जानेमन

जाने मन - कथा - वृंदा टिळक -एकता दिवाळी अंक 2022

“ ७८६२” टॅक्सी ड्रायव्हरला सावीने कोड सांगितला. टॅक्सी सुरु झाली. सावीने फोनवरचे बोलणे पुढे सुरू केले,” अग हो आई! वेळेत घरी परत जाईन. काळजी करू नकोस. बरं चल.. ठेवते आता .. मला दुसरा फोन येतोय.”

लेख: 

ऑरेंज मार्मलेड

साहित्यः किनो जातीची छोटी संत्री एक ग्लास किंवा मेझरिन्ग कप रस होईल इतकी. ही बारकी संत्री बरी पडतात कारण साल फार
कडवट नसते व बिया नसतात त्यामुळे मिक्सीत रस काढता येतो.

दोन संत्र्यांचा पल्प संत्री सोलुन आत ज्या चंद्रकोरी असतात त्याची पण सालेकाढायची तो हा पल्प.

एक संत्र्याची साले काढून सुरीने त्याच्या आतील पांढरा कडव ट् भाग खरवडून टाकायचा व साल पातळ राहील त्याचे लांब बारीक एक दीड इंची तुकडे करायचे.

जितका रस तितकी व्हाइट शुगर - पांढरी साखर दाणेदार. पिठी नव्हे.

पाककृती प्रकार: 

वानवळा

वानवळा देणे म्हणजे आल्याकडचे पदार्थ, फळं, भाज्या हे इतरांना भेट म्हणून देणे.
एक म्हण आहे की घरच्याच चिंचेने दात आंबलेत आणि त्यात आला वानवळा.

माझ्या एका आत्याकडून आम्हाला दरवर्षी त्यांच्या बागेतल्या किमान २ पेट्या द्राक्षांचा वानवळा यायचा.
ज्या कोणाकडे हरभर्‍याची सुकलेलेई भाजी असेन तर ते देतात. नवर्‍याच्या एका मामांकडून आम्हाला डाळींब येतात.
आमच्याकडे आल्यागेल्या सर्वांना, आई आणि आजी काही बाही वानवळा देत असत.

भारतात नातेवाईकांना भेटायला गेले की चिंचा, तीळ, मोहरी, मेथी, धने, जवस, कुरड्या, पापड, पापड्या, शेवया असा बराच वानवळा आजही मिळतोच मिळतो.

Keywords: 

लेख: 

फुलं: मातीतले संगीत

या कोटवरून टायटल सुचले. झालं असं- फुलांचा एक जनरल फोटोगॅलरी विभागात धागा हवा होता पण पोएटिक नाव सुचेना. मग चक्क गूगल केले. आपल्या मराठीतले एक गाणे माहित होते - वेगवेगळी फुले उमलली. पण ते एकतर फार गद्य वाटते आणि शिवाय पुढे ‘गेले ते दिन गेले’ वगैरे सॅडनेस आहे. सो नकोच ते. मग विंग्रजीकडे वळले. त्यात हे रत्न सापडले. एरवी चीजी वाटले असते पण आज पटलेच. इट्स रिअली अ म्युझिक ऑफ द ग्राउंड! येऊद्या तुमच्याकडचे किंवा तुम्ही पाहिलेले मातीचे गाणे..

किंडल अनलिमिटेड पुस्तकं यादी

किंअ वर काही बरं वाचायला मिळणं थोडं अवघड काम असते. सो एखादे पुस्तक यदाकदाचित चांगले वाटले असेल तर जनहितार्थ टिपून ठेवा इथे.

व्हेज ग्रीन थाई करी

करीच्या वाटणासाठी:
२ पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल(थाई आले),दोन काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबीरीच्या काड्या, २-३ सांबारचे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची सालं (पांढरा भाग न येऊ देता).

बाकीचे:
१ लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली- प्रत्येकी अर्धी वाटी लाल-हिरवी शिमला मिर्ची , ब्रॉकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बाळ कणसं,थाई बेझिलची ५-६ पाने

पाककृती प्रकार: 

तृणखोलचा धडा क्रमांक ४ - परतीच्या वाटेवर..

गंगबल हून परत निघालो. छान रमतगमत कॅम्प वर परत आलो. मी आणि न दोघेच होतो. वाटाड्या आपल्याच नादात. यामुळे हा एक माझी मैत्रीण म्हणते तसा darling trail झाला. शिवाय माझा स्वतचाही विश्वास नव्हता, पण नवरा माझा उत्साह बघून मध्ये एकदा म्हणाला, am so proud of you.. तेंव्हा तर याचसाठी केला होता अट्टाहास हा फील आला.
मस्त गप्पा मारत त्या हिरव्या सुस्नात कुरणांमधून काश्मीर च्या वादियोमधून हसत गात आम्ही परतलो. येताना आर्मी वाल्यांना पुन्हा हॅलो केलं.

Keywords: 

ब्लॅक फॉरेस्ट

एखाद्या ठिकाणी अनेक वेळा जाणं होतं, त्याबद्दल थोडंफार कुठेकुठे लिहून ठेवलेलं असतं, पण ते लिखाण पूर्ण होत नाही अश्यातलंच ब्लॅक फॉरेस्ट हे ठिकाण.

Keywords: 

Art October 2022

हाय मैत्रिणींनो,

खरं तर इन्क्टोबर सुरू होऊन आठवडा झालाय. पण यंदा कार्यबाहुल्यामुळे माझं इन्क्टोबर चित्र काढणं अगदी तळ्यात मळ्यात आहे म्हणून धागा काही काढणं झालंच नाही शिवाय यावेळचे prompts मला जरा जास्तच डेंजर वाटतायत कदाचित मला तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून असेल :Biggrin:
पण बस्कु ने आवर्जून धागा काढायलाच लावला :)

मी यावेळी काही inktober आणि काही इतीहा तर्फे आयोजित Folktober च्या prompts वर चित्रं काढेन म्हणतेय बघू कसं किती जमतंय ते.
मी दोन्ही prompts लिस्ट इथे देतंय तुम्ही पण तुम्हला जमेल तस चित्र काढा.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

तृणखोलचा धडा क्रमांक ३ - गंगबल च्या वाटेवर..

रात्रभर प्रचंड अस्वस्थ झोप. भास आणि जागेपणा यांच्या सीमेवर कुठं तरी. त्यातून ams ( acute mountain sickness) साठीची गोळी घेत असल्यामुळे पोटाची वाट लागली होती. अस्वलं येतात हे रात्री माहिती नसल्यामुळे आणि टॉयलेट टेन्ट सेटअप केला नसल्यामुळे "पलीकडच्या झाडीत" रात्री दोन तीन वेळा तरी जावं लागलं डोक्याला टॉर्च बांधून. त्यातून शूज चिक्क भिजलेले. Socks तर फेकून द्यावे इतके खराबझाले होते. waterproof shoe covers नेलं होतं. तेच socks वर चढवून जायचं बाहेर. ही सगळी कसरत इतकी वैतागवणी होती. पण टेन्ट खराब होऊ नये आणि बाहेर आपली कुल्फी होऊ नये यासाठी हेच ऑप्शन होते.

Keywords: 

तृणखोल चा धडा क्रमांक २

अजून अडीच तासांचा रस्ता आहे असा साधारण अंदाज तिथल्या बोलण्यावरून आला होता. वाटाड्या काहीच सांगत नव्हता. पटपट पाऊलं उचला, घोडे घ्या म्हणत होतो ते ऐकलं नाहीत वगैरे बडबड करत होता. एकतर त्याचा accent त्यातून वाटाड्या म्हणून करायच्या गोष्टींचा काहीच अंदाज नसणे, जवळ पाणी टॉर्च वगैरे साध्या गोष्टी पण न ठेवणे, ज्याला गरज असेल ( माझ्या मैत्रिणीला शुगर आहे बरीच तिला थोडा आधार लागत होता अधून मधून. ) त्याला सोडून दुसऱ्याच लोकांशी गप्पा, सगळ्यात पुढे चालत राहणे आणि मागे वळून न बघता झपाझप आमच्या बरंच पुढं जाऊन थांबणे वगैरे चालू होते.

Keywords: 

घटस्थापना माझ्या मनातली

घटस्थापना माझ्या मनातली:
मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय, घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो तुम्ही आनंदी तर घर आनंदी त्यामुळे तेवढंच करा जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतय!

Keywords: 

निलगिरी चिकन उर्फ ग्रीन चिकन

काही वर्षांपूर्वी कोथरुडात 'लवंगी मिरची कोल्हापूरची' नावाचं फर्मास नॉनव्हेज रेस्टॉरंट होतं. आमचं नेहमीचं गो टू आणि तिथली निलगिरी चिकन थाळी माझी सगळ्यात आवडती होती. अर्थात सगळ्या सुंदर, आवडत्या जागा बंद पडतात तसंच हेही बंद पडलं.

तर लवंगी मिर्चीच्या आठवणीत हे निलगिरी चिकन. घरी एकदा केलं आणि ते खूपच चविष्ट झालं म्हणून आता नेहमी केलं जातं.

पाककृती प्रकार: 

तृणखोलचा धडा क्रमांक १

जेंव्हा एक ट्रेक करायचा असं ठरलं तेंव्हा माझी अजिबात मनाची तयारी नव्हती. चालू शकेन बरंच पण elevation no way. असा ठाम निर्धार होता. कारण पण होतंच. एखादा छोटा दोन मजल्यांचा स्लोप चढला तरी दम लागायचा. पोटऱ्या भरून यायच्या. जमत नाही हे इतकं ठाम पक्कं होतं मनात गेली काही वर्षं की ट्रॅव्हल करताना अधे मध्ये केलेले छोटे hikes आठवायचे पण नाहीत नंतर. मॅकलोडगंज च्या आसपास केलेले छोटे hikes, Dalhousie जवळचा काला टॉप, श्रीलंकेत सर केलेला सिगिरिया हे सगळं विसरायचे कारण आता अगदी पाय, टाचा पोटऱ्या यांची वाट लागली होती.

Keywords: 

जर्मनीतलं वास्तव्य - स्कूल चले हम - जर्मनीतला शाळाप्रवेश - Einschulung

जर्मनीत आल्यानंतर काही वर्ष इथल्या शिशूवर्ग ते पुढे माध्यमिक शिक्षण, या शैक्षणिक व्यवस्थेची काही विशेष माहिती नव्हती. सुमेध आला तो उच्च शिक्षणासाठी, त्यामुळे तो अनुभव पूर्ण वेगळा होता. सृजन मुळे या सगळ्याबद्दल हळूहळू शोधाला सुरूवात झाली, मग त्यातून नवीन माहिती, अनुभव येत गेले. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरूवात कशी होते, काय नियम आहेत, शाळांचे कसे प्रकार आहेत इथपासून तर मग प्रवेशप्रक्रिया, भाषा, विषय कोणते, लोकांची मानसिकता अश्याही विविध बाजू कमी अधिक प्रमाणात समजायला लागल्या, आणि नव्याने समजत आहेत. आधी डे केअर आणि मग किंडरगार्टन असा प्रवास करून, आता यावर्षी सृजन पहिलीत गेला.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

आख्ख्या कांद्याची आमटी

आख्ख्या कांद्याची आमटी

हा आमच्या पणजीबाईंचा अजून एक खास पदार्थ.

बाजारातून नेहमीच्या आणलेल्या कांद्यातलेच लहान लहान कांदे वेगळे काढायचे. ते सोलून मग भरल्या वांग्याला देतो तशा "अधिक" चिन्हाप्रमाणे दोन चिरा द्यायच्या आणि जरास्सं मीठ चोळायचं.

पाककृती प्रकार: 

दाण्यांची आमटी

आई असल्यामुळे चतुर्थीला उपवासाचे काहीतरी करायचे होते, माझा उपास नसला तरी मी म्हणेल ते ती करणार होती. त्यामुळे भगर आणि दाण्याची आमटी ही माझी फर्माईश होती.

आईच्या हातची ही आमटी फार आवडते, म्हणून शेअर करतेय.

साहित्य
एक वाटीभर शेंगदाणे
चमचाभर चिंचेचा कोळ
चमचा भर गूळ
मीठ चवीप्रमाणे
तूप
जिरे
लवंग - २-३
दालचिनी
हिरवी मिरची

कृती
आदल्या दिवशी रात्री किंवा अगदी पहाटे सालासकट कच्चेच दाणे भिजवून ठेवा. कमीत कमी चार तास तरी आधी भिजवायचे.

पाककृती प्रकार: 

पणजीआज्जीच्या रेसिपीज - दहीपोहे

खिचडीच्या धाग्यावरून गाडी आज्जीकडे वळली आणी सर्वांनाच आपापली आज्जी आठवून, अनेकांची मने भरून आली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन तिच्या आठवणींसकट तिची अजून एक सोप्पी आणि पटकन होणारी व वरचेवर केली जाणारी पा. कृ.

दही-पोहे
साहित्य -
जाडे पोहे वाटीभर
सायीसुद्धा ( सायीसकट) दूध वाटीभर
घट्ट विरजलेलं गोड दही - १-२ वाट्या
२ मोठे चमचे सायीचे गोड दही.
१ मिरची (पोपटी रंगाची तिखट "नसते" ती) , कोथिंबीर
किसलेलं आलं चमचाभर
मिठ, साखर
तूप, जिरं, हिंग

पाककृती प्रकार: 

पणजीआज्जीच्या रेसिपीज - साबुदाण्याची खिचडी

आत्ता आत्तापर्यंत असलेल्या माझ्या आजेसासुबाई काय खिचडी बनवत. एखाद्या तान्ह्या बाळाचे करावेत तसे लाड करायच्या अगदी त्या खिचडीचे...

पाककृती प्रकार: 

पणजीआज्जीच्या रेसिपीज - तिखटामिठाचा सांजा, पिवळा सांजा, जनसेवा स्टाईल

पुणेकरांमधे अतिप्रिय. जनसेवात मिळायचा हा सांजा, तेव्हा चवीढवीचे जे. ना येऊन मजेत खाताना दिसायचे. दुर्दैवाने जनसेवा आता बंद झाले.

पण आमच्या आज्जींची व त्यांची चव अगदी सेम.

साधारणत: खूप मोठ्या पावसाच्या आळशी संध्याकाळी,आजारी व तोंडाला चव नसलेल्या नातवंडांना खाउ घालायचा पदार्थ. अतिशय कमी सामानात चविष्ट व पटकन होणारा पदार्थ.

पाककृती प्रकार: 

पणजी आज्जीच्या रेसिपीज- काळ्या घेवड्याची उसळ

20220920_072545.jpgमाझ्या पणजेसासूबाई वाई, महाबळेश्वर, सातारा भागातल्या.
त्या काळे पोलीस करायच्या. तिथं काळ्या घेवड्याला पोलीस म्हणतात. म्हणजे आज काय केलंय? तर बाबा पोलीस...विचित्र वाटतं ना? पण मला नाही वाटत..... सवयीमुळे. :)

तर...ही उसळ त्यांनी फोडणीस घातली की असा सुगंध दरवळायचा की क्या कहने....पदार्थाला चव आणण्यासाठी आलं लसूण पेस्ट, धने जिरे आमचूर पावडर, कांदा टाॅमॅटो चं वाटण लागतंच ही अंधश्रद्धा आहे हे एक चमचाभर उसळ खाल्ली की लक्षात येई.

तर...

पाककृती प्रकार: 

शेरदिल : द पीलीभीत सागा- नरो वा शार्दूलो वा- वाघ का माणूस

Collage-Maker-26-Jun-2022-02.27-PM-min.jpg
#साभार आंतरजाल

(#स्पॉयलर्स असतील)

न सके तो सुन मन गुंज
हो अलख जगा मन
स्वयं स्वयं में

मन मुस्कावे जिव भूलकावे
पीको प्रेम ज़रे
लाज ना लागी हां जो जागी
बदली जे ही घडी

मोह में बांधे
सधे ना साधे
चुलबुल चित धरे

माया खेला है अलबेला
खुल खुल खेल करे

Keywords: 

जर्मनीला प्रयाण

मैत्रिणींनो, मला कळत नाहीये कोणता धागा निवडावा. म्हणून यावर टाकतेय.
मी, माझा नवरा आणि मुलं, सगळे उद्या स्टुटगार्ट, जर्मनीला रवाना होत आहोत. किमान १.५ वर्षांसाठी.

आपल्यापैकी कोणी तिथे असेल तर नक्की भेटू.
रहाता का कोणी तिथे?

लीना.

--
देवनागरीकरण केले.
मै.टीम.

हिमालय - पिंडारी - फुकरिया ते खाती - शेवट

हिमालय - पिंडारी - फुकरिया ते झिरो पॉइंट

आज २ जून उजाडला. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. टेंटची excitement संपून गादीची आठवण यायला लागली होती. पण अजुन धीर धरायला हवा होता. कारण आजचा ट्रेकिंगचा शेवटचा दिवस असला तरी longest distance कव्हर करायचं होतं. जवळपास १९ किमी.
RoadMap.jpg

Keywords: 

बुकीश कोटस्/ पॅराज

पुस्तक वाचताना काही वाक्ये किंवा पॅरा मनाला भिडतात. इबुक वाचताना आपण ते हायलाईट करून ठेवतो किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवतो, हार्ड कॉपी वाचताना फोटो काढून ठेवतो.
टायटल म्हणतंय तसं तेच या धाग्यावर पुस्तकाचं आणि लेखकाच्या नावासहित गोळा करायचं. कोणाला त्या कोट ची थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची असेल तर तेही चालेल.
कदाचित कुठल्याशा कोट किंवा पॅरा मधून एखादीला तिचं पुढचं पुस्तक मिळू शकेल!!

पाने

Subscribe to मैत्रीण RSS