ती_आणि-त्या १

ती

पण काय हरकत होती त्यांनी सोहमला दोन तास सांभाळायला. तिची नुसती चिडचिड चालली होती. पॉपकॉर्न फुटावे तशी ती फुटत होती. सोहम च्या जागी निशा ताईंचा अर्णव असता तर त्यांनी दोन तास काय दोन महिने बघून घेतलं असतं. तुझ्या आईला मला कधीच मदत करायची नसते. ही काही आजची पहिली वेळ नाही. लग्न ठरल्यापासून बघते आहे मी. काहीही करताना निशा ताईंना माझ्यापेक्षा चांगलं घेतात त्या. मला काही करायचं झालं की त्या आजारी तरी असतात, किंवा उरकायचं म्हणून उरकतात.

Keywords: 

लेख: 

भूतान - काय पहावे?

१२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर भूतान चा प्लॅन ठरला आहे. तिकिटे बूक झाली आहेत.
तिथे काय पहावे, आणि कुठे रहावे हे अजूनी ठरते आहे.
काय विशेष मार्गदर्शन करू शकाल?
सप्टेंबर मध्ये तिथे वातावरण कसे असेल? थंडीचे कपडे बरोबर घ्यावेत का?
खायला काय स्पेशल? काय चुकवू नये?
काय करणे टाळावे?

एक कोटेशन मिळाले आहे ९२००० हजार (इनोव्हा/झायलो) साठी, बागडोगरा ते बागडोगरा यात हॉटेल वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. (ब्रेकफास्ट आणि डिनर) दुपारचे जेवण आम्हाला पहावे लागेल. ४ जणात वाटले तर ओके होईल.

अवांतर - अनुभव पण शेअर करा.

धन्यवाद.

Keywords: 

डाळमेथी

मोडवलेली मेथी एक वाटी , दोन तास भिजवलेली तुरीची डाळ एक वाटी, तेल व नेहमीचं फोडणीचं साहित्य, आमसूल/चिंच , गूळ , गोडा मसाला तिखट मीठ, हळद, खवलेला नारळ , कढीलिंब, कोथिंबीर
कृती: खमंग कढीलिंब हिंगाची फोडणी करून त्यात मेथ्या व तुरीची डाळ पाच सात मि. परतून घ्या. त्यात हळद,तिखट व गोडा मसाला घालून परतून घेऊन तीन वाट्या पाणी घाला. उकळी आली की झाकण ठेवून शिजू द्या. डाळ शिजत आली की त्यात आमसूल, गूळ , ओला नारळ घाला. गरमागरम भात, भाकरी बरोबर खा.
20180713_134757.jpg

पाककृती प्रकार: 

वाडा (कथा) : भाग १

वेळेवर बस पणजी डेपोतुन सुटली आणि रत्नागिरीच्या दिशेने धावू लागली. सुमीत खिडकीजवळच्या सीटवर निवांत बसला होता. सहा ते साडे सहा तासाच्या प्रवासात टाईमपास करायला त्याने बर्‍याच मूव्हीज अपलोड करुन ठेवल्या होत्या.लॅपटॉप ऑन करत असतांनाच त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. आज जवळजवळ पाच-सहा वर्षांनी तो आत्याकडे रत्नागिरीला चालला होता. वर्ष किती झरझर निघून गेली. कॉलेजात जायला लागल्यापासून त्याला रत्नागिरीत जायला जमलेच नव्हते. मात्र आई-वडीलांकडून आत्याची खबरबात मिळत होतीच.

Keywords: 

लेख: 

नारळाच्या दुधातील शेवया

हि रेसिपी कोकणातील पारंपरिक आणि सर्वांच्या आवडीची आहे. कोकणात नारळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे सहज बनविणे शक्य होते. जर तुम्ही कोकणात भेट देत असाल तर तेथील पाहुणचारात तुम्हाला नक्कीच ह्या रेसिपीचा आस्वाद घ्यायला मिळेल.
ह्या रेसिपीमध्ये तांदूळ, गुळ आणि नारळाचा वापर केला असल्यामुळे हि रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि लहान मुले सुद्धा नूडल्स समजून आवडीने खातात.

आपण ह्या रेसिपीत नाचणीचे पीठही तांदळाच्या पिठाएवजी वापरू शकतो.

साहित्य:
१५० ग्रॅम तांदूळ, १ ओला नारळ, १५० ग्रॅम गुळ, १ चमचा वेलची पावडर, मीठ चवीनुसार. चकलीचे यंत्र (मध्यम शेवेची जाळी), मोदक उकाडायचे भांडे.

शेवेची कृती:

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

लेकीने केलेला गंपी बाप्पा

मागच्या आठवड्यात सा बा सकाळी पोळ्या करत असताना लेक शेजारी बसून कणकेशी खेळत होती.
खेळता खेळता सहजच ती आजी, मी गंपी बाप्पा केला असं म्हणायला लागली.
आणि बघितले तर खरेच गणपती केलेला तिने.
अजून पर्यंत गणपती कसा करतात वगैरे काही पाहिलं नाहीये तिने.
तिचं स्वतःचंच ईमॅजिनेशन.
:) :)
माझी लेक अस्मि - वयवर्षं २.५

ImageUpload: 

वीकांत स्पेशल ट्रेक - प्रकाशचित्र रूपी झलक!

मागे माझ्या मैत्रिण ओळख मध्ये मैत्रिणींनी मला माझ्या ट्रेक्स बद्दल लिहायला सांगितलेलं. हल्ली तेवढे ट्रेक्स करणं होत नाही. त्यातून गेले दोन वर्ष शाळा चालू होती. पण आज बर्‍याचे दिवसांनी एका सोलो हाईकला जाऊन आले. त्याची चित्ररूपी झलक दाखवते इथे. आमच्या वायव्य अमेरिकेत ज्याला pacific northwest region म्हणतात, तिथला कुठलाही ट्रेक घेतला तरी हेच फोटो खपतील. सर्व ट्रेक्स सुंदर आणि असेच दिसतात :) त्यामुळे एक के फोटो देखो - सौ ट्रेक्स का आनंद ले लो! :ड

Keywords: 

स्पेन - अंडालुसिया (Andalusia) - भाग १

कुठल्याही सहलीबद्दल त्या त्या वेळी लिहिलं गेलं की त्यात जी उत्स्फूर्तता असते ती नंतर राहत नाही. स्पेन ट्रिप दरम्यान बऱ्याच गोष्टी तुकड्या तुकड्यात लिहून ठेवल्या होत्या पण त्यात एकसंधता नव्हती. पण आज सहज म्हणून स्पेन मधले फोटो बघताना काही गोष्टी आठवल्या आणि पुन्हा लिहायला घेतलं. आधीची दोघांची भटकंती आणि आता सृजन सोबत असताना फिरणे यात फार मोठा फरक आहे याचा अंदाज होता. पण तरीही तो ७ महिन्यांचा असताना आम्ही उत्साहाने इटलीला गेलो आणि ट्रिप चे ७ दिवस, जायची तयारी ७ दिवस आणि आल्यावर आराम आणि आवराआवर यात ७ दिवस असा सगळा हिशोब बघता, आता कुठेही मोठ्या ट्रिपला जायला नको असं ठरवून टाकलं.

पांचाळेश्वराच्या पिंपळ वृक्षासाठी

आमच्या डेक्कन वरच्या घराच्या मागेच पांचाळेश्वराचे देउळ आहे. त्याच्या ही मागे एक शनी/ मारुतीचे देउळ आहे व एक प्रचंड उंच मोठा पिंपळ आहे होता. १९७९ च्या वरशात मी अगदी पहाटे उठून फिजिक्स केमि स्ट्री चा अभ्यास करत असे. तेव्हा पहाटे पहाटे सूर्योदय होताना पक्षी, खाली
वाहणारी नदी व सळसळ णारा पिंपळ सोबत असे.

मध्यंतरी एका भेटीत दिसले की प्रचंड बोर्ड बसवताना ते झाड तोडले गेले आहे. तेव्हा सुचलेली ही कविता आहे.

पहाटेच्या लालसर आकाशात
चमक णारी तुझी हिरवट तांबूस पानं

देवळामागच्या मारुतीवर
सावली धर णार्‍या मजबूत फांद्या

Keywords: 

गाली गुलाब फुलले

या गोड प्राजक्ताशी उन्मुक्त वात वाहे
सोडून भान सारे ती त्याचीच वाट पाहे ||

गाली गुलाब फुलले ओठात गीत आहे
का लाजते रती गं , तू त्याची प्रियाच आहे ||

डोळ्यातल्या स्वप्नांचा मनीही गाज आहे
तुझीच साथ द्याया चंद्र-चंद्रिका आज आहे ||

या शितल चांदराती तेवती तू वात आहे
भरेल ओंजळी ज्याची प्रकाशे, तो त्याचाच हात आहे

शांत नदीचा किनारा का गं खळाळत आहे ?
कि तुझिया मनाची हुरहूर तो दाखवीत आहे?

सांभाळ मदनिके गं चाहूल त्याचीच आहे
स्वप्नांना रंग द्याया आजची ही रात आहे

कविता: 

माझी सैन्यगाथा (भाग ४)

संध्याकाळी साडे पाच च्या सुमाराला गेस्ट रूम च्या बाहेर फेरफटका मारायला बाहेर पडले. सगळीकडे सोनेरी संधीप्रकाश पसरला होता. आकाशात केशरी, पिवळ्या रंगांची उधळण झाली होती. मी फिरता फिरता सहज मेस च्या मागच्या बाजूला गेले. तिथून खालच्या valley  चा पूर्ण view दिसत होता. मला हरिश्चंद्रगडा वरच्या कोकणकड्याची आठवण झाली. खाली पाहिलं आणि नजर तिथेच खिळून राहिली. हिरव्या रंगाच्या इतक्या छटा मी पहिल्यांदाच पहात होते… जणू काही Asian paints चं green shade card च!

लेख: 

सिंगापूर भटकंती

हाय गर्ल्स,

या ऑगस्ट्मध्ये सिंगापूरला जायचा प्लॅन करतोय. तर विमान तिकिटे व व्हिसा करुन देणारे कुणी खात्रीशीर एजंट असल्यास कृपया सांगा. स्वतः तिकिटे बूक करण्यापेक्षा एजंटमार्फत केली तर स्वस्त पडतात का? तसंच सिंगापूरचा व्हिसा हा एजंटमार्फतच करावा लागतो असं वाचलं. individually apply नाही येत करता म्हणे.

इटलीतील भटकंती

इटलीमध्ये भटकंती करण्यासाठी माहितीचा धागा.
कुठे, कसे जावे? काय पहावे, टूर्स, पब्लिक ट्रान्स्पोर्ट, टॅक्सीज, काय खावे-प्यावे. खरेदी, हवामान, सुरक्षितता इ.

DSC_2510.JPG

Keywords: 

मी आणि माझा शत्रुपक्ष..also known as DMV.. (३)

तिसरा भाग लिहायला बराच वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व! पण त्याचे झाले असे.. की मला काही केल्या त्या पहिल्या ड्राईव्हिंग टेस्टनंतर काय झाले ते आठवत नाहीये. म्हणजे त्यानंतर अजुन दोनदा ड्रायव्हिंग टेस्ट झाली. आणि त्या दोन्हीत मी फेल झाले. कशा हे आता आठवत नाही. परीणामी मला एका लेखी परीक्षेवरचे तिनही चान्सेस गमावल्यामुळे परत एकदा लेखी परीक्षा द्यायची वेळ आली. केव्हढी ती नामुष्की!! पहिली लेखी परीक्षा इतकी सहज व लगेच पास झाल्याने आलेला कॉन्फीडन्स, दर बिहाईंड द व्हील परीक्षेमुळे कमी कमी होत चालला होता. पण ते सारं विसरून नव्याने परीक्षा देणे गरजेचे होते.

शिवणाचे उद्योग

पोर्टेबल शिलाई मशीन काही वर्षे वापरतेय पण क्रोशे बॅग्ज च्या लायनींगसाठी आणि इतर किडुक मिडुक घरगुती कामासाठीच अजुन वापरत होते. क्रोशे बॅग्ज च्या लायनींग साठी एकेक नवीन नवीन ऍडीशन करत होते तेव्हा मात्र मनात यायचं की एखादी पुर्ण बॅग शिवून पहायचं पण मुहूर्त सापडत नव्हता. पण प्लॅस्टिक बंदीच्या निमित्ताने बाजारात आलेली भाजीची पिशवी पाहिली आणि म्हटलं पाहुचया जमते का. ट्रायल म्हणून जुन्या कपड्यांवरच प्रयोग करूया म्हटलं आणि जुने वापरात नसलेले कुर्ते होते त्यांनाच घेतलं हाताशी आणि बऱ्यापैकी मोठ्या साईज चे कप्पे असलेली जम्बो बॅग शिवली चुकत माकत.

Keywords: 

कलाकृती: 

म्युचुअल फंड्स- फंड का फंडा

हाय मैत्रिणीनो, कशा आहत??

गुंतवणुक म्हणजे काय आणि गुंतवणुकीची गरज याबाबत आपण मागील लेखात बघितलं.

आता वळुयात 'म्युचुअल फंड'कडे.

१. म्युच्युअल फंड म्हणजे काय??

म्युचुअल फंड म्हणजे शेयर्स, बाँड्स, दिबेन्चर्स, गवर्मेंट सिक्युरिटिज या आणि अशा प्रकारच्या गुंतवणूकीच्या पर्ययात, वेगवेगळ्या काँबिनेशनमधे एकाच वेळी गुंतवणुक करण्याची संधी देणारा पर्याय आहे.
"Mutual fund is a basket of investments.. as its name suggests it offers investment in mutual options"

Keywords: 

लेख: 

सिनेमा पॅरॅडीसो ( १९८८)

सध्या टीव्हीवरचे शेकडो चॅनेल्स युट्युब ,नेटफ्लिक्स ,ऑनलाईन स्ट्रीमिंग इ. च्या गर्दीत मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघणं कमी होत आहे.पण एक काळ असाही होता जेव्हा गावातलं एकुलतं एक पडदा थिएटर हेच लोकांच्या मनोरंजनाचं एकमेव साधन होतं. दर शुक्रवारी कोणता नवा सिनेमा याची वाट लोक बघत असायचे. अशाच एका काळातील कथा सांगणारा एक इटालियन सिनेमा 'सिनेमा पॅरॅडीसो'.

हे 'सिनेमा पॅराडिसो' म्हणजे इटलीतल्या एका छोट्याशा गावात असणाऱ्या एकमेव थिएटरचं नाव असतं.

Keywords: 

पेपर (शतशब्दकथा)

खूप दिवसांनी तिने काल पेपर उघडून चाळला. हल्ली पेपर तसाच ठेवला जातो, नवरा चाळतो तरी, ती उघडतही नाही.

तिला तिचं बालपण आठवलं, अक्षरओळख नसताना घरी येणारा मटा उत्सुकतेने फक्त उघडून बघणारी, ते आवडीने वाचणारी हा प्रवास. तिने पेपर उघडून बघितल्यावर, मग बाबा ऑफिसमध्ये जाताना घेऊन जायचे. मग वाचता यायला लागल्यावर, पेपरची चातकासारखी वाट बघणे आणि आल्यावर वाचणे. रविवारी तर बाबा लोकसत्ता पण घ्यायचे. मजा यायची वाचायला दोन दोन पेपर.

अनेक लेख अजूनही आठवतात अगदी लेखकांच्या नावासकट.

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग - ३) दिल्ली ते सिरखा

दिनांक १२ जून २०११ (दिल्ली मुक्काम)

आज तसा फार गडबडीचा दिवस नव्हता. सकाळी निवांत १० वाजता साऊथ ब्लॉकला विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात कार्यक्रम आणि हाय टी साठी जायचं होतं यात्रेची माहिती, यात्रेत खासकरून तिबेटमध्ये असताना घ्यायची काळजी ह्याची माहिती मिळणार होती. भारतातील यात्रेसाठी २२००० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, इंडेमिनीटी बॉन्ड तसेच इतर कागदपत्रेही द्यायची होती. त्या कार्यक्रमातच नारंग सर सगळ्यांना भेटून ओळखी करून घेणार होते.

Keywords: 

कूल मॉम (शतशब्दकथा)

आज इथल्या एकसे एक सरस शतशब्दकथा वाचल्या.
मागे कधीतरी इथेच प्रतिसादात लिहिलेली माझी शतशब्दकथा, आज वेगळा धागा काढून इथे देतेय.

---------------------------------------------------------------------------------
कूल मॉम

"अभ्या, चल उशीर झालाय आधीच. आपण काय या ऱोहनसारखे लकी थोडीच आहोत? त्याची मॉम एकदम कूल आहे. आपलं आहे का तसं? घरी प्रवेशताच प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जावं लागतंय आपल्याला रोज, वीट येतो अगदी."

Keywords: 

लेख: 

शतशब्दकथा - निकाल

मैत्रीणवर एवढ्यात बर्‍याच एक से एक शतशब्दकथा वाचल्या. त्यावरून मी पूर्वी लिहिलेल्या या २ कथा आठवल्या. मिपावर शशक स्पर्धा झाली होती त्यात दुसर्‍या फेरीत पहिल्या कथेचा उत्तरार्ध/सिक्वेल लिहायचा होता. इथे दोन्ही भाग एकत्र केलेत.

निकाल

लेख: 

वटपौर्णिमा: contract renewal (शतशब्दकथा) version 2

हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?

हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.

नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?

ओय! वटपोर्णिमा आहे आज.

ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?

हो ते फार पूर्वीच बंद केलय.

मग? वटपोर्णिमेनिमित्त म्हणत साडीच काय खूळ उगाच?

हे असच नटायला निमित्त नको का?

ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?

येस! तो नाही विसरले.

Keywords: 

लेख: 

प्रोजेक्ट स्टेटस (शत शब्दकथा)

कविन आणी सुमूक्ताच्या शतशब्दकथा वाचून मलाही एक शतशब्दकथा सुचली. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ईथल्या मैत्रिणी नक्कीच सांभाळून घेतील.मेघने वाचून काही बदल सुचवलेत. मेघ Bighug
–----------------------------------------

सायली

सायली ट्रॅफिकला शिव्या देत ऑफिसमध्ये शिरली. एका एक्सिडेंटमुळे ट्रॅफिक जॅम. क्युबीकलमध्ये अगदिच सामसूम होती. प्रोजेक्टमध्ये आग लागलेली. एका इश्यूसाठी एक ईमेल क्लाएंटला द्यायचा होता ज्यामूळे टेस्टिंग टिमवर लागलेले आरोप पुसले जाणार होते.

समीर

"च्यायला,काल रात्रभर झोप नाही एस्कलेशनमुळे, कुठून बुद्धी झाली आणि हा टेस्ट मेनेजरचा रोल घेतला.
"

लेख: 

यंदा भिजायचं नाही

आभाळ भरुन येईल
पण आता थांबायचं नाही,
मेघही बरसतील
पण यंदा भिजायचं नाही;

भेटतील वेडे पक्षी
गातील गाणी पावसाची,
आता मात्र
त्या गाण्यांनी हरखायचं नाही

बरसेल मग पाऊस माझ्या खिडकीशी,
थांबेन क्षणभर तेव्हा;
ऐकेन त्याची चाहूल,
आणि वाट पाहीन उघडीपीची..

आताशा दिसतो मला तो
पावसानंतरचा आसमंत,
नितळ निळा अन् शांत;
आणि खुणावती मला
डोंगर आणि त्यांची गर्द हिरवाई,
राखून ठेवायचे हे दिवसं
पाहण्या पाऊस लेऊन नटलेली हिरवी नवलाई

म्हणून आभाळ भरून येईलही
पण यंदा भिजायचं नाही,
मेघही बरसतील
पण आता थांबायचं नाही

विभावरी थिटे

Keywords: 

कविता: 

वटपौर्णिमा: contract renewal (शतशब्दकथा)

हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?

हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.

नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?

अरे! वटपोर्णिमा आहे आज.

ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?

हो रे, केव्हाच बंद केलय.

मग? हे साडीच काय खूळ उगाच?

हे असच नटायला निमित्त रे काहीतरी

ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?

येस बॉस! तो नाही विसरले

Keywords: 

लेख: 

सबला (शतशब्दकथा)

मायबोलीवत सद्ध्या शतशब्दकथांची लाट आली आहे. एक शशक मीसुद्धा मायबोलीवर लिहिली. तिच इथे प्रकाशित करते आहे.!!
==========================================================================================

खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने तिने तो पुरस्कार स्वीकारला - महिला सशक्तीकरण पुरस्कार. उपेक्षित आणि वंचित महिला, मुलींसाठी तिने केलेल्या कार्याचा हा गौरव होता.

लेख: 

मी आणि माझा शत्रुपक्ष.. also known as DMV.. (२)

बरेच दिवस नवर्‍याबरोबर प्रॅक्टीस केली. पण कुठेतरी काहीतरी चुकत होते. नवर्‍याला गाड्या प्रचंड आवडतात लहानपणापासून. तो फारच शाळेत वगैरे कार शिकला. (नगरमध्ये कोण बघतंय!) त्यामुळे त्याला, माझ्या डो़क्यात येणारे प्रश्न, अडचणी कळायच्याच नाहीत. गाडी पार्क करताना दोन पांढर्या रेषांमध्ये एका टर्नमध्ये कार बसवणे हे मला जास्तीची टुथपेस्ट परत ट्युबमध्ये ढकलण्यापेक्षाही अवघड वाटायचे. आणि मग एका झटक्यात जमले नाही पार्किंग की तो वैतागायचा. एव्हढे कसे जमत नाही तुला! वगैरे वगैरे..

Keywords: 

लेख: 

काळरात्रीनंतरचा उषःकाल

२५ जून १९७५ रोजी अंतर्गत आणिबाणी जाहीर झाली. मी तेव्हा खूप लहान म्हणजे पाच वर्षांची होते. पण आमचं घर राजकीयदृष्ट्या जागरूक होतं. बहुधा त्यामुळे त्याचे पडसाद मनात होते.

काही वर्षांपूर्वी रोहन प्रकाशन आणि मायबोली.कॉमने 'स्वात्र्यंतोत्तर काळातील सकारात्मक घटना' ह्या विषयावर लेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी मी 'आणिबाणी' ही घटना निवडल्यावर अनेक भुवया उंचावल्या गेल्या होत्या. लेख वाचून तुमचं मत नक्की सांगा.
____________________________________________________________________________________________________

Keywords: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS