळ मावशीमुळे त्या माझ्या शेतावर कामाला यायला तयार झाल्या. या बायका नियमीत मजुरीवर जाणार्या नव्हत्या. गावी वनखात्याची नर्सरी आहे, त्यात अधुन मधुन कामाला जाणार्या या बायका. त्यांना शेतातल्या कामाचा तितकासा अनुभव नव्हता. पण तरीही त्या प्रेमाने यायच्या. अर्थात मी मजुरी देत होते.
ऊस लावायच्या आधी जमिनीची मशागत करुन घेणे गरजेचे होते. जमिन दोन वर्षे पड होती, त्यामुळे सर्वत्र गवत व छोटी झुडपे माजली होती. शेतात फिरताना पायाला जमिन दगडासारखी घट्ट लागत होती. ऊसाच्या ऊभ्या सऱ्या पायाला लागत होत्या म्हणजे इतक्या भयंकर पावसातदेखील माती विरघळली नव्हती, दगडासारखी घट्ट झाली होती. वर्षानुवर्षे रासायनिक शेती केली कि जमीन अशीच दगड होते.
जुन २०२० ला मी आंबोलीला सहकुटूंब राहायला आले तरी प्रत्यक्ष शेती सुरू करायला डिसेंबर २०२० उजाडले. मला शेतीचे ज्ञान शुन्य! शेतीत रस निर्माण होऊन सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची ओळख झाल्यावर काही शेतांना भेट दिली होती. शेतीनिगडीत वाचन सुरू होते. पाळेकर गुरूजींची तिन, दोन दिवसीय शिबीरे करुन झाली होती, त्यांच्यासोबत एक शिवारफेरी झाली होती. त्यांचे व इतरांचे शेतीविषयक यु ट्युब चॅनेल्स पाहात होते. तरीही गच्चीत केलेल्या कुंडीतल्या शेतीचा अनुभव सोडता प्रत्यक्ष अनुभव मात्र शुन्य होता. अनुभव मिळणार तरी कसा? हाती जमिन नाही तर शेती करणार कशी??