मी शिवलेली नऊवारी

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण मोठा झाल्यावर काय होणार? म्हणजे जे ठरवलेलं असतं ते पूर्ण होतच किंवा मोठे होईपर्यंत ते मत ठाम राहतच असं नाही. आमच्या घरात आई शिवणकाम करायची आणि बाबा उत्तम टेलर होते. वेळ मिळेल तेव्हा आईला मदत करायचे. त्यांची एक शिलाई सुद्धा इकडची तिकडे होतं नसे. तर लहानपणापासूनच मी हे बघत आले. आणि बघता बघता शिकत आले. दहावी नंतर फॅशन डिझाईनिंग चा अभ्यास करावा असं वाटत होतं पण काही कारणांनी शक्य नाही झालं. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉमर्स मध्ये गेलो. पदवी नंतर एक वर्ष नोकरी करून शॉर्ट टर्म फॅशन डिझाईनिंग चा कोर्स केला.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

शिवशिवणारे हात ;-)

लेकीसाठी घरी बसण्याचा निर्णय घेतला खरा पण रिकामी वेळ मेंदू कुरतडू लागला ... छंद जोपासू म्हटलं तर खास काही छंद ही नव्हते ,वाचन सुरू होत म्हणा पण तरी काही तरी कर चा भुंगा पाठ सोडत नव्हता ... Vaitag
त्यात नवऱ्याने गरज नसताना उगाच एके ठिकाणी पैसे उधळले ,(जी अर्थात त्याची नेहमीची सवय आहे म्हणा ) तेंव्हा माझी सटकली :raag: नी म्हटलं बघ मी पण कसे उधळते नको तिथे ...नी जाऊन शिवणाचे मशीन आणले ... मी याला उधळणे म्हणाले कारण माझा नी शिवणाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता उलट लहानपणी आईच्या मशीनवर ,'शिकव ना मला' म्हणून बसले तर सुईच मोडली तर आई इतकी ओरडली की मी धसकाच घेतला होता शिवनकामाचा...

Keywords: 

आदिम मनुष्याच्या आदिम कथा: माझे संशोधन

डायनोसॉर गेले आणि पृथ्वी माणसांना राहायला सुरक्षित झाली. पृथ्वीवर पहिला माणूस बनून येण्याचे भाग्य प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे अ‍ॅडम. आज जगात असणार्‍या बर्‍याच गोष्टींचा (माणसांसकट!) आद्य जनक म्हणून अ‍ॅडम ओळखला जातो. पृथ्वीवर आल्यानंतरच्या त्याच्या अनुभवांबद्दल त्याने विपुल लिखाण करून ठेवले आहे. रिसायकल करता येण्याजोग्या (अ‍ॅडम हा जागरूक पर्यावरणवादी होता) भूर्जपत्रांवर सदर दस्तऐवजीकरण त्याने करून ठेवले आहे. त्याची पत्नी इव्ह. अ‍ॅडमाची साजेशीच त्याची ही अर्धांगिनी होती. तिच्याही नावावर अनेक शोध नमूद केलेले आहेत.

संजीवन आठवण

एक संजीवन आठवण.... मनी साठवण

२३ डिसेंबर२०१७ .........

बरोबर ४:३० वाजता सर्व मैत्रिणी - १२ जणी जय्यत तयारीनिशी सौ. किरण गोखले, हिचे घरी पोहचलो. तशी तिची तब्येत ठीक नसते म्हणून अर्धा तास आधी एकीने जाऊन आम्ही येत असल्याची पूर्व सूचना दिली होती. एक आगळा-वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. किरणही छानशी तयार झालीच झेपत नव्हते पण.....
IMG-20171223-WA0092.jpg

आज आमच्या या सखीचा ८० पूर्तीचा वाढदिवस होता.

लेख: 

कवी

कवी

मुलात डोले, फुलांत फुले कवी
सृष्टी देवता सुचवी कल्पना नवी नवी

बोल बोबडे अंगणी क्रीडांगणी
दंगा म्हणून रागावती कोणी
कोणास वाटे ती संजीवनी
त्यात विश्वरूप पाहे कवी

फुले उमलता गंध दरवळे
त्यास दाही रस्ते मोकळे
अवखळास कसे अडवू न कळे
त्याच्या मागावर धावे कवी

तारांगणी चंद्र-सूर्य लपंडाव खेळती
तारका एकासाठी धावत येती
दुसरा येता पळून जाती
किरण स्पर्शे कवीतला जागा होई कवी

विजया केळकर _____
bandeejaidevee blogspot.com

कविता: 

माझं नाव ब्रशिती

नमस्कार!

माझा नाव प्रचिती. घरचे किंवा मैत्रिणी प्राची, प्रची अशी हाक मारतात. आता तुम्ही विचार करत असाल कि मी तुम्हाला माझ्या नाव बद्दल इतके का सांगत आहे. त्याचे काय झाले, काही काळापूर्वी कुणीतरी स्व:ताच्या नावाबद्दल लिहिलेला एक ब्लॉग वाचला आणि जाणवले कि मलापण माझ्या नावाबद्दल भारताबाहेर खूप वेगळे अनुभव आले ते तुम्हाला सांगावे म्हणून हा ब्लॉगप्रपंच!

Keywords: 

हम.........दिल दे चुके सनम..

एक राजस्थान किंवा तत्सम वाळवंटी प्रदेश आहे.इथल्या बायका टिकल्या नक्षीकामाच्या गुजराती साड्या किंवा घागरे घालतात.मोठ्ठं दुमजली बंगला किंवा हवेली म्हणता येईल असं घर आहे.घराचा प्रमुख एक खूप म्हणजे खूपच फेमस गायक आहे.इंटरनेट चा जमाना नसताना पण त्याच्याकडे इटली मधून शिकायला विद्यार्थी येणं ही खूप म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे.

Keywords: 

मी मिठाची बाहुली - वंदना मिश्र

वंदना मिश्र यांचे 'मी मिठाची बाहुली' हे पुस्तक माझ्या एका मैत्रिणीने सांगितल्यामुळे वाचले.  वंदना मिश्र म्हणजेच  पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व.

दापोली - काय पाहावे काय खावे?

मी आधीची टाकलेली पोस्ट पोस्ट्च नाही झाली वाट्टत Sad
मुलीनो ,
मी दापोलीला फिरायला जात आहे ३ दिवस.तिथे राहणार्या, फिरुन आलेल्या मैत्रीणीनी मदत करा प्लीज.
काय काय फिरता येइल , आनि कुठे काय छान खायला मिळेल ही माहिती हवी आहे.
गुगल वरुन - कड्यावरचा गणपती, पन्हाळ्केजी लेणी, सुवर्णदुर्ग, जंजिरा अशी काही ठिकाण कळाली आहेत.अजुन काही असेल तर सांगा, आनि वर लिहलेली ठिकाणे (किल्ले सोडुन) कितपत बघंणेबल आहेत की आपला गप्प आराम करावा हेही सांगा.
धन्यवाद :)

Keywords: 

पहिली अमेरिकावारी

मी अमेरिकेत पहिल्यांदा गेले त्याला आता दहा वर्षं होऊन गेली. गंमत अशी आहे की परदेशप्रवासाचे सगळे अनुभव इथूनतिथून सारखेच असले तरी ते दुसऱ्याला सांगावेसे वाटतात. मग ते वाचणाऱ्याला कसे का वाटेनात .. .. अमेरिकेतली माझी अगदी पहिली सकाळ होती आणि माझा तो ताजाताजा अनुभव कागदावर उतरवल्याशिवाय मला अगदी चैनच पडेना ...मग काय ओढलं कागद पेन आणि केलं सुरू.
त्यानंतर मी अजून दोन वेळा अमेरिकेत गेले. त्यात एकदा फ्लाईट चुकली म्हणून

अगदी सुरुवातीला केलेले काही टॉप्स, श्रग्स

१.अगदी पहिला मोठा टॉप विणला तो हा

IMG_20170928_120248.jpg

२. त्यानंतर अनेक छोटीमोठी प्रोजेक्ट्स झाली. पण मग इथल्याच एका मैत्रिणीने फार मोठा विश्वास माझ्यावर टाकला. आणि एक मस्त श्रगची ऑर्डर दिली. तो हा श्रग

IMG_20160719_200918~01.jpg

हाच वेगळ्या ड्रेसवरचा
IMG_20170928_115724.jpg

कलाकृती: 

श्रग, श्रग आणि श्रगस

मध्यंतरी काही मैत्रिणींनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक श्रग्स बनवून घेतले. थांकु मैत्रिणींनो  Bighug
नेट वरच्या आवडलेल्या श्रगचे फोटो त्यांनी मला शेअर केले. मग ते फोटो बघून मी तसे श्रग पॅटर्नस डिझाईन केले अन प्रत्येकीच्या आवडत्या रंगसंगतीत/ रंगात ते विणले. खूप धमाल आली हे सगळं करताना. त्यांचे हे फोटोज
१.

कलाकृती: 

युरोप ट्रिप प्लॅनिंग

इथे युरोप ट्रिप प्लानचा धागा आहे का? आम्ही विचार करतोय १४-१५ दिवस जुने वा जुलै मधे. पहिलीच ट्रीप आहे त्यामुळे योग्य ठिकाणे योग्य वेळेतच पुर्ण करायची आहेत. जास्त घाई नाही करायची, नाहीतर एकही धड पाहून होत नाही. धागा असेल तर सांगाल प्लिज म्हणजे वाचता येईल.

कोलंबस वारी - ४

नॅशव्हिल 

हे एक कोलंबस जवळचं छोटंस टुमदार गाव. खरं तर खूप फिरणं अपेक्षित नव्हतं या ट्रिपमधे. पण लेकाची नवीन गाडी अन त्यातून आसपास थोडं फिरणं तर झालच. मग तो संध्याकाळी घरी आला की एक लॉंग ड्राईव्ह व्हायचा. अशाच एका लॉंग ड्राईव्हला लेकाने हे नॅशव्हिल दाखवलं. माझी चित्रकला अन एकंदर कलाप्रेम त्याला चांगलच माहितीय, मग ह्या गावाला भेट देणं त्याने ठरवून ठेवलेलं :)

लेख: 

कोलंबस वारी -२

कोलंबस आणि भेटीगाठी 


इंजियानातलं कोलंबस एक छोटंसं गाव. मुळात हे खूप जुनं गाव. 1821 च्या सुमारास याला कोलंबस हे नाव दिलं गेलं. कोलंबस नावारुपाला आलं के तिथल्या कोलंबस- मॅडिसन रेल्व लाईनमुळे. अनेक उत्पादक संस्था तिथे उभ्या राहिल्या.  नोबलिट्ट स्पार्कस इंडस्ट्री ( Noblitt-Sparks Industries) , अॅरव्हिन इंडस्ट्री Arvin Industries - आताची मेरिटॉर (Meritor) , कमिन्स (Cummins, Inc)अशा अनेक इंडस्ट्रिज तिथे निर्माण झाल्या.

लेख: 

कोलंबस वारी - १

पूर्वतयारी 
मैत्रीण वरच्या अनेक मैत्रिणींनी कित्ती मदत केली, माहिती पुरवली. आणि जुलै मधे नाही पण ऑक्टोबर मधे अखेर मी लेकाकडे पोहोचले. अगदी व्हिसा काढण्यापासून विमानात बसण्यापर्यंत  बस्के, मृदुला, धारा, स्वाती २, सायो, रायगड, गौरी, मिनोती,  मोनाली,  लोला, मी अनु, आशुडी, चना, विनी, कविता, सन्मि, अकु,... सगळ्यांनी माझं येणं इतकं म्हणून सुकर केलं. तुम्हा सगळ्यांना थांकु थांकु थांकु Bighug

लेख: 

फुरुसातो नोझेई अर्थात आनंदी कर!

मिळकत कर अर्थात इन्कमटॅक्स भरणे, त्यासंबंधीचे वाचन, तो कसा कमी करता येईल यासाठीच्या कायदेशीर बाबी या गोष्टी आवडणार्‍या व्यक्ती विरळाच असतील. पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करणारे सीए वगैरे मंडळी आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील असे लोक (ज्यात माझा नवरा मोडतो) सोडले तर हा सगळा अत्यंत कंटाळवाणा, रूक्ष प्रकार आहे हे बहुतेक सगळे जण मान्य करतील. पण जपान सरकारने या वार्षिक करभरणीला एक वेगळेच परिमाण दिले आहे. आता कर वाचवण्यासाठीची तरतूद ही अत्यंत नीरसपणे एक काम उरकून टाकल्यासारखी करावी लागत नाही तर बरेच जपानी अगदी वेळ ठरवून सगळ्या कुटुंबाबरोबर बसून हसत खेळत हा कार्यक्रम पार पाडतात.

लेख: 

आग

जुनाट समाधिस्थ
     निळसर सुस्त शिखरे
          तापून लालभडक झाली तेव्हा,

निरभ्र नभाचे किनारे
      हळूहळू पेट
           घेऊ लागले तेव्हा,

लोहाराचा भाता फुलून
       अग्निफुलांचा
            पाऊस पडू लागला तेव्हा,

करपट धुराचे लोळ
        स्वच्छ ढगांना खाऊन
             ढेकरा देऊ लागले तेव्हा,

हिरवे जिवंत रान
        भान विसरून
             राखेत उडून जाऊ लागले तेव्हा,

कपारींना जाग येऊन
         आवाजाचे कोलाहल
              उतू जाऊ लागले तेव्हा,

ओलसर शेवाळलेली जमीन
         रुसून एकेका भेगेत
              लुप्त होऊ लागली तेव्हा,

कविता: 

फुलपाखरू

मनीमोहोर यांचा रिटायरमेंट प्लॅनिंग वरचा लेख वाचुन मी माझ्या आईच्या रिटायर्ड लाइफ बद्दल लिहिलेला हा लेख आठवला, तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला म्हणुन इथे देतीये,

********************************************************************************************

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

Keywords: 

लेख: 

एक आगळे वेगळे ट्रेनिंग ( Retirement and Investment Planning )

प्रत्येक संस्था, कार्यालय आपल्या मनुष्य बळ विकासासाठी अनेक प्रकारचे ट्रेनिंग, मीटींग्ज, सेमिनार इ. सारखे कार्यक्रम हाती घेत असते. यामुळे त्या संस्थेचा फायदाच होत असतो. पण निवृत्त होणार्‍या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्‍या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे . नुकतीच मी Retirement and Investment Planning ह्या ट्रेनिंगला जाऊन आले आणि त्याने मी अक्षरशः प्रभावित झाले आहे.

Keywords: 

लेख: 

मुक्त

सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.

कांजी एक जपानी अनुभव!

सारखे सारखे काय जपान बद्दल लिहायचे? कंटाळा नाही का येत? येतो ना.. पण लिहायला दुसरे काहीच नाहीच आहे. मग गप्प बसावे. ते जमले असते तर??? असो.

लेख: 

मुक्त २

अम्मा मग मुंबईला गेल्या . श्रीकांत ची तयारी सुरु झाली लंडन ची आणि सुधाने थोडे दिवस मुंबईला राहायचे असा ठरले . घर बंद केले. सगळे दागिने लॉकर मध्ये ठेवले. अम्मा नाराज कारण त्यांना लॉकर आवडत नाही . पण प्रॅक्टिकल विचार तोच होता.

मुक्त १

सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.

लेख: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS