छोटा पॅकेट बडा धमाका - केदारताल ट्रेक - शेवटचा भाग

मागच्या भागाहून पुढे..

ट्रेक दिवस ३

केदार खरक ते केदार ताल

अंतर अंदाजे ३ किमी

ऊंची १४,२०० फूट ते १५,५०० फूट आणि परत १४,२०० फूट

आजचा दिवस अगदी प्रसन्न उगवला होता.

साडेसात वाजता सगळे तयार झाले. डबे घेतले. खाऊ घेतला. नेहमीच्या घोषणा वगैरे देऊन निघालो. आजची चाल कठीण नव्हती, पण थकवणारी होती. किंवा कठीण होती पण परवा आणि काल जे चाललो त्यामुळे जाणीव होत नव्हती.

वाट चुकायला नको म्हणून रस्त्यात जागोजागे असे कॅरन्स रचलेले दिसतात

Keywords: 

छोटा पॅकेट बडा धमका - केदारताल ट्रेक -दुसरा आणि तिसरा दिवस

मागच्या भागाहून पुढे..

ट्रेक दिवस २

भोज खरक ते केदार खरक

अंतर अंदाजे ५ किमी

ऊंची : १२,८०० फूट ते १४,२०० फूट

सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच साडेचारला जाग आली. बाहेर थोडं फटफटलं होतं. लोक उठून गर्दी करायच्या आत टॉयलेट टेंटच काम आटोपून घेतलं. जमेल तसे दात घासले आणि बाहेरच बसून राहीले.

कँप हळू हळू जागा होत होता.

whatsapp_image_2025-05-31_at_7.06.08_am.jpeg

Keywords: 

छोटा पॅकेट बडा धमका - केदारताल ट्रेक

दरवर्षी एप्रिल महीना आला की आंब्यांचे वेध लागतात, मे अखेरीस पावसाचे, ऑगस्टमध्ये गणपती तसे डिसेंबर, जानेवारी आला की आम्हाला ट्रेकचे वेध लागतात. ( निबंधाची सुरुवात वाटते आहे ना ? )

तसेच ह्याही वर्षी, कुठे जायचं ? हा विचार सुरु झाला.

माझ्या मनात दोन जागा होत्या, पण त्यातल्या एकाची एकच बॅच होती, जी कोणास ठाऊक कधी फुल झाली होती आणि दुसर्‍याची तारीख जमेल असं वाटत नव्हतं.

मग माझ्या लिस्टमध्ये असलेले ट्रेक्स, त्याच्या उपलब्ध तारखा, त्यातल्या मला जमू शकतील अश्या तारखा ह्या सगळ्यांचा लसावि, मसावि काढून केदारताल नक्की केला.

Keywords: 

झुकिनीच्या काचऱ्या

झुकिनीचे प्रयोग करताना आवडलेला हा एक -

साहित्य

२ झुकिनी
२ मध्यम आकाराचे कांदे
३-४ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी - १ लहान चमचा मोहरी, हळद, धणेपूड,
हिंग
१ टिस्पून तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त)
गोडा मसाला

चवीनुसार मीठ
१ लहान चमचा गूळ

कृती -

कांदा उभा चिरून घ्या. झुकिनी धुवून अर्धगोल चकत्या करून घ्या.

पाककृती प्रकार: 

आठवणीतल्या हाका/आरोळ्या

मी तशी बर्‍यापैकी जुन्या आठवणींमधे रमणारी बाई आहे :) खास करुन लहानपणीच्या आठवणी. यामधे 'तो काळ विरुद्ध आजचा काळ' किंवा 'हा देश विरुद्ध तो देश' अशी कोणतीही तुलना नसते. माझ्यासाठी तो फक्त एक गोड nostalgia असतो. त्यामधे मला हमखास आठवण येते ती भारतात रहाण्याचा अविभाज्य भाग असलेली गोष्ट - रस्त्यावरुन येणार्‍या हाका, आरोळ्या, आवाज आणि त्यानिमित्तानी विविध लोकांशी होणार्‍या संवादाची.  

तुंगनाथ-देवरियाताल भाग-६

दिवस 5 -

आदल्या दिवशीच बॅग भरून ठेवली होती आणि आंघोळही उरकलेली होती. आज गंगेत पापं धुवून घ्यायची होतीच नंतर :P

शेवटचं merlin on केलं आणि काय आश्चर्य - स्वर्गीय नर्तक - indian paradise flycatcher चा आवाज capture झाला. ह्यालाही बघायला सिंहगड valley मधे जाणं होतं. पांढरी शेपटी शोधायला सुरु केलं पण झाडीत काही दिसत नव्हतं. निघेपर्यंत मी त्याला शोधत होते. Male नाही female दिसली असती तरी अत्यानंद झाला असता. ग्रेट बार्बेट मात्र एकदम जवळून दिसला.

Keywords: 

तुंगनाथ-देवरियाताल भाग-५

दिवस - 4

आदल्या दिवशी आंघोळ केल्यामुळे सकाळी कपडे बदलणे, पाणी आणि ORS च्या बाटल्या घेणे एवढंच काम होतं. 5 ला उठून अर्धा तासात आवरलं आणि अर्धा तास merlin ला कामाला लावलं. आपल्या इथे नेहमी दिसणारा magpie robin तिकडे क्वचित दिसणारा ह्या कॅटेगरीमध्ये होता. Warbler आणि Canary Flycatcher चा आवाज येत होता पण ते इतके बारके पक्षी आहेत आणि पिवळा रंग, झाडात कुठे लपले होते कोण जाणे.

शार्प 6 ला सगळ्या जणी ब्रेकफास्टला जमलो. Packed lunch ताब्यात घेतले. पुरी भाजी, ब्रेड-बटर असा बेत होता. थोडंसं खाऊन घेतलं आणि 6:30 ला प्रस्थान केलं.

Keywords: 

तुंगनाथ - देवरियाताल भाग-३

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ला निघायचं होतं, 7:30 ला ब्रेकफास्टसाठी खाली भेटणार होतो. आत्तापर्यंत सगळ्या ट्रिप्स आम्हीच प्लॅन केलेल्या असल्याने हे जरा नवीन होतं. बाकी वेळी आपण मनाचे राजे असतो, प्लॅन मागे पुढे करू शकतो. हाही एक अनुभव घेतला. आम्ही 5 च जणी होतो आणि सगळ्या वेळेच्या आधीच तयार असायच्या त्यामुळे वाट बघणे प्रकार नव्हता.
8-8:10 ला गाडी निघाली. एखाद तासाच्या अंतरावर शिवपुरी म्हणून ठिकाण आहे तिकडे सगळे adventure sports होतात. तिकडे गंगा नदीवरून जाणारं zip line करायचं होतं. मी नाहीच म्हणत होते पण सगळे कर कर म्हणत होते. मला वजनाची चिंता आणि खाली गंगा नदीचं टेंशन :D

तुंगनाथ - देवरियाताल भाग-२

पुणे - डेहराडून विमान एकदम वेळेत सुटलं आणि वेळेच्या आधीच पोचलं. पुणे विमानतळावर आमची एक सहप्रवासी आणि टूर लीडरबरोबर ओळख झाली. बाकीच्या दोघींचं डायरेक्ट विमान नव्हतं, त्या ऋषिकेशला हॉटेलवर भेटणार होत्या रात्री.

डेहराडून ऋषिकेश कॅबने एका तासाच्या आत पोचलो. हॉटेलमध्ये चेक-इन केलं. गंगा आरती बघायची होती पण बाहेर पडायला 6:30 झालेले मग लक्ष्मण झुला बघायला गेलो. तो सध्या बंद आहे कारण नवीन पुलाचं काम चालू आहे. गंगेचं पहिलं दर्शन इथून झालं. वाटेत दुकानं बघत उगाच टीपी केला आणि हॉटेलवर आलो. प्रचंड उकाडा होता ऋषिकेशमधे.

Keywords: 

तुंगनाथ - देवरियाताल ट्रेक - भाग १

मागच्या वर्षी दहावी झाल्यावर शिरीनने एक ट्रेक केला, त्याची खरेदी करायला decathelon ला गेलेलो तेव्हाच मनात आलेलं पुढच्या वर्षी एक तरी हिमालयन ट्रेक करायचा. मार्चपासून foliage, युवाशक्ती वगैरे sites बघायला सुरुवात केली. सुट्टी मिळेल अशा तारखांमध्ये foliage चा फुलारा, तुंगनाथ आणि अजून एक बद्रीनाथ जवळचा ट्रेक बसत होता. माझ्या बालमैत्रिणीला विचारलं ती पण तयार झाली. मग foliage च्या ऑफिसला भेट दिली तर फुलारा ट्रेकला जायचं तर टेंटमध्ये राहावं लागणार होतो. ते कितपत जमेल म्हणून मग तुंगनाथ ठरवलं, त्याचं बुकिंग आलेलं होतं त्यामुळे ट्रेक कन्फर्म होता. पैसे भरले आणि तयारी सुरु केली.

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग १३ - अंतिम

खरंतर मुख्य ट्रिप बद्दल मागच्या भागात पूर्ण लिहून झालं, पण एक सगळ्याचा आढावा म्हणून एक शेवटचा भाग लिहावा वाटला म्हणून ही पोस्ट.

पूर्वतयारी मध्ये लिहिलं होतं तसं ही ट्रिप थोडी comfort zone बाहेरची वाटत होती. एवढा लांबचा प्रवास करून जातो आहोत, तर अपेक्षा पूर्ण होतील का? म्हणजे कश्याला एवढा प्रवास करून एवढ्या लांब जायचं? इथेच अजून नवीन ठिकाणी जाऊ किंवा फक्त एखाद्या रिसॉर्ट मध्ये जाऊ हेही आधी वाटलं होतं. पण season, सुट्ट्या, बजेट, आधीच्या ट्रिप कुठे आणि कधी झाल्या आहेत हे बघून मग, अशी एखादी मोठी ट्रिप ठरते आणि सुफळ संपूर्ण होते तेव्हा समाधान वाटतं.

अमेरिकेची सफर - भाग १२ - Hoover Dam आणि परतीचा प्रवास

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचं मानलं जाणारं कोलोरॅडो नदीवर असलेलं हे धरण. सकाळी निवांत उठून निघालो. वेगास पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे धरण आहे, तिथे पोचलो, आधी गाडीची सुरक्षा तपासणी झाली, जी नावालाच होती. पार्किंग मध्ये गेलो तेव्हा cash दिली तर चालेल हे पहिल्यांदा पाहिलं, नाहीतर सगळीकडे कार्डच होते. गाडी पार्क करून त्यांच्या visitor center कडे गेलो. त्यांचे काही टूर आहेत ज्यात पॉवर प्लॅन्ट आणि धरणाचा परिसर दाखवतात. दोन पैकी जी लगेच होती ती बुक करून आम्ही निघालो. आधी एक लहान पाच मिनिटांची फिल्म दाखवली गेली.

अमेरिकेची सफर - भाग ११ - Cedar City to Las Vegas

सकाळी उशिरा उठलो, त्यामुळे हॉटेल मध्ये ब्रेकफास्टची वेळ संपली होती. तसंही पुन्हा तेच ब्रेड अंडी खाण्याची इच्छा नव्हती. मग इथे जवळपास काय आहे शोधलं. एक फ्रेंच बेकरी दिसली, तिथे जाऊ असं ठरवलं. पहिल्या ठिकाणी गेलो तर ते बंद होतं, जवळच त्यांची दुसरी शाखा होती असं दिसलं. तिथे आत गेलो तर कुणीच नव्हतं, म्हणजे लोकही नव्हते आणि काउंटर पलीकडे पण कुणीच नव्हतं. दोन मिनिट वाट पाहिली, कुणीच आलं नाही मग आम्हीच बाहेर पडलो.

अमेरिकेची सफर - भाग १० - Bryce National Park

पुन्हा एकदा चेक आऊट करून निघालो. आजही कुणी एक शब्दाने how was your stay? Was everything alright? वगैरे काहीही विचारलं नाही. एकीकडे टॉयलेट मध्ये small टॉक करणारे अमेरिकन भेटले Mosking आणि एकीकडे हे असे व्यवसायाचा भाग म्हणून सुद्धा काही इच्छा नसणारे वाटले.

अमेरिकेची सफर - भाग ९ - Antelope Canyon & Monument Valley

सकाळी ब्रेकफास्ट करायला गेले, तेव्हा एका अमेरिकन माणसाने गप्पा मारायला सुरुवात केली. Where are you from? या प्रश्नाचं उत्तर बरीच वर्ष बाहेरच्या देशात राहिल्यानंतर एका शब्दात देता येत नाही. मूळ भारतातून पण आत्ता जर्मनीहून आलो असं मी सांगितलं. जर्मनीत बऱ्याच ठिकाणी अमेरिकन आर्मी कॅम्प आहेत, तिथे तो दोन वर्ष होता, त्यामुळे त्या गप्पा झाल्या. रोज ब्रेकफास्ट मध्ये तेच ते प्रकार खाऊन कंटाळा आला होता, त्यामुळे थोडं खाऊन लगेच निघालो आणि १० मिनिटात ठरलेल्या ठिकाणी पोचलो. Antelope canyon - या जागेबद्दल फार उत्सुकता होती. भरपूर पैसे भरून टूर बुक केली होती.

Keywords: 

अमेरिकेची सफर - लेखमालिका

पार्श्वभूमी - गेली १२ वर्ष जर्मनीत वास्तव्य असल्यामुळे जर्मनी आणि युरोप मधल्या अनेक देशात भटकंती झाली. यावर्षी, एप्रिल २०२५ मध्ये पहिल्या अमेरिका भेटीचे योग जुळून आले, त्याबद्दलची ही लेखमालिका !

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग ८ - पेज (Page, Arizona)

आमच्या हॉटेल समोरच एक Glenn Canyon Dan Overlook अशी जागा आहे हे आम्ही वाचलं होतं. अगदी पायी चालत जाऊन पाच मिनिटांच्या अंतरावर. तिथे गेलो आणि सगळे लाल दगड दिसायला लागले. त्या रेषा रेषांचे, प्रत्येक थर वेगळा दिसूनही एकरूप झालेले दगड, त्याच दगडांचे डोंगर आणि त्यावरून उतरून गेलं की खाली पुन्हा दिसणारी कोलोरॅडो नदी, तिच्यावर बांधलेलं Glenn Canyon धरण, आणि त्यातून तयार झालेला Lake Powell असा सगळा तो परिसर, raw Nature. सगळी मोकळी जागा होती त्या परिसरात फिरायला, एक जागा वगळता कुठेही कठडे नव्हते, नदी प्रचंड खोल होती पण तरी सुरक्षित राहून बहुतांशी जागांवर जाता येत होतं.

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग ७ - Grand Canyon to Page

पुन्हा एकदा Grand canyon बघण्यासाठी आज उत्सुक होतो. हॉटेल मधला तोच ब्रेकफास्ट नको म्हणून Route 66 वरच्या एका कॅफे मध्ये थांबून खायला घेऊ आणि पुढे जाऊ असं ठरवलं. चेक आऊट करून निघालो. एक जाणवलेली गोष्ट म्हणजे चेक आऊट करताना रिसेप्शन वरचं कुणीही तोंडदेखलं सुद्धा How was your stay? किंवा Hope you enjoyed your stay असं काहीही विचारत नव्हतं. Las Vegas मधल्या hotel मध्येही हाच अनुभव होता. किल्ल्या द्या आणि निघा असा व्यवहारी मामला होता.

अमेरिकेची सफर - भाग ६ - Williams

पुढचा दिवस उगवला तो बर्फ घेऊनच. सकाळी उठून बाहेर पाहिलं तर थोडा थोडका नाही, भरपूर बर्फ पडत होता. नाश्ता करायला गेलो तर या हॉटेलने अजूनच निराशा केली. पुन्हा प्लास्टिक कटलरी, तेच मोजके पदार्थ आणि मुख्य सगळ्यासाठी अतिशय कमी जागा. बाहेर त्यांच्या आवारात एवढी निवांत जागा होती, मग ही ब्रेकफास्ट रुम एवढी लहान का? तिथे प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीच्या वेळी थोड्या प्रमाणात हे इतरत्रही अनुभवलं आहे, पण हे नक्कीच त्यापेक्षा जास्त त्रासदायक होतं. कसंबसं थोडंसं खायला घेऊन एक टेबल शोधून बसलो. आता स्नो असेल तर काय करता येईल यावर विचार केला.

अमेरिकेची सफर - भाग ५ - Route 66 and Grand canyon

Williams हे Route 66 वर असलेलं एक गाव, जिथे आमचा पुढचे दोन दिवस मुक्काम असणार होता. आम्ही तिथे जाताना आधी Vegas जवळ असणाऱ्या Hoover Dam बघून मग पुढे Grand canyon ला जाणार होतो. पण हवामानाचा अंदाज बघितला तर Grand canyon मध्ये थंडी वाढत होती, दुसऱ्या दिवशी पाऊस दाखवत होता. मग Hoover Dam नंतर करू, आज सरळ Grand canyon पर्यंत जाऊ असं ठरवलं. सकाळी लवकरच उठून निघालो.

अमेरिकेची सफर - भाग ४

हा अमेरिकेतला तिसरा दिवस होता, आलो तो दिवस वगळला तर हा दुसराच दिवस. अजूनही सकाळी खूप लवकर जाग येत होती, त्यामुळे सहा वाजताच ब्रेकफास्ट करून आलो. पुढच्या हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट काही वेगळा असेल तर बरं होईल असं ते खाताना सारखं वाटत होतं. मग थोड्या वेळाने आवरून पुन्हा टॅक्सी करून विमानतळावर असणाऱ्या कार Rental area मध्ये पोचलो. तिथे एकाच ठिकाणी दहा वेगवेगळ्या रेंटल कंपनीजची ऑफिसेस होती. प्रत्येक ठिकाणी गर्दी होती, बरेच जण विमान प्रवास करून लगेच गाडी घ्यायला आले होते, आम्ही लांबचा प्रवास असल्या मुळे एक दिवसानंतर आलो होतो. गाडी घेण्याबद्दल या आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे, ती इथेच देते.

अमेरिकेची सफर - भाग ३ - लास वेगास

सकाळी, खरंतर पहाटेच जाग आली आणि खूप भूक लागली होती. तासाभरात ब्रेकफास्ट साठी जाऊ म्हणून सहा वाजण्याची वाट बघितली आणि आवरून ब्रेकफास्ट करायला गेलो. बरं अमेरिकेत बाथरूम मध्ये आंघोळीसाठी fixed shower head आहेत, युरोपात Hand shower आहेत ज्यामुळे केस ओले होण्याची काळजी नसते. मी हे ऐकून होते आणि शॉवर कॅप घेऊन गेले होते पण एकूणच Hand shower प्रकार आंघोळीसाठी किती सोयीचा आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. बरं हॉटेल वाल्यांनी पण शॉवर कॅप दिली नव्हती. या गोष्टीसाठी अमेरिकेचा एक मार्क कमी केला. Wink

अमेरिकेची सफर - भाग २ - प्रयाण

विकेंड हाताशी होता तेव्हा घरातल्या झाडांची सोय लावणे, गार्डन मध्ये रोज पाण्याचा टायमर लावून ठेवणे अशी सगळी कामं झाली. प्रवासात सोबत म्हणून ठेपले करून घेतले. कितीही प्लॅन केला तरी शेवटी काहीतरी फ्रिज मध्ये राहतं, ते वाया जाऊ नये म्हणून एका भारतीय मित्राच्या घरी देऊन आलो. सोमवारी सकाळी लवकर उठून, घरातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून, गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवास सुरु झाला. विमानप्रवास आता नवीन राहिलेला नाही, पण एवढ्या वर्षात ११ तास एकाच विमानात असा प्रवास कधीही केला नव्हता, तो यावेळी होता. फ्रांकफुर्ट हून थेट Los angeles आणि तिथून Las Vegas ५० मिनिटे असा प्रवास होता.

Keywords: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS