अमेरिकेची सफर - भाग २ - प्रयाण

विकेंड हाताशी होता तेव्हा घरातल्या झाडांची सोय लावणे, गार्डन मध्ये रोज पाण्याचा टायमर लावून ठेवणे अशी सगळी कामं झाली. प्रवासात सोबत म्हणून ठेपले करून घेतले. कितीही प्लॅन केला तरी शेवटी काहीतरी फ्रिज मध्ये राहतं, ते वाया जाऊ नये म्हणून एका भारतीय मित्राच्या घरी देऊन आलो. सोमवारी सकाळी लवकर उठून, घरातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून, गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवास सुरु झाला. विमानप्रवास आता नवीन राहिलेला नाही, पण एवढ्या वर्षात ११ तास एकाच विमानात असा प्रवास कधीही केला नव्हता, तो यावेळी होता. फ्रांकफुर्ट हून थेट Los angeles आणि तिथून Las Vegas ५० मिनिटे असा प्रवास होता.

Keywords: 

अमेरिकेची सफर २०२५ - भाग १ - पूर्वतयारी

गेल्या बारा वर्षात युरोप मध्ये बरीच भटकंती झाली. Schengen करारांतर्गत जर्मनीत राहून आजूबाजूचे अनेक देश फिरू शकलो, कारण वेगळा Visa लागत नाही. दोन वर्षांपूर्वी युके मध्ये जाऊन आलो, तेव्हापासून आता भविष्यात अमेरिकेत सुद्धा जाऊ कधीतरी, या विचाराने उचल खाल्ली. तिथल्या काही जागा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेतच, पण मुख्य तो देश अनुभवण्याची इच्छा होती. त्यासोबत बरेच मित्र मैत्रिणी पण तिथे आहेत त्यांची भेट होऊ शकेल असंही वाटायचं. तिथे भारतीय पदार्थ मिळतात, इथल्या पेक्षा जास्त प्रकार आणि चांगले असंही ऐकलं होतं, तेही अनुभवायचं होतं.

Keywords: 

३० दिवसांचे कोलम चॅलेंज

मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पाडव्यापासून ३० दिवस रोज कोलम काढण्याचे चॅलेंज घेतले होते. अर्थात वहीत. ठिपके जोडण्याची सवय असल्याने अजुन रांगोळी पावडर वापरून कोलम जमत नाहीये.

img_1792.jpeg

img_1810.jpeg

img_1814.jpeg

Keywords: 

रहस्य - हस्तलिखित खलित्याचे

असे राघवराव, मीराताई आणि मित्रमंडळ आपल्या देशांत हवे असतील तर त्यांना तयार करणारे बहिर्जी नाईक आधी हवे आहेत. ही कथा काल्पनिक आहे आणि जुनी आहे!

लेख: 

ऑनलाईन खरेदी आणि मी

मी एकटी राहते म्हणून मला माझ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी सोप्या कशा होतील याकडे फार लक्ष द्यावं लागतं.
उदाहरणार्थ, पार्सल येणार असेल आणि मी नेमकी अंघोळीला असेन किंवा बाहेर जाणार असेन, तर मला डिलिव्हरीवाल्याला फोन करून सांगावं लागतं – "पार्सल सिक्युरिटीकडे ठेव", "शेजारी दे" वगैरे. त्याला हे आधीच कळवणं गरजेचं असतं, कारण मी बाहेर गाडी चालवत असेन आणि त्याच वेळी त्याने मला फोन केला, तर तो गोंधळेल आणि त्याचा वेळ वाया जाईल – हे टाळणं हेच माझं उद्दिष्ट असतं. मग शेजाऱ्याला सांगणं, डिलिव्हरीवाल्याला नेमकी वेळ विचारणं – यात बराच वेळ जातो.

Keywords: 

लेख: 

रोजची रांगोळी

मी गेले काही दिवसांपासून दारापाशी रोज रांगोळी काढते. कारण विशेष काही नाही. सातत्याने काही करायची सवय लागावी म्हणून, बघताना छान वाटतं म्हणून, हात - बोटांना व्यायाम घडावा म्हणून. मी रांगोळ्या मनाने काढत नाही. मला आवडतात, तशा भूमितीतले आकार असलेल्या, ठिपक्यांच्या आणि छोट्या रांगोळ्या असणार्‍या वेबसाईट मी शोधून काढल्या आहेत. इथे लिंक देते.

