डोक्याशी वाजणारा अलार्म स्नूझ करायला मोबाईल बराच चाचपूनही तिच्या हातात सापडत नव्हता. शेवटी उठून बसत तिनेच रात्री उशीखाली सरकवलेला मोबाईल बाहेर काढून अलार्म बंद केला. शिट!!! नऊ वाजले! तिने कपाळावर हात मारला. तिला तासाभरापूर्वी घराबाहेर पडायला हवे होते आणि ती अजून अंथरुणातच होती. घर शांत होते म्हणजे सगळे आपापल्या कामांना बाहेर पडून गेले होते. तिने पटकन ब्लॅंकेट बाजूला केले आणि पळापळ करत कामाला लागली.
रविवारी सकाळी शिल्लक एकुलत्या एक गेस्टने चेकआऊट केल्यावर पलाश कामाला लागला. लग्न जरी पुढच्या मंगळवारी असले तरी तयारीला दिवस खूप कमी होते. कोल्हापूरला नेहमीच्या दुकानात कॉल करून त्याने ग्रोसरीची ऑर्डर दिली. भटजींची तारीख बुक केली. गावात पक्याला झेंडूची फुले, आंब्याच्या डहाळ्या, केळीचे खांब आणि पाने, गुलाबाचे हार वगैरे लिस्ट दिली. संध्याकाळच्या कॉकटेल पार्टीसाठी ऑर्किड्स बूक करून ठेवली. ड्रिंक्सची लिस्ट दुकानात पाठवली. फेटेवाला आणि मेहंदीसाठी गावातली एक मुलगी सांगून ठेवली. आता फक्त पार्टीसाठी वेडिंग केक शिल्लक होता.
भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥
म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?
आज लीलाताईंचा वाढदिवस. गेलेल्या माणसांचा वाढदिवस म्हणतात का? लीलाताईंसमोर 'गेलेल्या' असं कोणाबद्दल म्हटलं असतं तर त्यांनी लगेच 'वारलेल्या' अशी सुधारणा केली असती. मृत्यूचं अवास्तव स्तोम त्यांना आवडायचं नाही. पटायचं नाही. आमच्या आधीच्या एका बॅचची सहल स्मशानात नेऊन त्यांनी बऱ्याच जणांचा रोषही ओढवून घेतला होता. अर्थात, त्यांना न पटणाऱ्या गोष्टी मला पटू शकतात हे विचारस्वातंत्र्यही त्यांनीच रुजवलेलं आहे.
कधी नव्हे तो वेधशाळेने दिलेला वादळी पावसाचा इशारा जांभूळवाडीत तरी आज खरा ठरला होता. सकाळपासून फिरून फिरून येणारा सोसाट्याचा वादळी वारा, शब्दशः मुसळधार पाऊस आणि या दोहोंचा मिळून ऐकू येणारा रौरव यात समोरच्या माणसाचे बोलणेही ऐकू येत नव्हते. जागच्याजागी स्प्रिंगसारखी हलून कंबरेतून वाकणारी भलीमोठी झाडे आजपर्यंत कोणी पहिली नव्हती. माडा पोफळींची झुलून झुलून वाताहात झाली होती. झाडांवर तयार फुले, फळे तुटून चिखलात पडून अजूनच राडा झाला होता. रस्त्यातून तांबडेलाल चिखलमिश्रित पाणी फुफांडून वहात होते. आजूबाजूच्या घरांवरचे पत्रे ताडताड उडून गर्जत होते. काही घरांची कौले उडून गेली होती.
शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, "आता हे काय नवीन? दुर्योधन कुठे? कपबशा कुठे? काय संबंध? लिहिणारीचं डोकं जागेवर आहे की नाही?" बरोब्बर ओळखले ना मनातले विचार? पण आहे, संबंध आहे. आणि बऱ्याच जणी लेख वाचल्यानंतर माझ्याशी कदाचित सहमतही होतील.
दोन पिढयांमागे ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, करी विचार’ असं सूत्र होतं. ते बदलत बदलत ‘उत्तम नोकरी, कनिष्ठ शेती’ इथपर्यंत येऊन पोचलं. एका टप्प्यावर नोकरी-व्यवसाय सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयात आलेल्या अडचणी आणि मिळालेला आनंद, ह्याची ही गोष्ट.
Black fungus किंवा Mucormycosis ने सध्या मिडियामधे हाहाकार माजवला आहे. लोक खूप घाबरले आहेत याला. तर याबद्दच चर्चेसाठी हा धागाप्रपंच.
म्युकॉर बद्दल आम्हाला पीजी करताना शिकताना पहिलं वाक्य हे असायचं की हे एक अत्यंत रेअर फंगल इन्फेक्शन आहे. कोविडच्या काळाने मात्र हे वाक्य खोटं ठरवलं. तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की हा काही नवीन रोग नाही. आधीपासून याबद्दल आपल्याला माहिती होती, फक्त आता हा खूप जास्त प्रमाणात (पूर्वीपेक्षा) दिसून येतोय.
#16, Sea Rock Society, Yari Road, Versova, Mumbai 400061
हातात सेलफोनवरचा पत्ता आणि डफल बॅग घेऊन तो त्या लहानश्या काळ्या लोखंडी गेटकडे तोंड करून उभा होता. टॅक्सी त्याला सोडून जाऊन पाच मिनिटे तरी झाली होती. कंपाउंड वॉलवर लपेटलेल्या गणेशवेलीवर लालचुटूक फुले बहरली होती. दारासमोरच्या झाडाला फेअरी लाईट्स गुंडाळून सजवले होते. दुसरीत असतानाचा ख्रिसमस! आठवून नकळत तो हसलाच.
ह्या गोष्टीची सुरुवात होते २०१४ मध्ये...आम्ही ७ जण म्हणजे आम्ही दोघे, दोघांचेही आई वडील आणि आमची ८ वर्षाची लेक असे सगळे किन्नोरच्या ट्रिपला गेलो होतो... तेव्हाच हिमालय फिवरची लागण झाली होती.... ही ट्रिप आम्ही अगदी सावकाश आणि आरामात, थांबत थांबत केली होती.
त्यानंतर २०१५ मार्चमध्ये आम्ही तिघेच फक्त एकदा येऊन गेलो... ह्यावेळी आम्ही स्पितीची तोंड ओळख करण्यापुरती एक "डे ट्रिप " फक्त करून आलो होतो. यावेळी मात्र आम्हाला तिघांनाही हिमालयाने पुरतं वेडं करून सोडलं.... आम्ही परत आलो ते मोठ्या स्पिती ट्रिपची स्वप्नं बघतच...
सरळ रस्त्यावरून जात असताना रस्त्याने अचानक वळण घ्यावं तसे आम्ही अचानक अमेरिकेत गेलो. काही वर्ष राहून पुण्याला परत येणार होतो. तिथे आहोत तोवर जमेल तेवढं फिरायचं ठरवलं. काही लहान रोडट्रीप केल्यावर इतका आत्मविश्वास आला, की तीन आठवड्यांची आणि पंचवीस राज्यांची रोडट्रीप ठरवली!
ही रोडट्रीप झाल्यावर आम्ही अमेरिकेच्या मुख्य भूमीवरच्या सगळ्या ४८ राज्यात जाऊन आलो. त्या ट्रीपबद्दलच्या चर्चा, प्लॅनिंगपासून ते प्रत्यक्ष ट्रीपच्या अनुभवांपर्यंत सगळं ह्या सात भागात लिहिलं आहे. नक्की वाचा.
या महिन्यात हे अपर्णा वेलणकर अनुवादीत, ग्रेगरी रॉबर्ट्स लिखित 'शांताराम' हे भरभक्कम १४०० पानांचं पुस्तक वाचलं. सर्वात आधी सांगायचं तर पुस्तक अनुवादीत आहे हे कुठेच जाणवत नाही. त्यातलं मुख्य पात्र लिन ऑस्ट्रेलीयन आहे पण तो मुंबईत येऊन मराठी शिकलेला आहे त्यामुळे मराठीतले संवाद कुठेच खटकत नाहीत. मुळ पुस्तक मराठीतच लिहीलं आहे असं वाटतं. अनुवाद्कर्त्या अपर्णा वेलणकर ग्रेगरीला प्रत्यक्ष भेटल्या आहेत. पुस्तक वाचुन झाल्यावर ही भेट किती हिमतीची आणि महत्वाची होती हे फारच जाणवतं.
'आपल्यामधली मौनाची दरी पसरतच चालली आहे आणि मी त्या गर्तेत खोल खोल जातोय.'
आदित्यने डायरीचे पहिलेच पान उघडले होते. दुपारचा चहा झाल्यावर बाबांच्या कपाटातली पुस्तके खालीवर करून बघताना मध्येच त्यांची डायरी त्याच्या हाती लागली होती. त्यांच्या वैयक्तीक गोष्टी वाचू नये असा एक विचार एकवार त्याच्या मनात चमकून गेला पण आता बाबा नाहीत तर काय हरकत आहे म्हणून त्याने डायरी बाहेर काढलीच. बाबांच्याच आरामखुर्चीत बसून त्याने डायरी उघडली.
पाऊस बरसुनी गेला अन आठवणींच्या सरी उलगडल्या,
सर मोत्याचा तुटुनी मोती सरसर गळावे, तश्या आठवणी मनभर ओघळल्या.
काहींनी मन झाले रेशीम रेशीम
हासू त्या गाली देऊन गेल्या,
काहींनी गिरवला त्या मोहकवेळा
जसा साजनच परत बिलगूनी गेला.
कांगडा टीच्या चौकोनी डब्यातून आदित्यने किटलीत चहा घातला. उकळत्या पाण्यात हलकेच पसरणारा सोनसळी रंग पहात त्याने आलं ठेचून दोन तुकडे घातले आणि खूष होत किटलीवर दरवळणाऱ्या वाफेत नाक खुपसून खोलवर श्वास घेतला. किटलीवर झाकण ठेवताना समोर काचेतून त्याची नजर लांबवर पसरलेल्या हिरव्यागार देवदारांच्या दाटीतून खळाळत्या बस्पाच्या प्रवाहापर्यंत गेली. उन्हात चमकत्या पाण्याकडे पाहता पाहता त्याला तो दिवस आठवला...
मैत्रिणींनो खूप दिवस इथे आले नव्हते मधेच डोकावून जात होते पण घरबसल्या एका कामात व्यस्त होते. माझ्या रेसिपी ब्लॉगवर 400 च्या पुढे रेसिपीज लिहून झाल्यात. अनेकांनी आग्रह केला होता तुझं युट्यूब चॅनल सुरू कर. पण मला त्याची शून्य माहिती त्यामुळे जमत नव्हतं. आज आत्ते सासूबाईंनी त्यांचं किचन उपलब्ध करून दिलं आणि लॉक डाऊन मध्ये लेकाने आणि नवऱ्याने सम्पूर्ण मदत केली आणि चुकतमाकत का होईना आज पहिला व्हिडिओ शेअर केलाय!सरबत
हा एक मजेशीर आणि करायला सोपा प्रकार आहे. मी गेल्या चार वर्षांत घरच्या-जवळच्याना असं मिळून वीसेक फोटो केलेत. बाकीचं पाल्हाळ लावायचं नाही त्यामुळे लहानपणी प्रयोगवहीत कसं साहित्य , कृती वगैरे लिहीत असू तसं लिहिते आहे.