उगाली आणि सुकुमा - खाऊगिरीचे अनुभव ५

आफ्रिकन सफारी करण्याचे स्वप्न कित्येक वर्षांनी साकार होणार होते. माझ्या आणि नवऱ्याच्या स्वभावानुसार आफ्रिकन जेवण मिळणार म्हणूनसुद्धा मन हवेत होते. १५-१६ तासाचा प्रवास करून रात्री ९ च्या आसपास नैरोबी एयरपोर्टवर उतरलो. आमचा गाईड आम्हाला हॉटेलवर सोडून, जुजबी सूचना देऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला तयार रहायची आठवण करून देऊन निघून गेला. आम्हाला प्रचंड भूक लागली होती. म्हणून आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटकडे कूच केले. रात्रीचे १०-१०.१५ वाजले होते रेस्टॉरंट मध्ये शुकशुकाट होता. लॅम्ब चॉप्स ऑर्डर केले. जेवण येईपर्यंत धीर निघत नव्हता इतकी भूक लागली होती.

लेख: 

ImageUpload: 

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-३ (अंतिम)

भाग-3 कुरुंगनी ते सेंट्रल स्टेशन

ट्रेकला यायचं ठरवणं, तयारी ह्या सगळ्यातून पार पडत इथे आलो. ही आत्ताच तर सुरवात झाली आहे, असं म्हणता म्हणता अर्धा ट्रेक संपला सुद्धा. आता फक्त आज आणि उद्या. मग परत जीप, बस, ट्रेन आणि घरी परत.

आजचा दिवस सगळ्यात कठीण आहे, असं सगळे सांगत होते. त्यामुळे थोडी काळजी वाटत होतीच. त्यात पावसाची लक्षणं दिसत होती. सॅकमधलं सामान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असल्याने ते भिजायची भीती नव्हती. सर्व मंडळींनी रेनकोट चढवले. रेनकोट घालून चालताना खूप घाम येतो. पावसापासून बचाव करावा, तर घामेघूम होऊन भिजायला होतच.

दिवाळी

दिवाळी

पणती जशी उजळवते दाही दिशा
धुंद होते मन अन् उमलते नवी अश्या

आनंद येतो दारी घेऊन जुनी नाती
घट्ट होते विण अन् होतात गाठी भेटी

चार दिवसांचे सुख येई पाहून केलेली पूर्व तयारी
गोंधळ गडबड हास्यविनोद घरात आनंद पसरी

उडून जातो अलगद दिवस सुखाचे
अन् दिसू लागतात आम्हास रस्ते ऑफिसचे

मनात साठवून सारे हासरे क्षण
देतो पुन्हा लवकरच भेटण्याचे वचन

प्लॅन बनतात get2 अन् 31st च्या ट्रीपचे
उरतात मागे आईबाबा आजीआजोबा अन रीते दरवाजे

केतकी पुरुषोत्तम गोरे.

कविता: 

मावेमधले बेला, अर्थात सोप्पे बेसनाचे लाडू

पाकातल्या लाडवांपेक्शा पिठीसाखर घातलेले बेसनाचे लाडू सोपे, पण गॅसवर बेसन भाजताना हात दुखून येतो. मरोत ते बेला Vaitag असं होतं अगदी. पण तरला दलालच्या पाककृतीने मायक्रोवेवमधे बेसन भाजून लाडू केले आणि तेव्हापासून गॅसवर बेसन भाजणे मी बंदच केले.
दैनंदिनीवर अमांसाठी हे बेला लिहिले, माधुरीने सांगितलं म्हणून नव्या धाग्यावर पाकृ लिहितेय, तुम्हीही तुमच्या बेलाच्या टिप्स नक्की लिहा.

साहित्यः
बेसन - दोन कप
रवाळ साजूक तूप - पाऊण ते एक कप
पिठीसाखर - दोन कप, त्यातली एखाद दुसरा चमचा पिसा वगळली तरी चालेल.
दूध - दोन चमचे
वेलची, केशर - स्वादासाठी
काजू, बदाम, बेदाणे - सजावटीसाठी

हिरव्या टोमॅटो ची चटणी

आपण हिरव्या टोमॅटो ची भाजी वरून किसलेले खोबरे पेरून नेहमी करतो.. ही चटणी नेहमीच्या सॉस ला पर्याय आहे. टिकण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावी लागेल.करायला अतिशय सोपी आहे.
साहित्य :—२५० ग्रॅम किंवा ४ हिरवे टोमॅटो
२ टे.स्पू. तीळ, १ टे. स्पू.तेल
१ टी स्पू. जिरे - मोहोरी, १/२ टीस्पू हिंग , हळद
१ टे स्पू प्रत्येकी धणे जिरे पूड आणि गरम मसाला
२ टे स्पू गूळ/ साखर , चवीनुसार तिखट व मीठ

दीपोत्सव

दीपोत्सव
उत्सव दिपकांचा दिपोत्सवपर्व
उजळल्या दशदिशा प्रकाशाचा सर्ग
उतरल्या काही आकाशीच्या तारका
उमलल्या त्या फुलझडीतून कलिका
उधाण आनंदाचे वर्षाता स्नेह नीर
उत्साह, उमंग, उल्हास याने भरला ऊर
उपकार करता ,नको वाच्यता - घ्या ही शपथ
उचला पाऊल,चाला वाटचाल ,हाच पथ
उभार मरगळल्या जीवा देई प्रकाश
उपरती हो ऐसी,झटका कुरीती सावकाश
उज्वल भविष्य, उत्तम आरोग्य लाभो
उजाडता नव दिन,उत्कर्षाचे वारे वाहो
उदरभरण्या हे अनेकविध जिन्नस
उपहार द्या-घ्या करत हास परिहास
****शुभ दीपावली****
विजया केळकर ____

कविता: 

आमचं आगर

आगर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर. अलिबाग साईडला वाडी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच आमच्या भागात आगर ह्या शब्दाला.

आमचं आगर खूप मोठं आहे. पण आमचं घरच उतारावर असल्याने आगर ही तीन लेव्हल वर आहे . प्रत्येक लेव्हलला पाच सहा तरी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आगरातल्या सगळ्या वाटा कोकणातल्या अति पावसामुळे उखडल्या जातात म्हणून दिवाळी पूर्वी सगळ्या वाटा चोपण्याने चोपून, शेणाने सारवून नीट केल्या जातात. घरात काही कार्य वैगेरे असलं की आगारातल्या वाटा ही अशा रांगोळ्या घालून सुशोभित केल्या जातात.दिवाळीत या वाटांवर पणत्या ठेवून त्या उजळल्या ही जातात . एरवी मात्र आगरात रात्री अगदी मिट्ट काळोख असतो.

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

राव आंटींची कडबोळी

साहित्य- 3 वाट्या तांदूळ पिठी, 1 वाटी मैदा, 1वाटी ओल्या नारळाचा चव, 1 वाटी लोणी, 1 वाटी कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि मीठ चवीप्रमाणे. तळण्यासाठी तेल. आणि सलग वेळ. हे पीठ भिजवून ठेवलंत तर खूप तेल पितं.

कृती- हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता मीठ घालून बारीक वाटून घ्यावा. मग त्यात ओल्या नारळाचा चव घालून परत बारीक वाटा.
एका कढईत मंद आचेवर तेल तापत ठेवा. झारा आणि पेपर घातलेलं भांडं सज्ज ठेवा. कारण आपल्याला पीठ भिजवून झाल्यावर हातही न धुता कडबोळी वळायची आहेत.
तांदूळ पिठी आणि मैदा एका पसरट भांड्यात घ्या. त्यात लोणी घालून हाताने चोळून सगळ्या पिठाला नीट लावून घ्या.

फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - प्रस्तावना

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात मी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक युथ हॉस्टेलतर्फे करून आले. 9 दिवस ट्रेक व नंतर 1 दिवस ऋषिकेशला टाईमपास असे 10-12 दिवस मजेत घालवून परतलो. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत. इथे लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. सांभाळून घ्या मैत्रिणींनो!!

------

IMG_20170818_113446191~01.jpg

IMG_20170818_113401861~01.jpg

Keywords: 

आकाशदिवा

पहिला हा आकाश दिवा माऊलीच्या ग चरणी।
चैतन्याच्या साम्राज्याची झाली सुरू की दिवाळी।।
पहिली ग ज्ञानज्योत माऊलीच्या देव्हाऱ्यात
शांत तेवते ह्रदयी तम अज्ञानाचा अंत।।
पहिली रेखिते रांगोळी,वैष्णवांच्या ग अंगणी
माऊलीच्या ओव्यांचे ग रंग भरते रंगणी।।
पहिले ग उटणे ते लावूनी मम् माउलीला
शांत उटी लाऊनिया, शांतविते भवतापाला
पहिले फराळताट ज्ञानक्षुधा तबकात।
विश्वशांतीच्या तृप्तीचे मिष्टान्न ते वाढत।
उजळून विश्वमन राहो प्रकाश भरोनी।
आनंदाच्या शलाकांची कारंजी ती उडवोनी।

मलई बर्फी

लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण १४ औंस)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क) किंवा दीपची मावा पावडर)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
क्रमवार पाककृती:
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.

हॅपिली एव्हर आफ्टर (अर्थात पांढऱ्या घोड्यावरच्या राजपुत्राची खरीखुरी गोष्ट)

एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुशील, सद्वर्तनी राजा राज्य करत होता. त्याची एक तशीच सुशील, सद्वर्तनी राणी होती. त्यांना एक मुलगा होता. मुलगा म्हणजे राजपुत्रच तो! तो उसळत्या रक्ताचा, मौजमजा आवडणारा तरुण होता. गुरुकुलातून विद्यार्जन संपवून आल्यावर राजवाड्यात डिट्टो डीडीएलजेचा प्रसंग घडला. गुरुकुलातून आलेल्या प्रगतिपुस्तकात राजपुत्राने मिळवलेले गुण आणि निकाल सोडून 'नौकानयनात अ+. नेमबाजी ब. वर्तणूक समाधानकारक.' वगैरे भरताड लिहिलेलं पाहून राजाला निकाल काय तो समजलाच होता, पण त्याने तो काही व्यथित वगैरे झाला नाही.

लेख: 

फॅट चान्स -- रॉबर्ट लस्टिग

वजन, साखर, कार्ब्स आणि या सगळ्याचा आपल्या अंतःस्राव (endocrine) प्रणालीशी असलेला संबंध या संबंधी चालू असलेल्या वाचनात फॅट चान्सची भर झाली. वजन कमी करण्यासाठी (आरोग्य चांगले ठेवण्यासाठी) कुठलाही अपारंपरिक मार्ग अवलंबला की, "हे सगळं डॉक्टरना विचारून करा" असा एक सल्ला नेहमी येतो. किंवा एखादी गोष्ट वाचून खरंच डॉक्टरला विचारायला गेलो, तर डॉक्टरांच्या उलट सल्ल्यामुळे गोंधळायला होतं. पण फॅट चान्स हे पुस्तक एका अतिशय यशस्वी डॉक्टरनेच लिहिले असल्यामुळे, त्यातलया बऱ्याच संकल्पना पटतात, आणि विश्वासाने आत्मसात केल्या जातात. लस्टिग यांचे खरे कार्य हे पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजी मधले.

चंदेरी दुनिया

चंदेरी दुनिया

चल चल जाऊया चंदेरी दुनियेत
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना घेऊ ओंजळीत

एखादा लबाड ढग येईल अवचित
चांदोबास लपवेल काळ्या चादरीत

अरे! तो तर बसला हरणांच्या गाडीत
आणि लागलाय हसायला गालात

भाग घेऊया या का लपंडावात
गाडीवान होऊ वा शिरुया ढगात

आता तो पोहू लागलाय आकाश गंगेत
आनंद लहरींवर नक्षत्र लेण्यात

जांभाई सांगते झोप भरलीय डोळ्यात
आईनं थोपटता बाळ रमलाय स्वप्नात

विजया केळकर ___

कविता: 

या मालिकेतील घटना व पात्रे काल्पनिक नाहीत..

शुक्रवारी रात्री बाहेर जेवून आम्ही दोघे घरी आलो आणि फोन वाजला. पल्याड आजी!

"का गं? इतक्या उशिरा फोन? काय झालं?" मी जरा धसकूनच विचारलं. माझ्या रात्री उशिरा भारतातून फोन आला की, मला आधी भीतीच वाटते.

"काय व्हायचंय? काही नाही. आमच्याकडे दहाच वाजलेत अजून. अजून 'कैसे मै जिऊ तेरे बिन?' सुरू पण झाली नाही. पण आत्ता एक 'ब्रेकिंग न्यूज' आहे." आज्जीची ब्रेकिंग न्यूज म्हणजे टीव्हीवरल्या कुठल्यातरी मालिकेबद्दलच असणार. देवपूजेआधी 'सास, बहू और साजिश!' नेमाने बघणारी आहे माझी आज्जी!

लेख: 

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-२

कोडाईकॅनाल ते वेल्लाकवी

ट्रेकमध्ये 'शिट्टी' हे सर्वस्व असते. सगळा दिनक्रम शिट्टीच्या तालावर चालतो. सकाळी बेड टी, व्यायाम, ब्रेकफास्ट, चहा, पॅक लंच इतक्या शिट्ट्या आणि कँपवर पोचल्यावर वेलकम ड्रिंक, चहा, नाश्ता, सूप, जेवण आणि बोर्नव्हिटा एवढ्या (तरी!) शिट्ट्या वाजायच्या!!

जुन्यातून नवे - कुर्त्यांपासून बेडशीट

मी कॉटनचे कपडे जास्त वापरते. आणि मधे कुर्त्यांची फॅशन होती तेव्हा आवडीने कॉटनचे कापड घेउन ५-६ कुर्ते शिवुन घेतले होते. तसेच काही मैत्रिणीनी दिलेले होते. प्रत्येक कापडामागे थोडी इमोशनल अटॅचमेंट असल्याने वापरुन झाल्यावर टाकून न देता ढीग करुन ठेवले होते. १२-१३ कुर्ते, २ कमिझ असे साठवून केलेले हे बेडशीट.

Keywords: 

कलाकृती: 

टुमदार बंगली

टुमदार बंगली
टुमदार बंगलीच्या - प्रवेशदारी कमान
बोगनवेल झुकली - मग उंचावते मान
मधुमालती चढली - नक्षीदार जाळीतून
निळी-पांढरी गोकर्ण - टवकारती कान
कुंपणावरील कोरांटी - कां करते तणतण
गुलाबकळी हसली - तेवढ्यात खुदकन्
आत टाकलं पाऊल - लाजवंतीस चाहूल
लाल पिवळी कर्दळी - न् लाललाल जास्वंदी
बोलेल कशी तगर - खुणावेल ती अबोली
चमेलीच्या अंबराला - पानाफुटीची झुंबर
गारवेलीचा गार वारा - खाली चिमणा पसारा
चाफा कां झाला अस्वस्थ - उभा प्राजक्त तटस्थ
गाणे गाई कुंदकळी - गोफ गुंफी गुलबाक्षी
मुरडता चाफेकळी - पारिजात होई साक्षी

कविता: 

माव्याची साटोरी

साहित्य :-
मावा - १/२ किलो
मैदा - अंदाजे ३/४ किलो
बारीक रवा -अंदाजे ३/४ किलो
तांदूळ पिठी अर्धी वाटी
पिठी साखर- २ वाट्या
वेलची पूड २ टी स्पून
२ चमचे खसखस भाजुन पूड
साजुक तूप - पाव किलो
दूध -- अंदाजे अर्धा लिटर
मीठ - चवीनुसार

कृती :. एका मोठ्या बाऊल मध्ये ६ चमचे तूप ,१ चमचा साखर चवीनुसार किंवा अर्धा टी स्पून मीठ घेऊन ते चमच्याने छान फेटुन घ्या .आता ते पांढरे झालेले दिसेल.
त्यात २ वाट्या रवा घालुन एकत्र फेटुन घ्या.
आता मैदा घालुन सर्व मिष्रण कालवुन घ्या. लागेल तसे दूध घालुन सैलसर गोळा तयार करा.त्याला वरुन तूपाचा हात लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवा.

करवा चौथ

“करवा चौथ’’ हा सण नुकताच मोठ्या आनंदात साजरा केला गेला. खरं तर, हा सण नाही. पण यश चोप्रा, करण जोहर आणि तमाम टी.व्ही. channels च्या कृपेने हा एक सण बनला आहे.परवा एका छोटयाशा city news नावाच्या पत्रिकेतही एका दाक्षिणात्य मुलीने आपण “करवा चौथ” हा कसा साग्रसंगीत साजरा केला हे सांगितले होते. हे सगळे वाचून, पाहून मनात अनेक विचार येतात.

Keywords: 

लेख: 

जनुके

f2a12901d33a61c02c78e710ee7e5291.jpg

हाती बाळाच्या कपड्यांची,
दुधाच्या बाटल्यांची,
स्वतःच्या ऑफिसची व पाठीवर लॅपटॉपची,
पोटावर बेबी सॅकची,
मेंदूत कामाची,
मनात असंख्य विचारांची,
पायात अनंत अंतरांची,
गाडीत असीम वेगांची,
कसली कसली ओझी घेऊन भिरभिरलीस?

कसल्या कसल्या अस्थिरता,
पैशांच्या,
करिअरच्या,
घरकुलाच्या,
पिल्लाच्या,
घरच्या,
सगळ्या काळज्या गिळत,
काम करत राहिलीस....

कविता: 

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१

group-1.JPG

रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.

Keywords: 

चित्रपट 'कासव' : एकटेपणाची सामूहिक गोष्ट

माणूस ह्या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो वगैरे वाक्यं आपण वर्षानुवर्षं वाचत आलेलो असतो किंवा प्रसंगोपात बोलून दाखवत असतो. अशी वाक्यं दुसर्‍यांची उदाहरणं देऊन बोलायला बरी वाटली तरी आपल्यावर हे उमजण्याची वेळ येऊ नये असंही आपल्याला कुठेतरी वाटत असतंच. तरीही जवळजवळ प्रत्येकाला आयुष्यात एखाद्या साक्षात्कारी क्षणी एकटेपणाच्या ह्या आदिम अनुभूतीचा प्रत्यय येतच असतो. आपले कुणी नाही, आपण एकटे पडलोय ही ती जाणीव ! भितीदायक असते ही जाणीव फार. एखाद्या चुकार क्षणी नुसती विजेसारखी लखलखून ती येत जात राहिली तर फारसे बिघडत नाही. उलट आपले पाय जमिनीवर ठेवायला त्या लख्ख जाणीवेची मदतच होते.

Keywords: 

कोजागिरी

हलके हलके
होऊन पीस
बलून मध्ये मस्त बैस
वजनरहित तरल सैल
उंच अंतराळात जाईल
भरून श्वास खोल खोल
वरून पहा भूमी गोल
नाही गुरुत्वाचे आकर्षण
मी पणाचे कण कण
हरपेल मग नाव गाव
कोण कुठले तुम्ही राव
पक्षांची ओलांडून सुंदर नक्षी
निळेभोर आभाळ साक्षी
राजहंस उडणारे खास
लागेल तिथे चंद्राचा ध्यास
शीतल चांदण्या स्वागतास
कोजागिरीच्या जागरास
केशरप्याल्यात चंद्रामृत
शीतल धुके चांदण्यांचे दूत
अशी खास स्वप्नील पूनव
कोजगरती म्हणून जागव

रश्मी भागवत

पाने

Subscribe to मैत्रीण RSS