अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -५

अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up.

Keywords: 

विज्ञानाची ऐशीतैशी

आज विज्ञान दिन. जेव्हापासून जॉर्ज मॉंबियोचे The Invisible Ideology हे भाषण ऐकले आहे तेव्हापासून भांडवलवाद, नवउदारमतवाद, आणि उपभोक्तावाद यांचा आणि विज्ञानाचा कसा परस्पर संबंध आहे हे उलगडून बघण्याचा छंद लागला आहे. यामधून काही नव्या जाणिवा झाल्या त्यातील दोन ठळक जाणिवा या लेखात मांडणार आहे. शीर्षक “विज्ञानाची ऐशीतैशी” असे देण्याचे कारण या दोन्ही जाणिवांनी मला विज्ञानाच्या आकलनात घडणाऱ्या वा घडविल्या जाणाऱ्या चुका किती महाग पडू शकतात हे लक्षात आलं.

Keywords: 

लेख: 

Neurographic Art

हाय मैत्रिणींनो,

शीर्षक वाचून जरा गोंधळात पडला असाल ना? तुम्ही म्हणाल ईंक्टोबर झालं आता हे कसले नवीन खूळ आणलं हिनं? Bigsmile Haahaa 2
तर काय झालं, सध्या फेसबुक, ईन्स्टा सगळीकडेच या हॅशटॅग खाली खूप सुंदर सुंदर चित्रे नजरेला पडतायत. ती बघून मलाही तश्या पध्दतीची चित्रे काढायचा मोह व्हायला लागला. म्ह्णून म्ह्टलं बघावं हे प्रकरण आहे तरी काय नक्की?

Keywords: 

कलाकृती: 

मुझसे दोस्ती करोगे-रेस्ट्स ईन 'पिसेस'

मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस' -पूर्वार्ध

कलाकार : काही उगीच हसणारे, काही अति तर काही जेमतेम अभिनयही न करणारे, काही मान डुले , काही सुट्टीवर आल्यासारखे उत्साही, काही अतिशय आनंदी ( सगळे इतर ठिकाणी उत्तम अभिनय करतात पण इथे वावच नाही.)

लेख: 

हिजाब, मंगळसूत्र आणि पॉलिटिकल अजेंडे

घरच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप साठी टंकलं होतं. म्हंटलं इथेही टाकूच. इतर चर्चांमध्ये मुद्दा विरून जाऊ नये म्हणून वेगळा धागा करतेय.

----

Keywords: 

लेख: 

स्टोक कांगरी ट्रेक

आपल्याला काय आवडतं, खूप आवडतं हे उशीराने लक्षात आलं तर वाईट वाटतंच, मलाही वाटलं पण उशीराने का होईना, लक्षात तरी आलं आणि ते झेपतंय हा अजून एक प्लस पॉइंट.
सहज मजा म्हणून एका मिटींगला गेलो, त्यात ओढले गेलो आणि अनपेक्षितपणे ट्रेकींग आवडतं हे कळलं.

स्टोक कांगरी हे शिखर लेह मध्ये आहे. ६,१५३ मिटर्स किंवा २०,१०० फूट ऊंचीवर.
आम्ही हे एक्स्पिडीशन केलं आणि त्याला थोडं अजून कठीण करावं म्हणून ठाण्याहून लेहला आणि परत असे कारने गेलो.

ह्यात कसे पडलो, काय तयारी केली आणि बाकी ह्याची ही कथा.

Keywords: 

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे...

मी मध्यंतरी डोअर टू डोअर cab ने औरंगाबाद ला जात होते. गाडीत अजून एक 40-45 वर्षाची बाई व तिची मुलगी होती. गप्पा मारता कळलं की तिचा भाऊ करोनाने गेला त्याची मुलगी सात वर्षाची. आईवडीलम्हातारे मोठी बहीण अधू पण अंगात कला. झोपून चित्र काढते खूप सुंदर . बॉटलवर आपण सांगितल्याप्रमाणे काढून देते. गिफ्ट द्यायला छान आहे अश्या वस्तू तिच्याकडून घेऊन मदत तिला मदत करता येईल.

