पेंग्विन्स शहरी आले हो

penguin-1.jpg

मी लहान असतांना टी.व्ही. वर केल्विनेटरच्या रेफ्रिजरेटरची जाहीरात यायची. त्यांचा ब्रँड अँबॅसेडर होता अॅनिमेटेड पेंग्विन पक्षी. त्या केल्विनेटरच्या फ्रीजमधून तो पेंग्विन थंडीने कुडकुडत बाहेर यायचा आणि 'दॅट वॉज द कूलेस्ट वन' असं बोलायचा. तेव्हापासून पेंग्विन म्हटलं की 'ठंडा ठंडा कूल कूल' हेच फिलिंग येतं माझ्या मनात.

सृजनाच्या वाटा: 

वाट

वाट

वाट कशी सापडावी, घनदाट तिमिरी
जायचे जीवन गंगेच्या पैलतीरी ...

वाट कशी सापडावी, चांदण्यांच्या बाजारी
चंद्र नसे उभा शेजारी ...

वाट कशी सापडावी, लाल रणांगणावरी
समीर सांगतो 'लाल' बुडाला समरी ...

वाट कशी सापडावी, केशरी क्षितीजावरी
करावा जौहर तो निजला अंकावरी ...

वाट कशी सापडावी, प्रखर प्रहरी
सावलीही काकुळतीने पाय धरी ...

वाट कशी सापडावी, स्वप्नपटलावरी
जगते रहोचा गजर करी पहारेकरी ...

वाट कशी सापडावी, डोळे मिटल्यावरी
वाट आपोआप सापडावी डोळे मिटल्यावारी .....

वाट

वाट सरळ,
वाट नागमोडी वळणाची.

वाट कधी आपलीच वाट लावणारी,
दमवणारी,
आपली परीक्षा बघणारी,
असंख्य खाचखळग्यांची.

तर कधी मोरपिसाप्रमाणे,
अलगद नेणारी.

आपल्या प्रवासात,
आपल्या वाट्याला,
वाट कधी कशी येईल,
सांगता येत नाही.

आपण मात्र चालत राहायचं असतं,
मिळेल त्या वाटेवरून प्रामाणिकपणे,
नवीन जोमाने, उत्साहाने, प्रयत्नपुर्वक,
आपले ध्येय गाठण्यासाठी.

लकेर

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

Keywords: 

कविता: 

झेन टॅन्गल

काल अनन्याने हे चित्र नेट वर बघून काढलं

IMG-20170428-WA0006.jpg

जे पाहून तिचा बाबा म्हणाला , " यात काय मजा आहे ? स्वतःच्या डोक्याने काढशील तर ठीक... तुला जमत नसेल तर मी उद्या आलो घरी की ईगल काढून दाखवीन तुला."

मग काय , "मराठी माणसाच्या अंगाला हात Lol "
बाबा यायच्या आत आमचं चित्र तयार :ड

IMG-20170428-WA0004.jpg

Keywords: 

कलाकृती: 

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

माझ्या साजणा,माझी हौस कि हो पुरावा
माळा कि माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा

धवल पुष्पे,गंध मादक हा बरवा
धरा जीवलगा,हात हातात कि धरा

वीणेची तार छेडता, वेड लागले जीवा
वीजू चमकता जैसे नाचे मन मयुरा

वैभव विपुल आता घर कि सजवा
वैशाख तृतीया आज, सख्या येतील घरा

द्याया शुभेच्छा, आंबे-डाळ, पन्हे बनवा
द्या हरभऱ्याची ओटी, येऊ द्या थंडगार वारा

सख्या म्हणती रहावा जीवनी गोडवा
लाजती 'नाव'घेता,दिन झाला साजरा

गौरी निघाली आपुल्या गावा
या शुभ दिनी हसत मुखे पाठवण करा....

कविता: 

फावल्या वेळेतील पराक्रम

हॅलो मैत्रीणींनो,
काहीना ना काही काम करत राहायच्या सवयीमूळे बरेचदा काही गोष्टी हातून तयार होऊन जातात. बर त्या गोष्टींचा काही उपयोग असलाच पाहिजे, आपण पुढे त्या वापरल्याच पाहिजे हे असले फाल्तु प्रश्न त्यावेळी पडत नाही. उगाच हाताला, बोटांना काही काम म्हणुन करत राहायच, राहिलेलं काही हातावेगळं करायच. बरं ते क्रिएशन सर्वांन सेपरेट धाग्यात एक्स्प्लेन करुन सांगण्याइतपत मोठं किंवा गरजेच असावच असा आपला विचारही नसतो.

मुद्दा म्हणजे मी असल्या फालतू टिवल्याबावल्या भरपूर करत राहते. वाटल कि माझ्यासारखे आणखी कोण इथ असतील तर तेपन आपले स्पेअर टाईम उद्योग इथे शेअर करतील.

Keywords: 

कलाकृती: 

काही वेगळंच...

धो धो पाऊस
विजांचा कडकडाट
भरून आलेला अंधार
वेढून टाकणारा गारवा...

तशीच थोडी भिजत
थोडी थरथरच
थोडी कापत
मी वर्गात शिरले

वर्गात फक्त तू,
तू ही भिजलेला...
रुमालानी तोंड पुसत
तू वर बघितलस मात्र...

अन त्या एका क्षणात
तू काही वेगळच शिकवत गेलास
अन मीही शिकत गेले
काही वेगळच...!

कविता: 

सागरओढ

Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद

सागरओढ

आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गुढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.

मला पुन्हा जायलाच हवं, समुद्रात खोल खोल, बोलावतेय प्रत्येक लाट
वाऱ्याचा तो पुकारा, अगदी आतून आलेला, नाहीच टाळता येणार आता;
शुभ्र नभांनी गच्च भरलेला वादळी दिवस हवाय फक्त एक,
फेसाळलेल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषार, सीगलचा आर्त पुकारा.

मला गेलच पाहिजे समुद्रात खोल खोल, त्या वेड्या दर्यावर्दीसारखं,

कविता: 

ऑनलाईन विणकाम शिकण्याबाबत

विणकाम, क्रोशा आणि दोन सुयांचे ( क्रोशा आणि निटिंग) मी गेली पाच वर्ष ऑनलाईन शिकवते. बऱ्याचदा याबाबत विचारणा केली जाते, कसे शिकवता, कसे जॉईन करता येईल वगैरे. तर त्यासाठी हा लेख. ( मै टिम हे आपल्या नियमात बसत नसेल तर कृपया धागा उडवावा ___/\___)

"शिकाशिकावा"  हा ब्लॉग कोणासाठी आहे ? 
हा ब्लॉग रिस्ट्रीक्टेड  आहे. म्हणजे तो फक्त सदस्यांसाठीच खुला आहे; सार्वजनिक नाही.

या ब्लॉगचे सदस्यत्व कसे घेता येईल ? 

कलाकृती: 

वारा

वारा
आला आला आला
कोणी पहिला ?
कसा दिसला ?
नाही कळला ,आला आला आला

अलगद पडदा हलला,
घरभर फिरला
प्रत्येक जण हसला
आला आला आला

आला म्हणता पसार झाला
कोणी नव्हते खेळायला
रागावला, गरम झाला
स्तब्ध व लाही लाही झाला

अंगात आले,गरगर फिरला
धुळीने माखला
धक्का दिला झाडाला
गेला गेला गेला

ढगांना गराडा घातला
गडगडाटात कडकडून भेटला
अश्रूत न्हाला
आला आला आला

थरथर कापत आला
दार कोणी उघडीना त्याला
दुलई शोधू लागला
गारव्यातच उभा राहिला

फुंकर मारली शेकोटीला
पर्णेच पांघरला
ऊब मिळाली शरीराला
सुगंध उधळीत आला

लू sलूsलू sलूs करत बहुरुपी अनिल बनला

कविता: 

मृदू आवाज

एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वातच असं काहीतरी असतं की त्याची समोरच्यावर लगेच छाप पडते. कोणाची उंची छान असते, काही लोक दिसायलाच खूप छान असतात, कोणाचं हास्य अगदी मनमोहक असतं तर काहीजणांचा आवाजच चक्क मृदू असतो म्हणे! मृदू, म्हणजे नुसता गोड आवाज नाही… गोडही आणि शिवाय हळूवार आणि तलम असाही! म्हणजे अगदी विविधभारतीवरच्या निवेदकांचा असतो तसा (कोणतेही एफेम चॅनेल नाही हां, विविधभारतीच. बाकी एफएम चॅनलवरचे ते आरजे आणि मृदू आवाज यांचा काहीच संबंध नाही. तर ते असो.) असं म्हणतात, की असा गोड आवाज ऐकून समोरची व्यक्ती खुश होऊन जाते म्हणे, तिला आपण खूप स्पेशल आहोत वगैरे असंही वाटायला लागतं म्हणे..

लेख: 

सृजनाच्या वाटा : ठंडा ठंडा कूल कूल : घरची बाग

४ दिवसाची भारत वारी झाली, तिथून निघताना डोळे ओले होतातच. आपली माणस तर पाहिजे च असतात शिवाय हिरवाई , झाड खूप मिस करते मी.
पण कर्मभूमी मध्ये येणे भाग असते. काल रात्री परत आलो. इथल्या उन्हाळ्याच्या रखरखाटाबद्दल आम्ही तक्रार ही नाही करु शकत कारण बोलून चालून हे तर वाळवंटच. विमानातून खाली बघताना नुसते लांबच लांब पसरलेले वाळवंट दिसते..

मी आता बाल्कनीतच भर्पूर झाड लावली आहेत , बुडत्याला काडीचा आधार :)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

उगाच काही बाही

Cool अ‍ॅडमिनटीमने सृवा घोषित केल्यावर मी लगेचच थंड्या वाहत्या गंगेत हात धुवून घेते आहे Cool

उगाच काही बाही बोलून ठंडी ठंडी कूल कूल राहणारी विशाखा इथल्या मैत्रिणींसाठी.....

*************************************************************************************

Keywords: 

सृजनाच्या वाटा : ठंडा ठंडा कूल कूल (एप्रिल-मे 2017)

cool2.png

:waving:

मोठ्ठ्या सुट्टीनंतर सृ. वा. म्हणजेच आपलं सगळ्याचं आवडतं "सृजनाच्या वाटा" पुन्हा सुरु होत आहे. येय्य!!

मध्यंतरी आलेल्या बऱ्याच नवीन सदस्यांना "सृजनाच्या वाटा" हा उपक्रम कदाचित माहित नसेल. महिन्या-दोन महिन्यांनी आपण ह्या उपक्रमातून एक विषय देत असतो. त्या विषयावर आधारीत लेख, कथा, कविता, कलाकुसर मैत्रीणच्या गुणी सदस्या नवीन धागा काढून इथे सादर करत असतात. वरच्या निळ्या पट्टीवर "सृजनाच्या वाटा" मध्ये तुम्हांला ह्या आधी झालेल्या सृ. वा. वाचता येतील.

Keywords: 

पाँपै -ज्वालामुखीचे शहर (इटलीतील भटकंती)

रोमन आणि ग्रीक इतिहासाबद्दल मला फार पूर्वीपासून अतिशय उत्सुकता वाटत आली आहे. इतिहासाची आवड आणि खास करुन या प्राचीन युरोपियन महासत्तांबद्दल उत्सुकता यामुळे ग्रीकांची लोकशाही, रोमन लोकांचे प्रजासत्ताक, ज्युलियस सिझरनंतर वाढीस लागलेली साम्राज्यवाद, रोमन साम्राज्यसत्तेचा अस्त इत्यादींबद्दल मी पूर्वी थोडेफार वाचन केले होते. गेल्या डिसेंबरच्या सुटीत कुठे जायचे हे ठरवत असताना ग्रीस ठरता ठरता राहिलं आणि एकमताने इटलीवर शिक्कामोर्तब झालं. इटलीला गेलो आणि आम्ही दोघं (आणि मुलंही) इटलीच्या प्रेमात पडलो.

Keywords: 

मनीमाऊ

हा सुट्टीचा दुसरा दिवस , चित्र पूर्ण झालं तेंव्हा आम्हीपण साधारण असेच दिसत होतो :winking: हिरवे काळे Lol

IMG-20170412-WA0004.jpg

Keywords: 

कलाकृती: 

प्रिया तुज वाचुनि...

प्रिया तुज वाचूनि दिनरात सुनी ही
सजणा तुज वाचुनि, संतत धार नयनी

येशील कधी तू अचानक दारी
हीच निरंतन आस मनाशी
प्रिया तुज वाचुनि दिन रात सुनी ही

नको मला तो साज शरिरी
नको नको तो गंध सुवासी
प्रिया तुज वाचुनि दिन रात सुनी ही

तलम वसने मला जाळती
गरम हवा ही वाळ्यांमधूनी
प्रिया तुज वाचुनि दिन रात सुनी ही

कविता: 

टायटानिक

महाकाय रेखीव जहाज
जडशीळ होवुनी स्तब्ध ,
विसावलय काळोखी तळाशी
जीवनाचे प्राक्तन भोगत ,….

लखलखती झुंबरे
सुबक सुंदर गवाक्षे
काळवंडताहेत आस्ते आस्ते
रत्नाकरात रुतत …

अजस्त्र या धूडाच्या
पोलादी सांद्रींतून
सुळकताहेत सोनेरी मासे
विस्मयाने आरपार बघत

शाही रंगीत काचांच्या
तावदानातून स्वत;ला
निरखताहेत जलचर
प्रवाळाच्या साथीत

अद्वितीय रूपाचा
जणु महाल स्वप्नांचा
हा महाडोलारा जेव्हा ,
मानव होता बांधीत

Keywords: 

क्षितीज

माझ्या मनाचा झोका उंच उंच गेला
उंचावरुनी क्षितिजे पहायची होती त्याला …

महान उंचीमुळे मला भोवळ आली
कारण उंची एवढीच खोली होती खाली …

मन अस्वस्थ झाले ,हेलकावे खात राहिले
मोठमोठ्या पहाडाना धडकत खाली आले

जेथून क्षितिजे दिसत नव्हती
लहान लहान टप्पे होते ,

झाडे झुडपे खडक होते ,
मला न्याहाळता येत होते

आता मन शहाणे झाले
त्याला जणू जाण आली
स्वप्न बघायचीच ,पण
जोखून उंची नि खोली

Keywords: 

मी नदी

पर्वतकड्यांवरून स्त्रवले -गिरीकंदरातून झेपावले
तीर्थक्षेत्रांना उजळविले-रानावनात खळाळले
शेतांना भिजवले -गावागावात खेळले …
मी जीवनदायिनी होते. …पण आता ,…

वाहत्या ओघाची कोमेजलीय काया
उघड्या कातळाची हरपलीय माया

बिचारे किनारे कसनुसे तगताहेत
वाळूच्या उपशाची चाके झेलताहेत

डौलाची चाल माझी दुडकी केली
मैलोगणती गावे बोडकी केली

काय फुलवलंय माघारी मी कसं बघू ?
अन उजाडलेल्या गावांचे शाप भोगू ?

माझी कुलीनता माझी शान होती
आता मलीनतेने मी म्लान झालेय.

माझं अंत;करण आटलंय
धरणाच्या विळख्यानं फाटलंय

तरी मी सागराला भेटायला जाणार आहे.

Keywords: 

कविता: 

मृत्युगंध

नवरा गेलाय फिरतीवर, दुसर्‍या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ-तांदूळ धुऊन पातेलं गॅसवर ठेवून फोडणी केली. तितक्यात...

डिंग-डाँग... डिंग-डाँग... डिंग-डाँग...डिंग-डाँग... डिंग-डाँग....

पाच वेळा इतक्या घाईघाईनं म्हणजे मनूच ती! तिला धीर धरवणार नाही. धावत जाऊन मी दार उघडलं.

"मावशी, बघ गं कसं काय जमलंय मला ते!" दार उघडल्या उघडल्या तिनं काढलेलं गुलाबाच्या फुलाचं सुरेख चित्र मनूनं माझ्या डोळ्यांसमोर नाचवलं.

लेख: 

आज मैं उपर, आसमा नीचे

परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... नसत बालंट कोण घेणार अंगावर हा घ्या पुरावा आमच्या परीक्षा काळातील अभ्यासाचा Nerd

आमचा आधीचा ग्रोथ चार्ट तुम्ही पाहिला असेलच
(ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी )
IMG-20170407-WA0049.jpg

तो आम्ही अलमोस्ट पार केला होता एव्हाना , म्हणून ह्यावेळी आम्ही रिस्कच घेतली नाही :winking: , उंची बघा फक्त Lol

Keywords: 

कलाकृती: 

ग्रीष्म

ग्रीष्म
सरले नवपल्लवांचे कोवळेपण,वृक्ष झाले घनदाट
गळले पुष्पदल, आला फळांचा बहर
उठले सूर्यदेव घाई-घाई, लवकर झाली पहाट
पडले ग्रीष्म पाऊल, झाला उष्म्याचा कहर ---
स्वतापे तापला, चाल मंदावली
ढग सरसावला करण्या सावली
तापे विरला, सरला मागे आल्या पावली
वाट पहाता संध्या खंतावली ---
तप्त वारा.. द्या द्या त्यास थंडावा
पाजा पाणी वा पेय थंडगार
अडोशाला आला रानपाखरांचा थवा
बालकांच्या आनंदा न पारावार---
पिवळी खिरणी,लांब काकडी
बदामी खरबूज, लाल टरबूज
विविध आंब्यांची हात गाडी
पण सारे करती कुजबूज ---
जांभळे हिरवीच आहेत अजून
मोगरा गंध मुठीत आहे धरून

चाय गररररररम ... मी केलेल्या कपातून!

IMG_20160828_080221-COLLAGE-01.jpeg

हे मधे केले होते. आपल्या घरी सुखाने नांदताहेत.

Keywords: 

कलाकृती: 

अस अस घडलं... ७. आणि मी मोठी झाले.

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.

लेख: 

ऋतुचक्र

उन्हाच्या झळा, आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, "वसंत" पिंगा घालू लागतो

आभाळात काळे-निळे ढग, डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर, आता अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून "ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते

आता फुटतो, आवाज पेर्ते व्हा ला
शेता शेतात, लगबग वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, अक्षरशः कोसळू लागते

कविता: 

स्वागत

स्वागत
शिशिर सरता सरता सांगे वसंताशी
बर का नीट कर सृष्टीशी
अन बहरला कि रानी-वनी
पिका गानाची घाली मोहिनी
गुलमोहरा दिली लाल वसनं
बहावा वर लाविली पिवळी केतनं
मधुरा फळांची परीक्षिती कोण कोण?
रावे नि सारे खग गण
आली आली चैत्रगौर
नवरात्रीच्या तृतीयेस माहेरी
नवरात्रीत जागवा नवदुर्गा नि अंबिका
गालात हसली रेणुका
उधळा उधळा मोगरा न सुगंधी फुले
नि ती उधळील सुवर्णफुले
सौख्यासिंधू च्या लहरी या लहरी
स्पर्शल्या मनास, चढल्या शेखरी ...

विजया केळकर___

कविता: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS