काही काही झाड नकळत्या वयापासून माझ्या मनात ठाण मांडून बसली आहेत,त्याच मुख्य कारण म्हणजे माझ बालपण त्या झाडांभोवती खेळण्यात गेलं आहे. माझं माहेरच घर म्हणजे त्याकाळच्या शहरवजा गाव असलेल्या अंबरनाथमधल मस्त पुढे मागे अंगण असलेलं कौलारू घर. घराला लागून आमचं शेतसुद्धा होत आणि मी चौथीत जाईपर्यंत आम्ही भात, भुईमूग अशी पीकही घेत होतो शेतात. साहाजिकच घराच्या भवताली भरपूर विविध प्रकारची झाड होती.आमचं घर रस्त्यापासून बरच खालच्या पातळीवर होत तर रस्त्यावरून घरात यायला ज्या पायऱ्या होत्या त्याच्या बाजूला एक देवचाफा होता, जो अजूनही भरभरून फुलत उभा आहे आणि त्याच्या बाजूला चक्क शाल्मलीचा भलामोठा वृक्ष होता.
'पाऊलखुणा' ही मराठी दुरदर्शन वर १९९३ साली दाखवलेली धारावाहिक मालिका. ही आता युट्यूबवर उपलब्ध नाही. विकिपीडिया वर ही मालिका अमोल पालेकरांची निर्मिती आहे इतकाच त्रोटक उल्लेख आहे. दिग्दर्शन अमोल पालेकरांच होते. मालिकेच कथाबीज अगदी एका ओळीत बसणारे, साधेसे होते. काॅलेज मध्ये जाणारा किंवा फार तर नुकताच पदवीधर झालेला एक तरुण (यतीन कार्येकर) आणि त्याची प्रेयसी (नाव माहिती नाही) ह्या दोघांची फुटकळ कारणांवरून उठसूठ भांडण होतं असतात. ह्यांना आपण सोईसाठी 'तो' व 'ती' म्हणुयात.
हुश्श! बसलो एकदाचे आम्ही सगळे गाडीत! तीनचार दिवस नुसती सामानाची बांधाबांधच चालली होती. आता इथून व्ही.टी. आणि मग तिथून नागपूर. ती ट्रेन संध्याकाळी आहे म्हणा. संदीप आणि लहानीला खूपच वाईट वाटत होतं कालपर्यंत, हे घर सोडून जायचं म्हणून. सकाळी स्टेशनवर आल्यापासून मात्र खूश आहेत दोघं. गेल्यावेळेस बाबांची बदली झाली होती तेव्हा मी लहान होते. तेव्हा माझंपण असंच झालं होतं. आज मला एकाच वेळी वाईटही वाटतंय आणि सुटल्यासारखंही.
मी इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या अंकात हा लेख मागच्या वर्षी लिहिला होता. तो इथे आणत आहे.
शाळेत असताना मार्च महिना आला की वार्षिक परीक्षेचे वेध लागायचे. पण परीक्षेच्या आधी शेवटची मज्जा करायचे दोन सणही मार्चमध्येच यायचे. एक म्हणजे अर्थातच होळी. दुसरा रूढार्थाने ’सण’ नव्हे, पण ’साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या न्यायाने आमच्या घरी संत एकनाथांच्या पादुकांचं आगमन व्हायचं, तो दिवस आम्हाला सणासारखाच वाटायचा.
कालच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बरंच काही वाचलं, त्यावरून आपसूकच माझी भाषेची जडणघडण कशी झाली ते आता काय वाटतं, मराठी भाषेवरचं प्रेम असं बरंच काही मनात आलं, म्हणून त्यात माझ्याही या लेखाची भर.
तुमच्यापैकी अनेकांनी हे ऐकले असेल. जसा inktobar साजरा होतो ऑक्टोबर महिन्यात तसा मार्च मध्ये मार्च मीट द मेकर म्हणून चॅलेंज म्हणा/ उपक्रम म्हणा चालतो इन्स्टाग्रामवर.
तुम्ही स्वतःला आर्टिस्ट/ क्राफ्टपर्सन समजता का? तुमचा स्वतःचा यासंदर्भातला बिझनेस/ हॉबी बिझनेस आहे का? तर तुम्ही यात इन्स्टाग्रामवर उतरू शकता.
आर्ट न क्राफ्ट मग ते कॅनव्हास पेंटिंग असो, तारकाम असो, क्रोशे, भरतकाम, विणकाम, कॅलिग्राफी, शिल्पकला ते फूड स्टायलिंग, केक डेकोरेशन या रेंजमधले काहीही असू शकते.
भारताबाहेरच्या लोकांशी भारत या विषयावरील संवादात काही हमखास येणारे मुद्दे असतात, त्यात खाद्यसंस्कृती, लोकसंख्या, ठराविक पर्यटन स्थळं, बॉलीवूड, कपडे, भाषा, सणसमारंभ, स्त्रियांची स्थिती असे काही विषय अगदी आघाडीवर असतात. त्यातल्याच बॉलीवूड या विषयावर ज्या गप्पा रंगतात त्याबद्दलचे आमचे हे अनुभव.
आजची खादाडी धाग्यावर फोटो टाकला त्या पास्त्याची ही रेसिपी. मूळात मी पास्ता फार करत नाही, शक्यतोवर नवर्यालाच करायला लावते. मी एक ग्रीन सॉस बनवून करते सृजन साठी आणि काही वेळा रेडीमेड बेसिल पेस्तो वापरून. काल भलत्याच चार रेसिपी बघून नंतर त्यापेक्षा वेगळीच मला जमेल अशी रेसिपी केली आणि छान जमला. काहीं घटक अंदाजे किती घातले असतील ते आठवून लिहीलं आहे, सगळं अगदी काटेकोर नाही.
साहित्य -
पास्ता - मी होल व्हीट पास्ता वापरते, पेने होता घरात तो घेतला आहे, आणि तिघांसाठी साधारण अडीच कप घेते.
९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला.
शिफ्ट व्हायचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी मानसीची आणखीनच धांदल उडत होती. परक्या देशात आधी कुठे रुळणं अवघड, त्यात असं अचानक उठून एकदम २५०० मैल लांबच्या नवीन शहरात जायचं म्हणजे खरं तर तिला नकोच वाटत होतं. पण विनयला नोकरी बदलणं भाग होतं. हा निर्णय घेतला उणापुरा महिना होता हातात सगळी तयारी करायला. आता सगळी कामं खरं म्हणजे संपत आली होती, विमानाने जाताना बरोबर न्यायचं बारीक सारीक सामान भरायचं उरलं होतं. सकाळीच मूव्हिंग कंपनीचे लोक येऊन सगळं सामान पॅक करून एका मोठ्या ट्रक मध्ये लोड करुन गेले होते.
खरं तर खूप काही वेगळी कृती नाही, नेहमीचीच पण हे कॉम्बिनेशन फार आवडतं म्हणून शेअर केली.
साहित्य
पाऊण वाटी मूगडाळ
दोन मध्यम आकाराच्या झुकिनी
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, धणे जिरे पूड, तिखट, गोडा मसाला
गूळ एक लहान चमचा
चवीप्रमाणे मीठ
कोथिंबीर
'मराठी भाषेची गंमत' या धाग्यावर रायगडची पोस्ट वाचून मी फार पूर्वी देवनागरीबद्दल लिहिलेलं आठवलं. मी या विषयातली तज्ज्ञ नाहीये, सहज आवड म्हणून गोळा केलेली माहीती आहे.
--
भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे.
खरंतर कलाकृती विभागात याचा धागा काढणं मजेदारच आहे. पण बाकी कोणत्या गटात बसेल हेही वाटेना. म्हणून इथे काढला धागा. दुसरीकडे हलवायला हवा असं वाटलं तर सुचवा.
नवीन काही दिसलं की लगेच त्याच्या मागे धावायचं, अशी माझी हौस असतेच कायम. त्याला अनुसरून हे प्रकरण बघितल्यावर लगेचच विशलिस्टमधे जाऊन बसलंच होतं. मला वाटतं तीनेक वर्षं तरी झाली याला. फायनली काल मुहूर्त लागला. पण आता जरा शहाणी (जराशीच हां) झाल्यामुळे लगेचच सगळा कच्चा माल मागवला नाही. आहे त्या सामानात करून बघू, जमलं, हौस टिकली तर पुढचं सामान मागवू असं ठरवून हे कोकोडेमा बॉल्स करून बघितले आहेत.
आमचे एक मित्र कुटुंब सद्ध्या अतिशय खडतर काळातून जातंय. नवीन बाळ, आईला तातडीच्या हार्ट ट्रान्सप्लांटची गरज, कुटुंबातील ज्येष्ठांच अचानक कॅन्सर डायग्नोसिस आणि मृत्यू अशा अनेक मोठ्या अडचणीतून मार्ग काढायचे प्रयत्न सुरू आहेत. यासर्वात मदत करायला, परदेशी ईथे, मित्र परिवार तर आहे पण मेडिकल एक्स्पेन्सेस या सर्व मदतीला पुरून उरणारे आहेत. आम्ही सगळे जमेल तितकी आर्थिक मदत जमवत आहोत. त्याकरिता गोफंडमी चे फंडरेजर सुरू केले आहे, त्याची लिंक खाली देत आहे.
तुम्हालाही शक्य असल्यास मदत करा,प्लिज हेल्प स्प्रेड द वर्ड. या कुटुंबासाठी प्रार्थना करा.
शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं.
जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.
कोक स्टुडिओ हा पाकिस्तानात आतापर्यंत सगळ्यात जास्त काळ चाललेला टिव्ही शो आहे. २००८ पासून आतापर्यन्त १४ सीझन्स झाले आहेत. आपल्याला तो यूट्यूबवर पाहता-ऐकता येतो. त्यात जे फोक, सूफी, क्लासिकल, कवाली, भांगडा इ. गाण्यांचे आणि मिश्रणाचे जे प्रयोग केले आहेत ते अतिशय उच्च दर्जाचे आहेत.
हा धागा सगळ्या कोक स्टुडिओ फॅन्ससाठी! चला आपापले आवडते गायक/गायिका आणि गाणी/अनुभव लिहूया.