ममता शर्मा
9730419191

रॉकेट बॉईज ( वेबसिरीज - SonyLiv)

रॉकेट बॉईज चा ट्रेलर पहिल्यापासून सिरीज पाहायची फार उत्सुकता होती . जितका ट्रेलर छान वाटलेला तितकीच सिरीजही रंजक वाटली. भारतीय अणु ऊर्जा संशोधनाचे जनक डॉ होमी भाभा आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही सिरीज या दोन वैज्ञानिकांचं आयुष्य ,त्यांच्या कार्याचे महत्वाचे टप्पे दाखवताना स्वतंत्र भारताच्या विज्ञान,तंत्रज्ञान इतिहासाचा छोटासा आढावाही घेते.

कॉश्च्युम डिझाईनचे वर्कशॉप

२००१ पासून मी विविध विद्यापीठांचे नाट्यविभाग, विविध नाट्यप्रशिक्षण संस्था, मास कॉम कोर्सेस इत्यादी ठिकाणी कॉश्च्युम डिझाईन शिकवले/ शिकवते आहे.
आता पहिल्यांदाच पुढच्या आठवड्यात अश्या कुठल्या संस्थेच्या, पदवीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसलेले असे माझे कॉश्च्युम डिझाईनचे वर्कशॉप होते आहे. फ्लेममध्ये मी कॉश्च्युम शिकवलेल्या बॅचेस मधील एक विद्यार्थिनी तितास दत्ता हिच्या कोलकात्याच्या ग्रुपने ही वर्कशॉप सिरीज आयोजित केली आहे.
वर्कशॉप ऑनलाईन असेल आणि माध्यम इंग्लिश/हिंदी असेल.

Keywords: 

लेमन पॉसेट

साहित्य
2 कप हेवी क्रीम/हेवी व्हिपिंग क्रीम/क्रीम फ्राईश इ
१/२ कप साखर
5 टेबलस्पून लिंबाचा रस

कृती:
एका जाड बूडाच्या भांड्यात क्रीम आणि साखर एकत्र गॅसवर गरम करा. ढवळत रहा. 5 मिनिटे उकळू दे.

भांडे गॅसवरून काढा आणि लिंबाचा रस मिसळा. ऐच्छिक: किसलेली लिंबाची साल किंवा केशर/वेलची मिसळा.

थंड होऊ द्या. चार ग्लास/ आठ वाट्यात सम प्रमाणात घाला. 2 तास फ्रिजमध्ये थंड करा.

अधिक टिपा:
झालं! काही टीपा नाही. सर्वात लहान पाककृती लिहील्याबद्दल सीमंतिनी यांना पुरस्कार देऊ शकता.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

सूत्रांतर

सूत्रांतर ही कथा मी एका स्पर्धेसाठी पाठवली होती. तिथे काही बक्षीस वगैरे मिळालं नाही, पण मग नंतर माबोवर ही कथा टाकली तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे छान वाटलं. इथल्या मैत्रिणींनाही ही कथा आवडेल अशी आशा आहे Smile

Keywords: 

लेख: 

इ इरॉटिकाचा

तर मी सध्या करियर चेंजच्या विचारात आहे. मला काहीतरी वेगळे करायचे आहे, हटके करायचे आहे, कूल करायचे आहे, माझ्यातल्या अंगभूत कलागुणांना, कौशल्याला बाहेर आणायचे आहे, मला माझ्या टर्म्सवर कामाचे तास हवे आहेत, मला स्वतःसाठी काम करायचे आहे. पण काय बाई करू, काय करू बरे, कायच बाई करू बरे? अशी माझी भुणभुणभुण ऐकून माझ्यासाठी करियर ऑप्शन्स शोधण्याचे आव्हान माझ्या ३ जणांच्या मार्केट रिसर्च टीमने स्विकारले. ही टीम म्हणजे माझी मुलगी चिन्मयी, भाची सानिया आणि भाचा आकाश. मी परत पूर्ववत अमेरिकी भांडवलशाही बळकट करणारे काम करू नये असे आमच्या त्रिकूटाचे ठाम मत होते.

Keywords: 

लेख: 

द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग ३

द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २

द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १

जेव्हा पर्यावरणाच्या प्रश्‍नांची जाणीव झाली तेव्हा अर्थात पहिला काही काळ कार्बन फूटप्रिंट, प्रदूषण, एनर्जी फुटप्रिंट वगैरे संकल्पना समजून घेणे आणि जगात चालू असलेल्या विविध पातळीवरच्या उपायांनी भारावून जाणे यात गेला. त्यातही तंत्रज्ञानातील प्रगती ही फारच भुरळ पाडणारी! मग electric वाहने, वेगवेगळ्या बॅटरीज, सर्व प्रकारची सौरउर्जेवर चालणारी उपकरणे, बायोगॅस, रिसायकलिंग सर्वांविषयी वाचलं, ऐकलं, चर्चा केली. मग इकॉलॉजीच्या कोर्समध्ये निसर्गाविषयी, त्याच्या विविध परिसंस्थांविषयी माहिती, वाचन, त्यांचा अभ्यास हे घडलं.

Keywords: 

स्वनिर्मित वायर ज्वेलरी - 3

स्वनिर्मित ज्वेलरी - 2 या धाग्याच्या हेडर मध्ये फोटो अपलोड केल्यानंतर मलाच दिसणे बंद झाले त्यामुळे हा तिसरा धागा उघडत आहे

 हाती बनवलेल्या वस्तूंचे फोटो इथे आणि माझ्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत. हे सगळे कानातले, पेंडन्ट इत्यादी मी स्वतः बनवलेले आहेत आणि खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

माझ्या फेसबुक पेजचे नाव आभा फॅशन - हॅन्डमेड्स आहे आणि पेजचि लिन्क.
https://www.facebook.com/avaniarts

पेजचे नाव पुर्वी अवनिआर्ट्स होते त्यामुळे जुन्या फोटोज वर अवनि आर्ट्स हाच लोगो आहे. (हा लोगो आपल्या निलु उर्फ नीलम ने बनवुन दिला आहे)

Keywords: 

ImageUpload: 

बर्फाचा किल्ला

मैत्रीणींनो, लेकीचा बर्फ / बर्फाची कलाकृती काढण्याचा तसा पहिलाच प्रयत्न आहे. कस वाटलं चित्र नक्की सांगा.

Keywords: 

कलाकृती: 

इसां(प)नीती

इसां(प)नीती

इडलीसांबार!!! लुसलुशीत आणि वाफाळतं. मराठी घरांनी उपमापोह्यांबरोबर प्रेमानं आपल्यात सामावून घेतलेला पदार्थ. मेजाॅरिटी लोकांचं कंफर्ट फूड. हेल्थभीऑरटेस्टभी आयटम.

पाककृती प्रकार: 

सापुरी खट्टा

पूर्वतयारीचा वेळ:
५ मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पायनॅपलचे छोटे तुकडे-२कप
साखर- १/२ कप
हिरवी मिरची-१,२ आवडिप्रमाणे
कढिपत्ता-४-५ पान
आल -ताज किसुन अर्धा टेबलस्पुन
पन्चफोडण-२-३ टिस्पुन नसेल तर (एकेक चमचा बारिक मोहरी,मेथीदाणे,बडिशेप्,कलोन्जी,जिरे एकत्र करुन त्यातले २-३ टिस्पुन घ्या )
तेल
मिठ ,हळद्,तिखट चविप्रप्रमाणे

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

इंदुर ट्रिप

इंदोरच्या सराफा बाजार खाऊगल्लीबद्दल बरेच ऐकुन होते. मावसबहीणीच्या लग्नामुळे इंदोरला जायचा योग जुळून आला. वीकेंड जोडून होता सो एक दिवस फक्त 'खादाडीसाठी' आणी एक दिवस फिरण्यासाठी ठेवला.
इंदोरला सकाळी पोहोचताच मावशीकडे गरमागरम इंदोरी पोहे आणी जलेबीवर ताव मारला.
दुपारी छप्पन दुकान ला गेलो. इथे ओळीत 56 दुकानं आहेत खाण्यापिण्याची. चाटपासून मोमोजपर्यंत सगळे इथे मिळते.
पण आपण खायचे ते इंदोरी खासीयत असलेले पदार्थ.
विजय चाट आहे एक फेमस. तिथला खोपरा पॅटिस मस्त आहे.
बाहेरून कडक, आत चटपटीत खोबऱ्याचे सारण. टेस्टी चटण्या.

बंगाली पदार्थ

इथे मी वेळ मिळेल तसा बंगाली जेवणाच्या पदार्थाच्या पाककृती लिहित राहेन. खूप महान असतात असा अजिबात दावा नाही. तसेच मला फार अस्सल खास डेलिकसीज माहित नसल्याची शक्यता जास्त. शिवाय शाकाहारी असल्याने मासे, चिकन मी करत नाही. त्याबद्दल फार जनरल लिहेन, एखादी घरी नेहेमी होणारी लिहू शकेन. पण कधीतरी चवबदल म्हणून करायला हरकत नाही.
इथे भाज्यांची विविधता असते आणि एकूण नैसर्गिक समृद्धीमुळे पानात एकाचवेळी भरपूर पदार्थ असतात. तर मी त्याच क्रमाने इथे एक साधारण यादी करेन आणि वेळ मिळेल तशी तपशिलात आणि संख्येत वाढवत जाईन.

बंगाली जेवणात नेहेमी वापरले जाणारे मसाल्याचे व तत्सम पदार्थ -

पाककृती प्रकार: 

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४३

(मी हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेली पावणेदोन वर्ष जॉब करत आहे आणि माझ्या तेथील अनुभवांवर डायरी लिहिते आहे. आज खूप गॅपनंतर हा भाग लिहिते आहे.)

Keywords: 

अ................आणि अस्मि

Screenshot_20211008-130930_WhatsApp.jpg

अ..... आणि अस्मि

 अ  ----  हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो.

अस्मि ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो.

हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही.

लेख: 

उडदाचं वरण - आलं-बडिशेप लावून

साहित्य -
उडदाची डाळ - अर्धी वाटी
आलं - तीन ते चार इंच
कच्ची बडिशेप - पाव वाटीपेक्षा किंचित कमी
सुकी मिरची - १ किंवा २
तूप - २ चमचे
मीठ - चवीनुसार
साखर - अगदी थोडी, चवीपुरती, नाही घातली तरी चालेल.

पाककृती प्रकार: 

आठवण

जिंदगीका अहम् और ....बहुत कुछ...
वह एक दिन था संस्मरणीय(21/11/71)
जीवन दिशा बदलनेवाली थी हवा
चाहतभरी,शंकाओंसे घिरी पर प्रिय

युवक-युवती विवाह वेदीवर
अनभिज्ञ चारोंओरके माहौलसे
अपनेही खयालोंमें मशगुल,नजरें हुई चार
अचानक उभरी स्मितरेखा दिलसे

होना ही था,हो गया यथा योग्य
मान्य-अमान्य वैचारिक आदान-प्रदान
सुखीसंसार चल पडा मंजिल दर मंजिल
दशकोंके हिसाबसे आयी पाचवी पायदान

क्या श्रीमानजीसे होती है लडाई?
किसी मित्रने पूछा था सवाल
हाॅं,जानती हूॅं ना लग्नसिद्ध अधिकार!
तभी तो,जीवनमें आयी बहार-धमाल

चिमणे जग

डेकेअरविषयी चाललेली चर्चा वाचून हे ललित आठवले. खूप जुने आहे. १३ वर्षांपूर्वी लिहिलेले. पण मुलं अजूनही अशीच रडतात आणि अशीच रूळतात. Haahaa 2 Haahaa 2

लेख: 

सोन्याची खाण 

आम्ही गेली ५ वर्षं सॅन डीआगोमध्ये राहतोय (आणि फिरतोय आणि लोकांना फिरवतोय). तरीही काही गोष्टी बघायच्या राहूनच गेल्यात. त्यापैकी एक म्हणजे  ही सोन्याची खाण. गेल्या शनिवारी दुपारी टळटळीत उन्हांत फारसं काही करण्यासारखं नव्हतं म्हणून जवळच्या  जुलिअन गावात गेलो. आमच्या घरापासून एका तासावर असलेलं हे छोटंसं टुरिस्ट खेडंगाव तसं आम्हाला नवीन नाही. याआधी बरेचदा इथल्या कुयामाका तलावावर फिरायला, अँपल पाय खायला , डिसेंबर महिन्यातला (आम्हाला आमच्या गावात  कधीच न दिसणारा) स्नो बघायला किंवा असंच कंटाळा घालवण्यासाठी इथल्या रस्त्यावर, दुकानांतून वगैरे फिरायला आम्ही इथे येऊन गेलोय.

पाने

Subscribe to मैत्रीण RSS