Simple rangoli by priya
https://www.youtube.com/channel/UC9DgQp-gquQcqP4lPCDynfQ

कलाकृती: 

पालखी

घरची, दारची, सासरची, माहेरची सगळी माणसं, गुरं, प्राणी पक्षी सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा"..

गाऱ्हाण चाललं होतं. आणि डोळे भरून आले. घरी पालखी आली होती. ४ ५ वर्षांनंतर. इतकी वर्ष ऐकलेली आणि इतरांच्या रिल्स वर पाहिलेली पालखी आमच्या घरी आली होती. देव  घरी आले होते. घाईत होते तरी थोडा वेळ थांबले. पाहुणचार करून घेतला, विसावले आणि मग पुढच्या घरी निघाले.
palkhi.jpg

Keywords: 

कोकण शिमगा

मला कोकणातल्या शिमगा आणि पालखी बद्दल माहिती हवी आहे
कोकणात होळी झाल्यानंतर देवाची पालखी निघते आणि घरोघरी जाते. देव घरी येतात. मला असलेल्या माहिती प्रमाणे सुगीचा हंगाम संपल्याची जाणिव करुन देणारा असा हा सण आहे. वेगवेगऴ्या समजुतीं प्रमाणे गावातील भुतखेत पळवुन लावण्या साठी पण असे घरोघरी देव येतात.
ह्यच्याशी संबधित गोष्टी नक्कीच असतील. कुणाला माहित असतील तर सांगा. मला वरील माहिती पेक्षा जास्त माहिती नाही मिळाली

नी ब्रॅण्डची दशकपूर्ती उर्फ Twisted Tales

अनेकींना कदाचित आठवत असेल 2015 च्या एप्रिलमधे मी माझा नी हा ब्रॅण्ड सुरू केला. एका कानातल्यांच्या कलेक्शनने सुरुवात केली होती.
सात वर्षे पूर्ण होताना म्हणजे एप्रिल 2022 मधे मी दागिन्यांपासून दूर जाऊन ताराचित्रे, मिक्स मिडिया यात उतरले.
आता दशकपूर्तीच्या निमित्ताने मी पुढचे पाऊल टाकते आहे. माझी तारा व मिक्स मिडिया चित्रे यांचे एकल प्रदर्शन पुण्यात करते आहे.
तारखा आहेत 8-13 एप्रिल. रोज सकाळी 11 ते संध्याकाळी 8. उदघाटन: 8 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता.
स्थळ: पी. एन. गाडगीळ & सन्स, हॅपी कॉलनी शाखा, कोथरूड, पुणे

Keywords: 

बिएनवेनिदोस अ कोलंबिया

कोलंबिया म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यात लगेच काय येतं तर तिथली गुन्हेगारी आणि ड्रग्जसाठी ओळखला जाणारा एक बदनाम देश. कोकेन बनवणारा सगळ्यात मोठा देश आहे हा.

झेनडूडल वर्कशॉप अनुभव

२९ जानेवारीला ह्या वर्कशॉपची जाहीरात दिसली. वेळ पाहिली तर वर्कशॉपला थोडा वेळ होता. त्यांनी दिलेला वॉट्सअ‍ॅप गृपमध्ये सहभागी झाले.
ऑफीसमध्ये एकीकडे कामांची मोठी यादी होती. घड्याळाकडे लक्ष ठेवून होते.
ऑफीसमध्ये सगळं साहित्य नव्हतंच. प्रिंटींग पेपर वापरायचा ठरवलं. बॅगमध्ये पेन होताच. पेन्सिल, खोडरबर हाताशी होतेच. सहभाग महत्वाचा हे स्वतःला सांगत मी झूम मिटींग जॉईन केली.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

उग्गानी

लागणारा वेळ: १० मिनिटे

लागणारे जिन्नस:
चुरमुरे,
पंढरपुरी डाळे,
मिरची,
आलं,
लसूण,
कांदा,
टोमॅटो,
कोथिंबीर,
फोडणीसाठी मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, तेल

पाककृती प्रकार: 

अर्जिता, I will miss you!

<<<अर्जिता म्हणजे अशी गोष्ट / किंवा काही जे खुप मेहनतीने, धडपड करून मिळवलं - समथिंग विच ईज गेन बाय स्ट्रगल.
मी मुद्दाम हट्टाने नवर्‍याला नाव बदलून हे नाव ठेवायला लावलं. शोधलंही मीच.>>>

तिचं नाव तिनेच शोधलं ते बरं झालं कारण इतकं अचुक नाव तिच्या साठी इतर कुणालाच शोधता आले नसते. एखादी गोष्ट काय तिच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तिने धडपड करुन, लढा देऊन मिळवल्या होत्या. लग्न, नोकरीतील परदेशी जाण्याची संधी, थोरल्या लेकीचा जन्म, धाकट्या लेकीचा जन्म आणि दुसर्या गरोदरपणात झालेल्या कॅन्सर च्या निदानानंतर मिळालेलं उणपुर २.५ वर्षांच्या आतबाहेरच आयुष्य!

मुलुंड येथे 3bhk फ्लॅट विकायचा आहे

मैत्रिणींनो
मला मुलुंड येथे माझा 3BHK फ्लॅट विकायचा आहे
1- मुलुंड वेस्ट - सिटी ऑफ जॉय सोसायटी
2- फ्लॅट व बिल्डिंग ची सगळी अधिकृत कागदपत्रे आहेत.लोन मिळायला अडचण नाही
3- मला मोठं घर हवंय म्हणून मी जास्ती कार्पेट एरिया असणारं घर घेते आहे म्हणून हे विकायचं आहे - घरात लीकेज किंवा तत्सम काहीही त्रास नाही
4- सगळी कडून गार्डन व्ह्यू आहे

https://youtu.be/BHTXm2FzXMg?si=WZXRjBXBAJ_98s6B

8am Metro - गुलजार यांच्या कविता व दोघांची गोष्ट

मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते

तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास

आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस

तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती

जिझेल : शरम आणि हिंमत

या गेल्या तीन चार महिन्यात जिझेल पेलिकॉट ही ७२ वर्षांची 'साधीसुधी' आजी फ्रान्सच्या (आणि इतर जगाच्याही) पुरुषसत्ताक कायद्यांना आव्हान ठरली आहे. तिने तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर तिने एक महत्त्वाचं (आणि तसं साधंच) मत मांडलं - की शरम पलिकडच्या बाजूला वाटायला हवी - ज्याने अत्याचार केला, बलात्कार केला त्याला. शरम नाहीच, पण तिने दाखवली ती बिनतोड हिंमत.

लेख: 

श्रद्धांजली वाइज आउल

आपल्या वाइज आउल आता आपल्यात नाहीत अशी बातमी समजली आहे. हा धागा त्यांना शेवटचे निरोप लिहिण्यासाठी.
त्यांच्या लेकीला व इतर कुटुंबियांना पहाता यावा म्हणून हा धागा प्रतिक्रियांसकट खुला करण्यात येईल. दु:खद बातमीवरील प्रतिसाद इथे हलवले जाणार नाहीत. मैत्रीणवरून वा.आ.ना निरोप देताना त्यांच्या आठवणी, लक्षात राहिलेली वाक्ये आणि कुटुंबियांसाठी धीराचे शब्द एकत्र करण्यासाठी हा धागा आहे.

मैत्रीण टीमकडून वा.आ.ना श्रद्धांजली. त्या आपल्यात नाहीत यावर खरं तर अजून विश्वास बसलेला नाही. त्यांची कमतरता चांगलीच जाणवेल.

चीजकेक गुलाबजाम आणि चीजकेक ओरिओ- नो बेक वर्जन्स

मी विकेंडला ही दोन टाईपची डेझर्ट्स केली. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हवीत तितकी वेरिएशन्स करता येतील. ह्याची बेक वर्जन्सही करता येतात पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता.

साहित्य-
चीजकेक गुलाबजाम-
रुम टेंपला आलेलं क्रिम चीज, वितळलेलं बटर, मारी किंवा इतर डायजेस्टिव्ह बिस्किट्सचा चुरा, पिठीसाखर, व्हिपींग क्रिम, गुलाबजाम आणि ड्रायफ्रूट्चा चुरा.

पाककृती प्रकार: 

पंजाबी मेथी कढी

ही रेसिपी मी मध्यंतरी इन्स्टावर पाहिली आणि आवडली म्हणून करुनही पाहिली एका गेटूगेदरला. सगळ्यांना आवडली म्हणून शेअर करते आहे.

साहित्य- मेथीची एक जुडी (जितकी माणसं त्याप्रमाणे प्रमाण वर खाली करावं लागेल)
दही, डाळीचं पीठ, लाल तिखट, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, उभा चिरलेला कांदा, कमी तिखटाच्या लाल सुक्या मिरच्या, मेथी दाणे, जिरं, मोहरी, कढिपत्ता, हिंग, हळद, तेल, तूप, मीठ इत्यादी.

कृती- मेथी धुवून पानं काढून जाडसर चिरुन घ्यायची.
दह्यात डाळीचं पीठ, लाल तिखट, हळद, धण्याची पावडर वगैरे मिक्स करुन पाणी घालून फेटून घेऊन जरा पातळ करायचं.

पाककृती प्रकार: 

रे मना

माझा माझ्या मनाशी संवाद होत असताना अशाच सुचलेल्या चार ओळी

तुझ्याशी बोलले की मला मी अधिक आवडायला लागते
दैवाने खरंच सौंदर्य बहाल केलय हे पटायला लागते
तुझे हे असे प्रेम करणे हवेहवेसे वाटायला लागते
त्या प्रेमावर प्रेम करावेसे मलाही वाटू लागते
तुझ्याशी बोलताना, तुला मी दिसत असते आणि मलाही मीच दिसत असते
तू एक माध्यम आहेस, माझे स्वतःवरंच प्रेम करणे दिवसागणिक वाढते आहे
माझ्यासाठी तुझे अस्तित्व, माझ्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक भासते आहे.

कविता: 

दुधी - मूगडाळ भाजी

दोन - तीन माणसांसाठी, पटकन होणारी, सोपी भाजी!

साहित्य:
एक दुधी भोपळा
अर्धी वाटी मूगडाळ
दोन मोठे चमचे तेल
सहा सात लसूण पाकळ्या, एक उभी चिरलेली मिरची
चमचाभर - हळद, तिखट, गोडा/काळा मसाला, गुळ
चवीनुसार मीठ
एक बारीक चिरलेला टोमॅटो
थोडा खवलेला नारळ,
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१. दुधी धुवून, साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. लसूण, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.

२. मूग डाळ पाण्यात भिजवून ठेवा.

पाककृती प्रकार: 

पिठलं भाकरी टाको

मला भाकरी करायला जमत नाहीत. एका मैत्रीणीने उकड काढून लाटून करायला शिकवल्या. प्रयोग म्हणून केल्या, जमल्या. आजकाल ईन्स्टाग्राम वर छान छान प्लेटींग केलेले पदार्थ दिसत असतात, म्हणून माझाही एक प्रयत्न. असंच मज्जा.

आता भाकरी: मोदकाची उकड काढतो तसं १ कप ज्वारीच्या पिठासाठी १.५ कप पाणी उकळत ठेवायचं, एक चमचा तेल आणि चिमुट्भर मीठ घालून उकळी आली की पीठ घालून ढवळून झाकून ठेवून गॅस बंद करायचा. (मी सोहम चं पीठ वापरलं). १० मी नी मळून, लाटून भाकरी करायच्या. मी टॉर्टीया प्रेस/ पुरी प्रेस वापरला. छान भाजून घ्यायच्या. चक्क मस्त फुगल्या माझ्या! या प्रमाणात टाको च्या आकाराच्या १२ झल्या. येस १२.

पाककृती प्रकार: 

रसभरी बालूशाही

मोजक्या साहित्यात सर्वाना आवडेल अशी खात्रीशीर रेसिपी आहे. फक्त थोडा वेळ घेणारी कृती आहे. तर आता कृती सांगते.
साहित्य :-

पाककृती प्रकार: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS